Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डिव्हायडर पंक्चर केल्यामुळेच गेला निष्पाप जिवांचा बळी

$
0
0
कात्रज-देहूरोड बायपासवरील ‘एचईएमआरएल’ कंपनीसमोर पंक्चर करण्यात आलेल्या डिव्हायडरमुळे दुचाकीस्वाराचा बळी गेल्याचे वाहतूक पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

गुणपत्रिका बदलणाऱ्या विद्यार्थ्याला अटक

$
0
0
मूळ गुणपत्रिकेत फेरफार करुन एसपी महाविद्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात

$
0
0
सनईच्या मंगल सुरांनी झालेला श्रीगणेशा, दिग्गजांच्या भावपूर्ण गायकीने भारलेला माहोल, जसरंगी जुगलबंदीची जादू, सतार आणि तबल्याच्या अफलातून वादनाने मिळवलेली दाद आणि भारदार गायकीच्या समारोपाने केलेला कळसाध्याय अशी अनोखी कलामैफिल रसिकांनी ६१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात अनुभवली.

समान विकासनिधीसाठी विरोधी आमदारांचे आंदोलन

$
0
0
सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विकास कामांसाठी दहा कोटी रुपये आणि विरोधकांना फक्त दोन कोटी रुपये... हा दुजाभाव का असा सवाल करीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी गुरुवारी विधीमंडळाच्या पायऱ्यावर निदर्शने केली.

‘स्वरनायकां’च्या घराण्यांचे कॅलेंडर

$
0
0
सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या अकरा वर्षांपासून दिग्गज शास्त्रीय कलाकारांवर आधारित संग्राह्य कॅलेंडर प्रसिद्ध करणाऱ्या छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी यंदा ‘स्वरनायक’ या संकल्पनेवर कॅलेंडर तयार केले आहे.

दहा हजार मिळकतींची करआकारणी नाही

$
0
0
करआकारणी न झालेल्या मिळकती शोधण्यासाठी पालिकेने गेल्या महिन्यापासून सुरू केलेल्या मोहिमेत आत्तापर्यंत सुमारे १० हजार मिळकतींची करआकारणी केली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या महिन्याअखेरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याने त्यातून पालिकेला सुमारे २५ कोटीं रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारीही रमले पोषणआहाराच्या कामात

$
0
0
पालक-शिक्षकांची बैठक, वर्गावर देखरेख करतानाच जिल्हाधिकारी विकास देशमुख गुरुवारी थेट पोषण आहाराचे काम सुरू असलेल्या स्वयंपाक घराचा रस्ता धरला आणि मुलांचा आहार तयार करण्यास चक्क हातभारही लावला. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक आगमनामुळे कर्मचारी आणि विद्यार्थीही क्षणभर हरखून गेले.

कर्मचाऱ्यांकडूनच पालिकेला ‘शॉक’

$
0
0
महापालिकेच्या वीज मीटरमधून बेकायदा कनेक्शन घेऊन प‌ालिकेतील कर्मचारीच वीजचोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पळविलेले पाणी शेतकऱ्यांना परत द्या

$
0
0
स्वतःला शेतकऱ्याची मुले म्हणविणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी उद्योजकांसाठी पळवलेले शेतीचे पाणी तातडीने शेतकऱ्यांना परत करावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी गुरुवारी केली.

फरक मिळाला, पगाराचं काय?

$
0
0
प्राध्यापकांच्या डिसेंबरच्या पगारासाठी सहाव्या वेतन आयोगाची थकित रक्कम सोडून इतर सर्व बाबींची देयके सादर करावीत, असे निर्देश देणाऱ्या पुणे विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाने बुधवारी याच थकित रक्कमेविषयीची माहिती जाहीर करत प्राध्यापकांच्या खात्यात ही रक्कम जमा केली.

स्वतःच करा कारची सजावट

$
0
0
अलिशान मर्सिडिज घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना आता त्यांच्या आवडीनुसार ‘पर्सनलाइज्ड’ कार खरेदी करता येणार आहे. आपल्या निवडीनुसार कारचा फील आणि अंतर्गत सजावट ग्राहकांना ठरवता येणार आहे. मर्सिडिज बेन्झ इंडियाने सुरू केलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मध्ये ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे.

