‘दिल्लीत आम आदमी पार्टीला (आप) मिळालेले यश हे केवळ कॉँग्रेसविरोधी मानसिकतेतून मिळालेले यश नसून, व्यवस्थेविषयी लोकांच्या मनात असलेली चीड या निकालातून समोर आली आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि टाइम्स ऑफ इंडियाचे माजी मुख्य संपादक दिलीप पाडगावकर यांनी मंगळवारी केले.
‘आप’च्या विजयात जनक्षोभाचा प्रमुख वाटा
↧
↧
मेंटल हॉस्पिटलच्या कर्मचा-यांचे वेतन थकीत
येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. याबाबत हॉस्पिटल प्रशासनाने शासनाकडून निधी प्राप्त झाला असून कंत्राटदारास मिळण्यास थोडा उशीर होणार असल्याचे स्पष्ट केले.
↧
रेशनकार्डांवर डिसेंबरची साखर मिळणार
केंद्र आणि राज्य सरकारने पूर्वीचा लेव्हीचा शिल्लक कोटा उपलब्ध करून दिल्याने शहर व जिल्ह्यातील नागरिकांना रेशनकार्डांवर डिसेंबर महिन्याची साखर उपलब्ध होणार आहे.
↧
प्रवासी दिन कागदोपत्री साजरा
गैरसोय, अडचणी आणि पाचवीला पुजलेल्या त्रासाला कंटाळून अनेकदा एसटी प्रवासी प्रशासनाच्या नावाने बोटे मोडतात. मात्र, वेळ आली, की लेखी तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, हे मंगळवारी सिद्ध झाले. प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी एसटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रवासी दिनाकडे प्रवाशांनी पाठ फिरविल्याने एसटीचा प्रवासी दिन कागदोपत्री साजरा झाला.
↧
आर्किटेक्ट निकाल : पालिका सुप्रीम कोर्टात दाद मागणार
आर्किटेक्टची नोंदणी करून त्यांना लायसन्स देण्याचा; तसेच त्यांच्यावर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा अधिकार पालिकेला नसल्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचे पालिकेने ठरविले आहे.
↧
↧
अरुण गवळीचे फ्लेक्स; दोघं अटकेत
कुख्यात गुंड अरुण गवळी आणि सुनील घाटे यांचे फ्लेक्स लावून दहशत निर्माण करणाऱ्या दोघा भावांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. या दोघांनी स्वारगेट आणि डायस प्लॉट परिसरात लावलेले फ्लेक्स काढण्यात आले आहेत.
↧
उद्याच्या बैठकीकडे केमिस्टांचे लक्ष
औषध दुकानात प्रत्येक पेशंटला सहजरित्या सर्दी, डोकेदुखी, ताप, अॅसेडिटी, पोटदुखी, अंगदुखीसारख्या औषधांना ‘प्रिस्क्रिप्शन’मधून वगळावे या मागणीवरच राज्य औषध संघटना ठाम राहणार आहे.
↧
‘अंनिसला परदेशातून निधी नाही’
‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जादूटोणा विरोधी कायदा आणण्यासाठी परेदशातून कोणताही निधी मिळालेला नाही, शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आहे.
↧
नियमांच्या पूर्ततेसाठी हॉस्पिटल अनुत्सुकच
आरोग्य, अग्निशामक आणि बांधकाम विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नर्सिंग होम्स आणि हॉस्पिटल्सपैकी बहुतांश ठिकाणी आयुक्तांच्या अधिकारात आवश्यक परवानगी देता येणार असून, त्याबाबतची सुनावणी महिनाअखेरपर्यंत घेतली जाणार आहे.
↧
↧
कंपनीचे हित जपणारी बसखरेदी रद्द करा
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निमाण योजनेतून (जेएनएनयूआरएम) शहरासाठी निरुपयोगी ठरणाऱ्या बसची खरेदी करण्याचा घाट घातला जात असून, ठराविक कंपनीचे हित साधण्यासाठी घेतला जाणारा हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
↧
पीएमआरडीए स्थापनेचे आश्वासन पाळावे
पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्हा परिषद व तीन कॅन्टोन्मेंट बोर्डांचा विचार करून जिल्ह्याचा सर्वंकष विकास आराखडा करण्याची व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पीएमआरडीए स्थापना करण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी आमदार मोहन जोशी यांनी विधान परिषदेत केली.
