Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कोट्यवधी खर्चूनही प्रदूषण कायम

$
0
0
नदीपात्रातील गाळ काढण्यासह, चॅनलायझेशन, संरक्षकभिंत, सांडपाण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन आणि नदी सुशोभीकरण, अशी विविध कामांद्वारे नदीप्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालिकेला गेल्या सहा वर्षांमध्ये ही कामे पूर्णत्वाला नेण्यात यश आलेले नाही.

इंद्रायणीचा श्वास कोंडलेलाच

$
0
0
ज्या नदीच्या साक्षीने संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली, संत तुकाराम महाराजांनी वैकुंठगमन केले. त्याच पवित्र इंद्रायणीचा श्वास प्रदूषणाने कोंडला असून, या नदीचे पाणी तीर्थ म्हणूनही प्राशन करणे भाविकांच्या दृष्टीने धोकादायक झाले आहे.

सांडपाणी प्रक्रिया पूर्णत्वास

$
0
0
शहरातून घाण पाणी नदीत सोडले जात असल्याने शेती आणि जिल्ह्यातील गावांना त्याचा फटका बसत असल्याची वारंवार केली जाणारी तक्रार येत्या एप्रिलनंतर पुन्हा उद्भवणार नाही. साडेसहा टीएमसी पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीच्या वापरासाठी कॅनॉलमध्ये सोडण्याचा महापालिकेचा प्रकल्प एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

ऑक्सिजनअभावी नदीची तडफड!

$
0
0
सांडपाणी, रासायनिक पाण्यामुळे दूषित झालेल्या मुठा नदीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या सगळ्या पातळ्या ओलांडल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या नदीमध्ये तर आता ऑक्सिजनने शून्याची पातळी गाठली आहे.

अखेर शाळांना प्रवेशाची मुभा

$
0
0
बालवाडी आणि पहिलीच्या २५ टक्के राखीव जागांचे प्रवेश वगळता इतर प्रवेशांसाठी यंदा तरी कोणतेही वेळापत्रक लागू होणार नाही. म्हणजेच अनेक शाळांनी सुरू केलेले बालवाडीचे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

देशमुख हल्ला : आणखी एकाला अटक

$
0
0
राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी दिला आहे.

काँग्रेसजन गेले गावाला

$
0
0
वर्षानुवर्षे सोबत असलेले खासदार सुरेश कलमाडी यांचे निमंत्रण टाळले तरी पंचाईत,आणि त्यांच्यासोबत दिसले, तरी अडचण; अशा दुहेरी कात्रीत शहरातील काँग्रेसजन सापडले आहेत. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांत बहुसंख्य काँग्रेसजन ‘गावाला’ तरी गेले आहेत, किंवा ‘अनरिचेबल’ तरी झाले आहेत.

केमिस्टनी संपात सहभागी होऊ नये

$
0
0
औषधविक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या तीन दिवसांच्या संपात सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला. या संपात पुण्यातून सहा हजार, तर राज्यभरातून ५५ हजार केमिस्ट सहभागी होणार आहेत.

केमिस्टांवर ‘मेस्मा’

$
0
0
राज्यातील औषधविक्रेत्यांनी येत्या सोमवारपासून (१६ डिसेंबर) विविध मागण्यांसाठी पुकारलेला तीन दिवसांचा संप बेकायदा ठरवून सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.

मंडईचा परिसर अतिक्रमणमुक्त

$
0
0
मंडई आणि लोकमान्य टिळक पुतळा परिसरात अतिक्रमणांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने शनिवारी या ठिकाणच्या विक्रेत्यांवर जोरदार कारवाई केली. तब्बल १५ हजार स्क्वेअर फुटांच्या शेड्स काढण्यासह पस्तीसहून अधिक हातगाडी व्यावसायिकांना येथून हलविण्यात आले.

