Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

४ लाख पुणेकर ‘आधारा’विना

$
0
0
शहरातील तब्बल २७ लाख नागरिकांची आधार कार्डांसाठी नोंदणी झाली असून, अद्यापही चार लाख पुणेकरांची नोंदणी होणे बाकी आहे. सरकारी योजनांचे अनुदान घेण्यासाठी आवश्यक असलेल्या युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडी) योजनेतंर्गत गेले तीन वर्षे सुरू करण्यात आली आहे. उर्वरित चार लाख नागरिकांची नोंदणी पुढील काही महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न महापालिकेचा असणार आहे.

सर्वाधिक महाग फ्लॅट घोरपडीत

$
0
0
शहराच्या विविध भागांमधील फ्लॅट्सचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, येत्या वर्षासाठी घोरपडी परिसरातील फ्लॅट्स हे संपूर्ण शहरात ‘अपमार्केट’ ठरल्याचे समोर आले आहे. मूल्यांकन विभागाने सादर केलेल्या रेडी रेकनरच्या दरात घोरपडी परिसरात प्रतिचौरस फूट सव्वाअकरा हजार रुपये इतका दर प्रस्तावित करण्यात आला आहे.

मालमत्ता करातून १०० कोटी

$
0
0
एलबीटीमुळे सुमारे तीनशे रुपयांचा तोटा सहन करावा लागणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधण्यास सुरूवात केली असून मालमत्तांच्या सर्वेक्षणातून नव्याने १०० कोटी रुपयांचे उद्दीष्ट गाठण्याचे ठरविले आहे.

चितेत उडी घेऊन आत्महत्या

$
0
0
पुणे धनकवडी येथे जळत्या चितेत उडी मारल्याने एका मनोरुग्णाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दिमाखदार सुरेल सोहळा

$
0
0
गांधर्व महाविद्यालयातर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात तरुण गायिका रंजनी रामचंद्रन आणि प्रख्यात गायिका शुभा मुद्‍‍गल यांचं गायन रंगलं.

रंगली बहुपात्री स्पर्धा

$
0
0
एक्स्प्रेशन लॅबतर्फे आयोजित ‘गोइंग सोलो’ नाट्यमहोत्सवात एकूण सहा सर्वोत्कृष्ट सादरकर्ते ठरले. रंगमंचीय अवकाशाचा नेमका वापर करत एकाच कलाकारानं विविध पात्रं सादर करण्याचा हा प्रयत्न प्रथमच एका नाट्यमहोत्सवाद्वारे करण्यात आला.

अनुष्काची सतार पुण्यात वाजणार

$
0
0
प्रसिद्ध सतारवादक रवीशंकर यांची मुलगी अनुष्का शंकरचा लाइव्ह परफॉर्मन्स पुणेकरांना पाहाण्याची संधी आहे. खूप वर्षानंतर अनुष्का पुण्यात येत असल्यानं तिच्या या सादरीकरणात नावीन्य दिसेलच; शिवाय हा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरेल.

रेल्वेला ११ फेऱ्यांचा फटका

$
0
0
पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या एका लोकलचे तीन डबे नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. तीन दिवसांपासून नादुरुस्त असणाऱ्या या डब्यांमुळे रेल्वे प्रशासनाला अकरा फेऱ्यांचा फटका बसला.

रेल्वे स्टेशनसाठी सरकारकडून मोफत जमीन घ्या

$
0
0
हडपसर भागात रेल्वेस्टेशन सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी जमीन राज्य सरकारकडून मोफत मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करण्याचा आग्रह रेल्वे प्रवासी सल्लागार समितीने केला आहे.

