Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

थंडीचा कडाका कायम

$
0
0
शहरातील थंडीचा कडाका गुरुवारीही कायम असून, किमान तापमान ७.८ अंश सेल्सियसवर स्थिरावले. पुढील दोन दिवस थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत. राज्यातील सर्वांत नीचांकी ७.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद नगर येथे झाली आहे.

बेकायदा परवानाप्रकरणी पाक नागरिकाला कोठडी

$
0
0
बेकायदा वाहन परवाना काढणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाने पुण्यात दोन ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

मोरयाचा गजर अन् भक्तीचा जागर

$
0
0
मोरया.. मोरयाचा गजर.. धार्मिक आणि पारंपरिक वातावरणाने भारलेला चिंचवडचा परिसर.. आणि कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांच्या पाद्य पूजनाने महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याला गुरुवारी (१२ डिसेंबर) उत्साहात प्रारंभ झाला.

'एमई'च्या प्रश्नपत्रिका उशिरा

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे एमईच्या (मास्टर ऑफ इंजिनीअरिंग) विद्यार्थ्यांसाठी बुधवारी आयोजित परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. तर, बुधवारचा पेपर हा इलेक्टिव्ह प्रकारातील असल्याने संबंधित कॉलेजकडून इलेक्टिव्हसची माहिती मिळाल्यावाचून प्रश्नपत्रिका पाठविताच येत नव्हत्या.

आंदोलन पिंपरीत निदर्शने स्वीडनमध्ये

$
0
0
कायम करण्याच्या मागणीसाठी अल्फा लावल कंपनीच्या कासारवाडी प्रकल्पातील कामगारांनी सुरू केलेल्या लढ्याला कंपनीच्या स्वीडन प्रकल्पातील कामगारांनीही पाठिंबा दिला आहे.

महामार्गाचे विधानसभेत पडसाद

$
0
0
पुणे-सातारा रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाची मुदत संपून सहा महिने उलटले तरी कामे अपूर्णच आहेत. अर्धवट स्थितीतील कामांमुळे नागरिकांचे बळी जात आहेत, याला जबाबदार कोण असा सवाल पुण्यातील आमदारांनी विधानसभेत केला.

‘व्हॉटस्अप’मुळे पकडला गेला खूनी

$
0
0
पिंपळे सौदागर येथील स्मशानभूमीत एका रंगाऱ्याचा डोक्यात सिमेंटचे ब्लॉक घालून खून करण्यात आला. हा प्रकार गुरुवारी (१२ डिसेंबर) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला.

कलमाडी यांचे फोटो काढणार

$
0
0
काँग्रेसमधून निलंबित केलेले खासदार सुरेश कलमाडी यांचे पालिकेतील पक्षनेते आणि उपमहापौर कार्यालयातील फोटो काढण्यासाठी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी दिलेली मुदत आज (शुक्रवारी) १३ डिसेंबरला पूर्ण होत आहे.

राजपथावर झळकणार पुणे विद्यापीठ

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पाच स्वयंसेवकांची येत्या २६ जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यापीठाच्या स्वयंसेवकांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ असून, विद्यापीठासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून सांगण्यात आले.

इंजिनीअरिंग: राज्याची CET नाही

$
0
0
इंजिनीअरिंग पदवीच्या प्रवेशासाठी यंदा राज्याची ‘सीईटी’ होणार का, याविषयी मध्यंतरी रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम देत यंदाचे प्रवेश ‘जेईई-मेन’च्या स्कोअरवरच होणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

तालिबानींची संघटना भारतातही

$
0
0
देशात दहशतवादी कारवाया करण्याच्या इराद्याने ‘तेहरिक-ए-तालिबान हिंदुस्थान’ (टीटीएच) ही संघटना उभारण्याचा कट शिजत असून, मराठवाड्यात त्या दृष्टीने कारस्थाने रचली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

करमणूक करचे नववर्ष पार्ट्यांवर लक्ष

$
0
0
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांवर करमणूक कर विभागाच्या विशेष पथकांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार असून, कर भरण्यासंदर्भात शहरातील हॉटेलचालकांची बैठक घेण्यात येणार आहे.

कारवाईचा महापालिकेला अधिकार नाही

$
0
0
आर्किटेक्टला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेला नाही, तसेच पालिकेत काम करण्यासाठी आर्किटेक्टला वेगळी नोंदणी करण्याची गरज नसल्याचा निकाल मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी दिला.

‘TTH’च्या फेसबुक पेजचा ‘ATS’कडून तपास सुरू

$
0
0
दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ‘तेहरिक-ए-तालिबान हिंदुस्थान’ (टीटीएच) या दहशतवादी संघटनेचे फेसबुकवरील ‘पेज’ कोठून तयार करण्यात आले, ते कोणी तयार केले, याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

खेड विमानतळाच्या भूसंपादनाला गती देणार

$
0
0
खेड विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकर राबविण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आज, शनिवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे.

‘महापारेषण’चा अभियंता लाचप्रकरणी गजाआड

$
0
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भोर येथे ‘महापारेषण’चा कनिष्ठ अभियंता अश्विन परशुरामजी शहाणे (वय २८) आणि विक्रम दशरथ चव्हाण (३०, रा. भोर) या व्यक्तीस सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भोर येथील राहुल बाळकृष्ण धावले (वय २५, रा. भोर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

कलमाडींच्या फोटोनंतर मॅरेथॉन भवनकडे मोर्चा

$
0
0
काँग्रेस भवन तसेच महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनातून खासदार सुरेश कलमाडी यांचे फोटो हटविल्यानंतर माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी आपला मोर्चा कलमाडी यांच्या मॅरेथॉन भवनकडे वळविला आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी उपायांचा अभाव

$
0
0
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीला वाढता विस्तार आणि विकासाबरोबरच जलप्रदूषणाच्या समस्येचा मोठा विळखा आहे. हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा, नियमांची पायमल्ली आणि यंत्रणांचा अभावा यामुळे दिवसेंदिवस या प्रदूषणात वाढ होत आहे. प्रशासनाने प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना ठोसपणे अमलात येऊ शकत नाहीत.

मेट्रोसाठी चार ‘एफएसआय’

$
0
0
पुणे मेट्रोला केंद्राच्या अंतिम मान्यतेचा ग्रीन सिग्नल मिळणे अद्याप बाकी असले, तरी मेट्रोच्या अंमलबजावणीसाठी जुन्या व नव्या हद्दीच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये मेट्रोच्या तरतुदींचा समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीसमोर ठेवला आहे.

कुपोषित बालकांचे प्रमाण घटले

$
0
0
महिलांचे सक्षमीकरण झाले तर त्यांच्या मुलांचेही संगोपन योग्य पद्धतीने होते, ज्या भागात महिला अशिक्षित असतात तेथील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक असते, असा निष्कर्ष केंद्र सरकारच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस या संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>