आर्थिक मंदीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे

$
0
0
आर्थिक मंदीकडे संवेदनशीलपणे आणि गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये समन्वय राखला गेला तरच औद्योगिक कंपन्यांमध्ये शांततेचे वातावरण राहू शकेल, असे प्रतिपादन मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश रवींद्र घुगे यांनी केले.

मुलीची छेडछाड करणाऱ्या युवकाला अटक

$
0
0
केशवनगर परिसरात पंधरा वर्षीय मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला मुंढवा पोलिसांनी अटक केली. गेल्या दोन वर्षांपासून छेडछाडीचा प्रकार सुरू होता. आकाश राधेशाम ठाकूर (वय २०, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाला पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ

$
0
0
देशातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डाला देण्यात आलेली सहा महिन्यांची मुदतवाढ ३१ डिसेंबरला संपत आहे. मात्र, केंद्रात कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका घेण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे सध्याच्या बोर्डाला पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे.

जब प्यार किया तो डरना क्या...

$
0
0
भारत आणि अफगाणिस्तानची मैत्री दर्शविणारं 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे' हे गाणं स्टेजवर सादर झालं. आणि त्यानंतर भाषण करताना चक्क अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करझाई यांनी आपल्या विद्यार्थीदशेतल्या आठवणी जागवत 'जब प्यार किया तो डरना क्या' या गाण्यातून उत्तर देत उपस्थितांची मने जिंकली.

पाश्चिमात्य देशांमधील शिक्षण मूल्यहीन

$
0
0
पाश्चिमात्य शिक्षणसंस्थांमधून अद्ययावत-गुणवत्तापूर्ण सुविधांच्या जोरावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून दिली जात असली, तरी मूल्यशिक्षणाच्या अभावाने राष्ट्रउभारणीसाठी युवकांची फौज घडविण्यात त्या अपयशी ठरत आहेत, अशी मीमांसा अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी केली.

'एमबीए-सीईटी'चे स्वरूप जाहीर

$
0
0
मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी बसावे, यासाठी राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) परीक्षेचे स्वरूप विस्ताराने आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. उदाहरणादाखल प्रश्नही दिले असून, विद्यार्थ्यांची परीक्षेची भीती जावी, हा त्यामागे हेतू आहे.

आज 'बीडीपी'बाबत अंतिम सुनावणी

$
0
0
समाविष्ट गावांतील टेकड्यांवर लागू करण्यात आलेल्या जैववैविध्य उद्यानांच्या (बीडीपी) आरक्षणाच्या बदल्यात देण्यात येणाऱ्या टीडीआरसंदर्भात आज (सोमवारी) अंतिम सुनावणी होणार आहे.

'टीईटी'ची परीक्षा सुरळीत पार

$
0
0
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पुणे जिल्ह्यातील ९४ परीक्षा केंद्रांवर सुरळीत पार पडली. परीक्षेला जिल्ह्यातून एकूण ३५,२९१ उमेदवार बसले होते.

निवडणुकांच्या तोंडावर विकासकामांचे गाजर

$
0
0
कॅटोन्मेंटमध्ये निवडणुका घेण्याचा आदेश आलाच, तर निवडणुकीला सामोरे जाताना मतदारांना भुलविण्यासाठी विकासकामांचा आधार विद्यमान नगरसेवकांकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे कॅटोन्मेंट बोर्डाच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे कोट्यवधी रुपयांचे विकासकामांचे टेंडर मान्यतेसाठी आले आहेत.

ऑनलाइन परीक्षा अर्जांमागचे शुक्लकाष्ठ संपेना

$
0
0
बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाइन भरण्यामधील तांत्रिक समस्यांचे शुक्लकाष्ठ अजूनही सुरूच आहे. ऑनलाइन अपलोड केलेल्या अर्जाची प्रिंटआउटच येत नसल्याने भरलेल्या अर्जांच्या प्रिंटआउट ज्युनिअर कॉलेजांनी बोर्डाला सादर करण्याची कार्यवाही तूर्त स्थगित करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images