पिंपरीतील धर्मशाळेतून अमली पदार्थ जप्त

$
0
0
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी मध्यरात्री पिंपरी येथे लालबहाद्दूर शास्त्री धर्मशाळेच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवलेली गांजा मिश्रीत तरंग आणि भांग असलेल्या १५ पोत्यांसह ३१ लाख २३ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

वाहतूक कोंडीवर ‘डीपी’त मार्ग

$
0
0
पुण्याचा विकास झपाट्याने झाल्याने पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या परिसराची शांतता कायमची भंग पावली असून, वाहतुकीच्या जंजाळात बोर्ड सापडले आहे. बोर्डाची शांतता पूर्वपदावर येणार नसली, तरी निदान वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शहर विकास आराखड्यात (डीपी) काही मार्ग दाखविण्यात आले आहेत.

जादूटोणाविरोधी कायद्याला पुरोहित संघाचाही विरोध

$
0
0
जादूटोणाविरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून नऊ आणि दहा डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या धरणे आंदोलनामध्ये पुरोहित संघ सहभागी होणार आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी पुरोहित वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहान पुरोहितांच्या कृती समितीचे सदस्य पंडित धुंडिराज पाठक, मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी केले आहे.

विद्यापीठ खून : आरोपींना सोमवारपर्यंत कोठडी

$
0
0
पुणे विद्यापीठातील सुरक्षारक्षकाच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींनी आतापर्यंत ४७ शस्त्रे वेगवेगळ्या गुन्हेगारांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांना नऊ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दाभोलकर हत्येप्रकरणी याच आरोपींनी शस्त्रपुरवठा केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बेकायदा वाळू वाहतूक : २३ ट्रकवर कारवाई

$
0
0
वाळू, खडी आणि मातीची बेकायदा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वानवडी भागात जिल्हा प्रशासनाने नुकतीच कारवाई केली. या कारवाईमध्ये २३ ट्रकवर कारवाई करून सुमारे पावणेपाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

आता नोंदणीकृत पानविक्रेते...

$
0
0
कोणत्याही हॉटेल, मिठाईच्या दुकांनामध्ये गेल्यावर दिसणारे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) परवानगीचे प्रमाणपत्र पानाच्या दुकानांतही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विषयांच्या प्रस्तावांवर शिफारशी बंधनकारक

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने (मॅनेजमेंट कौन्सिल) घेतलेल्या निर्णयांची परिणामकारकता वाढावी आणि त्यावर योग्य वेळेत योग्य ती कार्यवाही केली जावी, या साठी विद्यापीठाने पाऊल उचलले आहे.

संभाजी महाराजांना धमकावणा-यांविरोधात गुन्हा

$
0
0
छत्रपती शाहू महाराजांचे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराजांना फेसबुकवर ‘तुमचा दाभोलकर करू’ अशा शब्दांत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही पुन्हा ‘सुनावणी’?

$
0
0
जात पडताळणीचे प्रमाणपत्रासाठी तीन वर्षे हेलपाटे मारल्यावर एका उमेदवाराला अधिकृत प्रमाणपत्र मिळाले. पण तीन महिन्यानंतर त्याच उमेदवाराला पुन्हा जात पडताळणी विभागातून फोन येतो आणि तुम्हाला ‘सुनावणी’साठी कार्यालयात बोलावल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ‘वराती मागून घोडे’ असाच प्रकार संबंधित अर्जदाराला या कार्यालयातून नुकताच अनुभवयाला मिळाला.

‘JNNURM’वर जादा खर्च

$
0
0
प्रकल्पांना झालेला उशीर आणि प्रकल्पाच्या नियोजित रकमेपेक्षा जादा दराने आलेले टेंडर यामुळे जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांना पालिकेचा हिस्सा वगळून तब्बल ३८२ कोटी जादा खर्च झाल्याची कबुली महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी सभागृहात दिली.

यादव ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी

$
0
0
ऑलिम्पियन मल्ल नरसिंग यादव याने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावून इतिहास घडविला. तीन वेळा हा प्रतिष्ठेचा किताब पटकाविणारा नरसिंग पहिलाच मल्ल ठरला. यापूर्वी नरसिंगने २०११ आणि २०१२ मध्ये हा किताब पटकावला होता.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images