Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ABIL’ ग्रुपला ४६ लाखांचा दंड

$
0
0
महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा पद्धत‌ीने खोदकाम करून केबल टाकल्याप्रकरणी महापालिकेने एबीआयएल ग्रुपला ४६ लाख ५१ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मायक्रो कंपन्यांना राज्य सरकारचे बूस्टर

$
0
0
उद्योजकता वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरणाच्या पावलावर पाऊल ठेवले असून, मायक्रो कंपन्यांना सक्षम करण्याच्या दिशेने धोरण आखले आहे. ‘इंडस्ट्रिअल प्रमोशन सबसिडी स्कीम’अंतर्गत पुणे विभागात प्रत्येक वर्षी पाचशे मायक्रो युनिटना याचा लाभ होणार आहे.

शिवशाहिरांच्या लेखणीचा नजराणा वाचकांच्या भेटीला

$
0
0
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी प्रदीर्घ काळानंतर वाचकांच्या भेटीला येत आहे. वाचकांना सहाशे रुपयांमध्ये ती खरेदी करता येणार असून त्यासोबत राजा शिवछत्रपती ग्रंथाचे दोन खंड भेट देण्यात येणार असल्याचे पुरंदरे प्रकाशनाचे संचालक अमृत पुरंदरे यांनी सांगितले.

यवत मधील गैरव्यवहारांच्या चौकशीचे आदेश

$
0
0
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये अनधिकृत बांधकामांना परवानगी, अतिक्रमणे, गैरव्यवहार, टेंडर न मागविता कामांचे वाटप, मोठ्या रकमांची उचल, अर्धवट कामे, पैसे देऊनही कामे न होणे असे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

दांडेकर पूल येथे महिलेचा विनयभंग

$
0
0
जनता वसाहत येथे २४ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा घडला असून या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार महिला, त्यांची आई आणि ओळखीची एक व्यक्ती घरात असताना भांडणादरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी गणेश रमेश म्हामुणी (वय २५, रा. दांडेकर पूल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कँटोन्मेंटच्या कायापालटासाठी हवे २३८ कोटी

$
0
0
पुणे कँटोन्मेंटला सुमारे १९६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली असली, तरी एकही मलनिःस्सारण प्रकल्प नाही. पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी पुण्यावर अवलंबून रहावे लागते आणि जलशुद्धिकरणाची यंत्रणा तब्बल १२० वर्षे जुनी. पावसाळी गटाऱ्यांचा तर पत्ताच नाही...

दूध भेसळीवर हवी FDA ची ‘नजर’

$
0
0
दुधामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले आहे, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे दूध भेसळीच्या बाबतीत अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करायला हवी, असा सल्ला राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स व्यवसायमंत्री मधुकर चव्हाण यांनी दिला.

शिक्षण उपसंचालकांची पदे रद्द करण्याच्या हालचाली?

$
0
0
राज्यात विभागीय पातळीवरील शिक्षण उपसंचालकांची पदे रद्द करण्यासाठी शिक्षण विभागामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. या उपसंचालकांचे काम राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (बोर्ड) विभागीय अध्यक्षांकडे सोपविण्यात येणार असल्याचेही विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

वैद्यकीय अधिष्ठात्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

$
0
0
येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमधील मनोरुग्णाने केलेल्या मारहाणीत दोन पेशंटचा मृत्यू झाला. या प्रकरणी हॉस्पिटलमधील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. विलास भैलुमे यांना ‘कारणे दाखवा’नोटीस बजावण्यात आली आहे.

‘मेडिकल ट्रायब्युनल’ची मागणी

$
0
0
‘ग्राहक सुरक्षा कायद्यांतर्गत वैद्यकीय निष्काळजीपणाच्या संदर्भातील प्रकरणे हाताळण्यासाठी सर्व स्तरांवर न्यायवैद्यकीय प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी. तसेच, अशा प्रकरणात देण्यात येणाऱ्या भरपाईची रक्कम एक कोटी रुपयांपर्यंतच सीमित करण्यात यावी,’ अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेतर्फे विधी आयोग आणि कायदा मंत्रालयाकडे करण्यात येणारआहे.

