Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

धुक्याची दुलई; थंडीत किंचित घट

$
0
0
सलग दोन दिवस हुडहुडी भरविल्यावर मंगळवारी शहरात थंडीचा कडाका किंचित कमी झाला. शहरातील किमान तापमानात काहीशी वाढ नोंदविण्यात आली.

मराठी सिनेमात नक्की काम करेन?

$
0
0
‘माझ्या वयानुसार एखादी भूमिका मला दिली गेली, तर मी मराठी सिनेमात नक्की काम करेन. अर्थात, माझे मराठी उच्चार एखाद्या दिग्दर्शकाला चालणार असतील, तर... ,’ हे उद्गार आहेत एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ती आणि लेखिकेचे... सुधा मूर्ती यांचे!

ज्योतिषांचा हमीपत्रावर उतारा!

$
0
0
जादूटोणा कायद्याच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी ज्योतिष पाहणाऱ्यांनी हमीपत्राचा ‘मंत्र’ जपला आहे. प्रारब्ध जाणून घेण्यासाठी येणाऱ्या ‘क्लाएंट’कडून ‘माझ्या जबाबदारीवर भविष्य जाणून घेत असून त्याच्या परिणामांची कोणतीही जबाबदारी भविष्य सांगणाऱ्यावर राहणार नाही.

अनधिकृत बांधकामांची माहिती नाही

$
0
0
पिंपरी-‌चिंचवडमधील बेकायदा बांधकामांचा प्रश्न विधिमंडळात गाजत असताना पुणे महापालिकेच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांचा मुद्दाही ऐरणीवर येत आहे. पुणे महापालिकेने आतापर्यंत ५८४८ बेकायदा बांधकामांना नोटीस बजावली असून, शहर व परिसरात यापेक्षा किती तरी अधिक पटीने बेकायदा बांधकामे झाली आहेत.

संतोष मानेला पुन्हा फाशीच!

$
0
0
स्वारगेट स्टँडमधून एसटी बस पळवून पुण्यात थैमान घालणारा आणि नऊ निरपराध नागरिकांचा बळी घेणारा बेदरकार आणि माथेफिरू एसटी चालक संतोष मानेला पुणे सेशन्स कोर्टानं आज पुन्हा फाशीचीच शिक्षा सुनावली आहे.

मिस नाइन पुण्यात!

$
0
0
पुण्यात शास्त्रीय संगीतासोबत पाश्चात्य संगीतही रुजतंय. यामधून ज्याप्रमाणे तरुण गायक-संगीतकार समोर येताहेत त्याचप्रमाणे श्रोतेही तयार होताहेत. हेच पाहाता पुण्याकडे परदेशातील बडे गायक-संगीतकारही आकर्षित होत आहेत. यापैकी एक बडं नाव म्हणजे डीजे मिस नाइन.

कलमाडींच्या छायाचित्रांची गच्छंती

$
0
0
काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या खासदार सुरेश कलमाडी यांचा फोटो यापूर्वीच काँग्रेस भवन मधून हटविण्यात आल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी स्पष्ट केले आहे. पालिकेच्या गटनेते व उपमहापौर कार्यालयातील कलमाडी यांचे फोटो काढण्याबाबत दीपक मानकर यांनी पहावे, असेही छाजेड यांनी स्पष्ट केले.

प्रेक्षकांना मिळणार ‘रॉकिंग’ अनुभूती

$
0
0
रॉक म्युझिकपासून संत तुकारामांच्या अभंगांपर्यंत आणि संत कबीरांच्या दोह्यांपासून सरगमपर्यंत सादरीकरण असलेला ‘रागा टू रॉक’ हा आगळावेगळा कार्यक्रम प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी घेऊन येत आहे.

‘फ्लेक्सबाजी’चे स्वप्न भंगले

$
0
0
महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या महापौर क्रीडा स्पर्धांच्या फ्लेक्स, बॅनरवर क्रीडा समितीच्या सदस्यांचे फोटो छापण्याचा प्रस्ताव पक्षनेत्यांच्या बैठकीत फेटाळण्यात आला. यामुळे फ्लेक्सवर झळकण्याचे समितीच्या सदस्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.