↧
वीस हजार नवे शिक्षक?
‘आरटीई’ कायद्यातील तरतुदींमुळे राज्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्यामुळे, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे इतर शाळांत समायोजन करण्यात येणार असून, त्यामुळे वीस हजार अतिरिक्त शिक्षकांची भरती नव्याने करावी लागणार असल्याचा प्राथमिक अंदाज शिक्षण खात्यातून वर्तविण्यात येत आहे.
↧
२ लाख महिला झाल्या ‘कर्त्या’
शहर आणि ग्रामीण भागातील सव्वादोन लाख महिला आता त्यांच्या कुटुंबात ‘कर्त्या’ झाल्या आहेत. अन्नसुरक्षा कायद्यातील तरतुदींनुसार रेशनकार्डांवर ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून महिलांच्या नावांचे शिक्के मारण्यात आले आहेत.
↧
↧
गरिबांसाठी घरे पालिकेनेच बांधावी
शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे राहणीमान उंचाविण्यासाठी बीएसयूपी (बसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर) योजनेतंर्गत घरे उभारताना पालिकेने स्वत: ही घरे बांधावी. ही घरे बांधल्यानंतर त्यातून निर्माण होणारा टीडीआर विकल्यास महापालिकेला तब्बल ५० हजार कोटी मिळतील.
↧
मिसाळचा अटकपूर्व जामीन फेटाळला
बांधकाम व्यावसायिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र उर्फ अण्णा देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात दीपक उर्फ बाबा मिसाळ यांनी कोर्टात दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. सत्र न्यायाधीश बी. एम. सरदेशपांडे यांच्या कोर्टाने हा अर्ज फेटाळला.
↧
बेशिस्त पीएमपीला शिस्त लावणार
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या पीएमपी बसेसवर कारवाई करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांकडून हाती घेण्यात येणार आहे. पुढील आठवड्यामध्ये या मोहिमेला सुरुवात होणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.
↧
‘ATM’ सुरक्षेसाठी डेडलाइन
‘एटीएम’ केंद्रांच्या काचांवर लावण्यात आलेल्या जाहिराती तत्काळ काढून टाकण्याचा आदेश राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी सर्व बँकांना दिला आहे. ‘एटीएम’मध्ये लावण्यात आलेले ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे सुस्थितीत असल्याची खात्री करावी; अन्यथा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ते बदलून घ्यावेत, असेही बजावण्यात आले आहे.
↧
↧
आरटीओ... दोन तास थांबा हो...
सीएनजी वाहनांची नोंद न होणे, रेक्टीक्युटची नोंद करताना अडचण येणे, पर्यावरणकराची नोंदणी झाल्याखेरीज पावती न येणे, या प्रमुख समस्यांच्या चक्रात आरटीओमध्ये बसवण्यात आलेले वाहन सॉफ्टवेअर अडकले आहे. नव्या सॉफ्टवेअरमध्ये येणाऱ्या या अडचणींमुळे आरटीओमध्ये येणाऱ्या नागरिकांना किरकोळ कामासाठी एक ते दोन तास रांगेत थांबावे लागत आहे.
↧
बाबासाहेब पुरंदरे, वाडेकर यांना पुरस्कार
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे १३ व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यातील योगदानासाठी देण्यात येणारा पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तर कलेतील योगदानाचा पुरस्कार प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे.
↧
येत्या शनिवारी रंगणार भावगीत गायन स्पर्धा
नवोदित भावगीत गायकांना संधी मिळावी यासाठी ‘प्रशांत दामले फॅन फाउंडेशन’च्या वतीने भावगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १ डिसेंबरला या स्पर्धेची प्राथमिक फेरी मोठ्या प्रतिसादात पार पडली.
↧
More Pages to Explore .....