‘शहर कार्यालयातील प्रकार टाळायला हवा होता’

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेला वाद योग्य नाही. रविवारी शहर कार्यालयात झालेला प्रकार टाळायला पाहिजे होता, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

टू बी ऑर नॉट टू बी...पालकांमध्ये संभ्रम

$
0
0
पहिली इयत्तेला जोडलेले पूर्वप्राथमिक वर्ग आणि पहिलीच्या प्रवेशांबाबतचे धोरण अद्याप स्पष्ट होत नसल्याने पालकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच काही शाळांचे बालवाडीचे प्रवेश सुरू झाले असल्याने, त्या प्रक्रियेत सहभागी व्हायचे अथवा नाही असा संभ्रमही पालकांपुढे आहे.

६५ हजार ग्राहकांच्या खात्यात थेट अनुदान

$
0
0
गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेसाठी (डीबीटीएल) आधार कार्डांची सक्ती करण्यासंदर्भात १० डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यात या संभ्रमातून काही मार्ग निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, डीबीटीएल अंतर्गत जिल्ह्यातील ६५ हजार ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये या योजनेतील अनुदान जमा झाले आहे.

औषधांची खरेदी दुपटीने करण्यास स्थगिती

$
0
0
डास, अळी प्रतिबंधक आणि जलपर्णीनाशक औषधांची दुप्पट दराने खरेदी करण्याच्या निर्णयाला मंगळवारी स्थायी समितीने स्थगिती दिली. समितीला चुकीची माहिती देऊन केल्या जाणाऱ्या या औषध खरेदीच्या प्रक्रियेची संपूर्ण तपासणी करून याबाबतचा अहवाल आठ दिवसात स्थायी समितीसमोर सादर करण्याचे आदेश समितीचे पालिका आयुक्तांना दिले आहेत.

रेडी रेकनरच्या दरवाढीचा प्रस्ताव

$
0
0
शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील रेडी रेकनरच्या दरात सरासरी १० ते १५ टक्के, तर शहरालगतचा भाग आणि ग्रामीण भागातील रेडी रेकनरच्या दरात १५ ते २० टक्के वाढीचा प्रस्ताव मूल्यांकन विभागाने सादर केला आहे. त्यामुळे आगामी वर्षात शहर व जिल्ह्यातील घरे महाग होण्याची शक्यता आहे.

‘आधी कळसा’चा वर्ग शिक्षकांसाठीच

$
0
0
पदव्युत्तर वर्गांना शिकविण्यासाठी पात्र शिक्षकांची कमतरता आणि उपलब्ध शिक्षकांच्या वेतनासाठी अनुदान मिळविण्याची धडपड, अशा अगतिकतेमधूनच पदव्युत्तर पातळीवर ‘आधी कळस आणि मग पाया’चा प्रकार घडत आहे.

वारसा स्थळ मालकांना ‘TDR’

$
0
0
पुण्यातील वारसा स्थळांचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेने विकास आराखड्यामध्ये महत्त्वपूर्ण तरतूदी केल्या आहेत. या वास्तूंच्या मालकांना प्रॉपर्टी टॅक्ससह इतर करांमध्ये सवलत मिळणार असून या वास्तूंच्या जीर्णोद्धारासाठी येणाऱ्या खर्चातील पन्नास टक्के रक्कम महापालिका देणार आहे, अशी माहिती महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.

केमिस्ट संपावर जाणार

$
0
0
प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासन वारंवार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील सुमारे ५५ हजार औषध विक्रेत्यांनी १६ ते १८ डिसेंबरदरम्यान बंद पुकारला आहे. १८ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.

बाबा मिसाळवर गुन्हा दाखल

$
0
0
नातूबाग येथील कबड्डी मैदानावरून झालेल्या वादातून कबड्डी संस्थेच्या कार्याध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कसबा विभागाचे पदाधिकारी राजेंद्र उर्फ अण्णा देशमुख यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. सातारा रस्त्यावर वाळवेकर लॉन येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

बहिःस्थांचे प्रवेश १० हजारांवर

$
0
0
पुणे विद्यापीठामध्ये पदव्युत्तर पातळीवरील बहिःस्थ अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा दहा हजारांवर गेली आहे. या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया विलंबाने राबविल्यानंतरही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने बहिःस्थ अभ्यासक्रमांना प्रतिसाद दिल्याचेच या आकड्यावरून स्पष्ट झाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>