‘आप’च्या आदर्शवादाविषयी साशंकता

$
0
0
‘आम आदमी पार्टी’ची इतर सर्व पक्षांप्रमाणे विचारसरणी एक आणि प्रत्यक्षात आचरण भलतेच, अशी परिस्थिती होण्याचीच जास्त भीती असल्याचे मत पुण्यातील स्पर्धा परीक्षांच्या वर्तुळात वावरणाऱ्या तितक्याच आदर्शवादी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राज्यामध्ये ‘आप’ची जादू चालण्याविषयीही हे उमेदवार साशंक दिसून येत आहेत.

शिल्लक साखरेवरून 'केस बाय केस'

$
0
0
लेव्हीच्या शिल्लक साखरेचा पुरवठा करण्यावरून राज्य सरकारचा अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि साखर कारखान्यांमध्ये वाद उभा राहिला आहे. दोन्ही बाजूंकडून यासंदर्भात वेगवेगळी माहिती पुढे आल्यामुळे अखेर याबाबत प्रत्येक विभागाच्या साखर सहसंचालकांकडून प्रत्येक कारखान्याच्या शिल्लक कोट्याबाबत ‘केस बाय केस’ अहवाल तयार करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला.

नियोजन समिती स्थापनेच्या हालचाली वेगात

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावरील (डीपी) हरकती-सूचनांच्या सुनावणीसाठीची नियोजन समिती येत्या आठवड्याभरात अस्तित्त्वात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी, सरकारी पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या असून, राज्य सरकारतर्फे नेमण्यात येणाऱ्या चार तज्ज्ञांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

शाळांनी सूचनांचे पालन न केल्यास आंदोलन

$
0
0
प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या सूचनांचा विचार न करता, पूर्व प्राथमिक आणि पहिलीच्या वर्गांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करणाऱ्या शाळांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने गुरुवारी आंदोलनाचा इशारा दिला. शाळांनी आपल्या प्रवेश प्रक्रिया त्वरीत थांबवून त्या एप्रिल- मे महिन्यामध्येच करण्याची मागणीही संघटनेने केली.

तंत्रज्ञाच्या मृत्यू प्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

$
0
0
आंबेगाव पठार येथे चंद्रागण सोसायटीजवळील उच्चदाबाच्या विद्युत संचाची (डीपी) तपासणी करण्यास गेलेल्या तंत्रज्ञाचा शॉक लागून मृत्यू झाला होता. तंत्रज्ञाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी महावितरणचे दोन अधिकारी आणि एका ठेकेदारावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पवारांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

$
0
0
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच स्वयंसेवी संस्थांनी गरिबांना ब्लँकेट आणि कानटोप्या भेट, मुलांना खाऊवाटप, आरोग्य शिबिर आदी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

​अपघातात दोन ठार

$
0
0
पुणे-मुंबई हायवेलगत सोमाटणे फाट्याजवळ झालेल्या अपघातात मोटारीतील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (११ डिसेंबरला) मध्यरात्रीच्या सुमारास झाला.

पीएमपीवर ‘नजर’ ठेवा अन् बक्षीस मिळवा!

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील बससेवेची शिस्त सुधारण्यासाठी नागरिकांनीच बेशिस्त बस चालकांचे फोटो काढून पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, असे फोटो पाठविणाऱ्या नागरिकांना शंभर ते एक हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याचा निर्णयही पीएमपीने जाहीर केला आहे.

आ. अनिल भोसले यांना सपत्नीक अटक; सुटका

$
0
0
महापालिकेच्या निवडणुकीत प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची बोगस पावती दिल्याप्रकरणी आमदार अनिल भोसले यांना आणि त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले यांना बुधवारी दुपारी शिवाजी‌नगर पोलिसांनी अटक केली. सायंकाळी शिवाजीनगर कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images