Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

१.५ वर्षानंतर पालिकेला ‘BOT’ समितीची आठवण

$
0
0
बांधा वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्वावर बांधकाम करण्याचा निर्णय घेण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या आणि दर महिन्याला बैठक होणे अपेक्षित असलेल्या बीओटी कमिटीची बैठक घेण्याची आठवण महापालिकेला १७ महिन्यानंतर झाली आहे.

‘एलजीबीटी’ आव्हान देणार

$
0
0
सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा असल्याचा निर्णय देऊन समलिंगी, उभयलिंगी आणि तृतीय पंथी समाजावर अन्याय केला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल निषाधार्ह आहे, असे मत समपथिक ट्रस्टचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पोस्टाची ‘एटीएम’ मार्चपर्यंत

$
0
0
टपाल खात्याने चेन्नई येथे एक डिसेंबर रोजी पहिले एटीएम सेंटर सुरू केले असून, पुण्यात मार्च महिन्यापर्यंत पाच एटीएम सेंटर उभारले जाणार असल्याचे टपाल खात्याच्या पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल एस. आर. मिना यांनी सांगितले.

मांजरी येथे हल्ला झालेल्या ​महिलेचा मृत्यू

$
0
0
मांजरी येथे एका ५५ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून तसेच हातपाय बांधून हल्ला झालेल्या महिलेचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेने घातलेले दागिने चोरीस गेल्याने सुरुवातीला जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असला तरी हा घातपात प्रकार असावा, या दिशेनेच तपास सुरू आहे.

विमानाने पाठवा २० किलो वजनाचे पार्सल

$
0
0
विमानांद्वारे नागरिकांची पार्सल पाठविणारी ‘एक्स्प्रेस पार्सल सर्व्हिस’ ही नवी योजना टपाल खात्याच्या पुणे विभागाने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत २० किलो वजनापर्यंतचे कोणतेही पार्सल विमानसेवा असलेल्या देशातील २० प्रमुख शहरांमध्ये पाठविता येणार आहे.

सिलिंडरवरील व्हॅटमुळे अघोषित दरवाढीचा भुर्दंड

$
0
0
गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेमध्ये (डीबीटीएल) ग्राहकांना २५ ते ३० रुपये अधिक मोजावे लागत आहेत.

नागोरी टोळीला अटक होणार

$
0
0
विद्यापीठ खून प्रकरणात आरोपी असलेल्या नागोरी टोळीची पोलिस कोठडी संपल्याने त्यांची ठाणे जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. मात्र, हिंजवडी येखील खून प्रकरणात पुन्हा त्यांची पोलिस कोठडी घेण्यासाठी गुन्हे शाखेने तयारी केली आहे.

राजीनामा परिणामशून्य

$
0
0
शहरातील बेकायदा बांधकामे अधिकृत करावी, यासाठी पिंपरी- चिंचवडसह पुणे महापालिकेतील चार आमदार आणि काही नगरसेवकांनी राजीनामे दिले असले तरी शहरात सुरू करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामावरील कारवाई थांबविण्यात आली नसल्याचे पालिका प्रशासनाने बुधवारी स्पष्ट केले.

बेपत्ता यात्रेकरू मृत घोषित

$
0
0
उत्तरखंडमधील महाप्रलयात बेपत्ता झालेल्या पुण्यातील २५ यात्रेकरूंसह राज्यातील ८० यात्रेकरू मृत झाल्याचे उत्तराखंड सरकारने घोषित केले आहे. या यात्रेकरूंच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये जून महिन्यात झालेल्या या महाप्रलयाच्या घटनेनंतर सहा महिन्यांनी बेपत्ता यात्रेकरू मृत झाल्याचे गृहित धरण्यात आले आहे.

अनोख्या मुहूर्तावर ५५ लग्नं

$
0
0
अनेक वर्षांनी आलेला ११-१२-१३ हा तारखेचा अनोखा योग साधून पुण्यातील ५५ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील विवाह नोंदणी कार्यालयात आज त्यानिमित्त झुंबड उडाली होती.

‘टीईटी’ येत्या रविवारी

$
0
0
राज्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून पात्र ठरण्यासाठी आवश्यक ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) येत्या रविवारी (१५ डिसेंबर) होणार आहे.

बीडीपीवरूनही राजीनाम्याचा खेळ

$
0
0
जैववैविध्य उद्यानांसाठीच्या (बीडीपी) आरक्षित जागेमध्ये १० टक्के बांधकामांसाठी आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही आता राजीनामाअस्त्र उगारले आहे.

अर्भकाला पुरणारे दोघे गजाआड

$
0
0
अवघ्या एका दिवसाच्या अर्भकाला येरवड्यातील इंद्रप्रस्थ गार्डन परिसरामध्ये पुरणाऱ्या महिला आणि पुरुषाला येरवडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. विवाहबाह्य संबंधांमधून हा प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांना आहे. ही महिला विधवा असून, गेल्या दोन वर्षांपासून तिचे परपुरुषाशी संबंध होते.

संतोष मानेची फाशी कायम

$
0
0
मृत्यूचे तांडव घालत नऊ जणांचा बळी घेणारा बसचालक संतोष मानेची फाशी शिवाजीनगर कोर्टाने फेरसुनावणीनंतर कायम केली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांच्या कोर्टाने बुधवारी हा निकाल दिला. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार ही फेरसुनावणी घेण्यात आली.

केमिस्टचा बेमुदत बंदचा इशारा

$
0
0
येत्या सोमवारपासून तीन दिवसांचा बंद घोषित केलेल्या औषधविक्रेत्यांवर (केमिस्ट) कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला असून, त्याच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.

‘अन्नधान्य’ची ‘झिरो पेन्डन्सी’

$
0
0
युनिट कमी करणे किंवा वाढविण्यासाठी आलेल्या अर्जांची पेन्डन्सी-झिरो..., नव्या रेशनकार्डांसाठी आलेल्या अर्जांची संख्या-३०, निकाली काढलेले-२८..., एजंटांना प्रवेश बंद...!

पगार कधी ते सांगा

$
0
0
प्राध्यापकांच्या डिसेंबरच्या पगारासाठी सहाव्या वेतन आयोगाची थकित रक्कम सोडून इतर सर्व बाबींची देयके सादर करावीत, असे निर्देश देणाऱ्या पुणे विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाने बुधवारी याच थकित रक्कमेविषयीची माहिती जाहीर केली.

संविधान मिरवणुकीतून समतेचा संदेश

$
0
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडीज सेंटरतर्फे गुरुवारी सायंकाळी संविधान मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वांचा आत्मा, परमात्मा एकच

$
0
0
‘आपल्याकडे खूप देव-देवता असल्याने कोणाची भक्ती करावी, याची काहींना चिंता वाटते. देव अनेक असले तरीही सर्वांचा आत्मा, परमात्मा एकच आहे. त्यामुळे भक्तांनी शुद्ध मनाने ईश्वरचिंतन करावे,’ असे आवाहन कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांनी बुधवारी केले.

‘अन्नसुरक्षे’च्या कामाबद्दल सचिवांची नाराजी

$
0
0
अन्नसुरक्षा योजनेची या महिनाअखेरपर्यंत सुरुवात करण्याची तयारी राज्य सरकारने केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणीबाबत गोंधळाची स्थिती आहे. या योजनेच्या लाभार्थीच्या रेशनकार्डांवर शिक्के मारण्याचे आदेश सरकारने दिले खरे, पण त्यासाठी अद्याप शिक्केच पुरविले गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images