सेवकांच्या संमतीविना वेतनातून वजावट नाही

$
0
0
महापालिका सेवकांच्या संमतीशिवाय सानुग्रह अनुदान आणि वार्षिक वर्गणीची रक्कम वेतनातून वजा केली जाणार नाही, अशी ग्वाही पालिका प्रशासनाने बुधवारी दिली.

सासवड नगरपालिकेवर हरित लवादात खटला

$
0
0
केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सूचना करूनही नगरपालिका प्रशासनाने कऱ्हा, चांबळी नदीपात्रात शहरातील सांडपाणी व मैला प्रक्रिया न करताच सोडल्याने हरित लवादामध्ये सासवड नगरपालिकेविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

मलशुद्धिकरण प्रकल्पासाठी शिर्डी नगरपरिषदेचा सल्ला

$
0
0
पुणे कँटोन्मेंटच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या पहिल्या मलशुद्धिकरण प्रकल्पासाठी बोर्ड शिर्डी नगर​परिषदेचा सल्ला घेणार आहे. शिर्डीत उभारलेल्या प्रकल्पाबाबत बोर्डाने नगरपरिषदेकडून माहिती मागितली आहे.

साखर खरेदीच्या टेंडरचा पेच कायम

$
0
0
रेशनकार्डांवर मिळणाऱ्या साखरेची खरेदी करण्याच्या टेंडर प्रक्रियेत निर्माण झालेल्या पेचावर बुधवारीही तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, विभागातील पाचपैकी चार जिल्ह्यांमध्ये साखर खरेदीचे एकही टेंडर न आल्यामुळे काही ठिकाणी साखर मिळणार की नाही, याबाबत प्रश्न उभा राहिला आहे.

निर्णय होईपर्यंत कारवाई होणारच

$
0
0
अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया निरंतर चालू राहणार असल्याचे बुधवारी (११ डिसेंबर) स्पष्ट केले.

डायलिसिसच्या ५०० मशिनचा तुटवडा

$
0
0
मेडिकल टुरिझमच्या दृष्टीने पुण्याच्या वैद्यकनगरीचा विकास होत असला तरी पुण्यातील खासगी हॉस्पिटलला डायलिसिस मशिनचा खर्च परवडत नाही. ही सुविधा देण्यात शहरातील हॉस्पिटलने आखडता हात घेतल्याने वाढत्या पेशंटच्या तुलनेत आजमितीला पाचशेहून अधिक मशिनची कमतरता भासत आहे.

फेरसुनावणीतही मानेचे मौन कायम

$
0
0
स्वारगेट बसस्टँड येथून बस पळवून बेदरकारपणे चालवून नऊ जणांचा बळी घेणारा बसचालक संतोष मानेने हे अघोरी कृत्य का केले याचे कोडे मात्र अद्यापही उलगडले नाही. कोर्टाने त्याला शिक्षा सुनावण्यापूर्वी त्याचे म्हणणे मांडण्यासाठी तीनदा वेळ दिली होती. मात्र, त्याने केवळ जुजबी प्रश्नांना उत्तरे दिली.

इमारत दुरुस्तीच्या निधीतून स्वच्छतागृहांची ‘सफाई’

$
0
0
पालिकेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी शिक्षण मंडळाने इमारत दुरुस्तीसाठीच्या निधीचीच उधळपट्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

रस्ते डिझाइनवरून राष्ट्रवादीचा घरचा आहेर

$
0
0
शिवसेना, भाजपाचा विरोध डावलून बहुमताच्या जोरावर स्थायी समितीत रस्ते डिझाइनसाठी किलोमीटरला दहा लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीच घरचा आहेर दिला आहे.

‘LBT’ची १८ दिवसांत १ कोटींची वसुली

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) बुडविणाऱ्या व्यावसायिकांविरोधात महापालिकेने गेल्या महिन्यापासून सुरू केलेल्या कारवाईअंतर्गत १८ दिवसांमध्ये तब्बल एक कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिका-यांवरील ‘आपत्ती’ टळली

$
0
0
नैसर्गिक आपत्तीच्या काळात अहोरात्र राबणाऱ्या राज्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना अखेर न्याय मिळाला असून त्यांचा सेवाकरार दोन वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे. तसेच गेले आठ महिने बिनपगारी काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या वेतनाचीही तरतूद करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images