Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेची विद्यापीठानेच दिली ‘सुविधा’

$
0
0
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी थेट दुसऱ्या वर्षाची परीक्षा देण्याची ‘सुविधा’ उपलब्ध करून देण्यास पुणे विद्यापीठाने विशेष तरतूदच केली आहे! पदव्युत्तर वर्गांत घटती विद्यार्थिसंख्या आणि हे वर्ग चालविताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत कॉलेज पातळीवरील सोय म्हणून एका वर्षी कोणताही एक अभ्यासक्रम (पार्ट १ किंवा २) चालविण्याची मुभा देण्यात आली आहे.

राठोडची एकरभर जागा १ रुपयात सरकारजमा

$
0
0
गौण खनिजाच्या नियमबाह्य उत्खननप्रकरणी दंड न भरल्यामुळे बांधकाम व्यावसायिक किसन आणि पंडित राठोड यांच्या शिंदेवाडी येथील आणखी एका जागेचा लिलाव जिल्हा प्रशासनाने सोमवारी केला.

सोनसाखळ्या चोरीचे सत्र अद्याप सुरूच

$
0
0
शहरात सोनसाखळी हिसकावण्याच्या दोन घटनांमध्ये ८० हजार रुपयांचे दागिने लांबवण्यात आले. ताथवडे उद्यान आणि नवी पेठेत या घटना घडल्या असून, दुचाकीवरील अज्ञात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिवाळ्यातील पावसाने वैताग

$
0
0
ऐन हिवाळ्याच्या दिवसात पुणेकर चक्क पावसाळी वातावरणाचा अनुभव घेत आहेत. रविवारी उत्तररात्रीपासून सुरू झालेल्या पावसानंतर सोमवारी श्रावणसरींप्रमाणे दुपारभर उनपावसाचा लपंडाव सुरू होता.

मार्केट यार्डात आता ४०० CCTVची ‘नजर’

$
0
0
मार्केट यार्डमधील घाऊक बाजारपेठेमध्ये आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. या ठिकाणी ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून दोन महिन्यांच्या अवधीत या कामाला सुरुवात होणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक संजीव खडके यांनी सांगितले.

इंजिनीअर भरतीला हिरवा कंदील

$
0
0
महापालिकेच्या वतीने काही वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या ज्युनिअर इंजिनीअर पदांच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने राज्य सरकारने ही प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश पालिकेला दिले होते.

दैन्यावस्थेतून PMP डोकावणार भविष्यात

$
0
0
सामान्यांपासून राजकीय नेत्यांकडून टीकेची झोड उठविल्या जाणाऱ्या पीएमपीने पुढील वीस वर्षांचा बिझनेस प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी सेवेच्या दर्जांमध्ये वाढ करण्यासाठी हा प्रयोग केला जाणार असून उत्पन्नाच्या नव्या स्त्रोतांचा प्रामुख्याने विचार करुन हा प्लॅन तयार केला आहे.

सचिनची तिकिटे : पोस्टाला १० लाखांची कमाई

$
0
0
‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी क्रिकेटप्रेमींचे त्याच्यावरील प्रेम कायम असल्याचे टपाल खात्यामुळे दिसले आहे. टपाल खात्याने तेंडुलकरवर काढलेल्या तिकिटाला क्रिकेटरसिकांनी दाखविलेल्या प्रेमामुळे पुणे विभागात अवघ्या १५ दिवसांत तब्बल १० लाख रुपयांची विक्री झाली आहे.

‘ते’ आरोपी दाभोलकर हत्या प्रकरणातीलच?

$
0
0
पुणे विद्यापीठातील सुरक्षारक्षकाच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या चौघांकडे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भातील तपासही करण्यात येत आहे.

फक्त शिक्षणहक्काचेच प्रवेश ONLINE?

$
0
0
बालवाडी आणि पहिलीचे केवळ २५ टक्के राखीव जागांचे प्रवेशच ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने होतील, अशी चिन्हे आहेत. उर्वरित ७५ टक्के जागा शाळांनी नेहमीप्रमाणे; परंतु राज्य सरकारने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार भराव्यात, असा तोडगा निघण्याची शक्यता आहे.

फरार कैदी पुण्यात जेरबंद

$
0
0
संचित रजेवर सुटल्यानंतर जेलमध्ये न परतता पसार झालेल्या कैद्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. कोल्हापूर जेलमध्ये मुलीचा खून प्रकरणी तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. राजू किसन माने (वय ३२, रा. सिंदवणी) असे अटक करण्यात असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पीएमपी सुटणार मंडईतूनच

$
0
0
महात्मा फुले मंडई परिसरात वारंवार होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी येथून पीएमपी बस सुरू करण्याचा अभिनव प्रयोग राबविण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

जिल्ह्यात वाळूचा ई- लिलाव

$
0
0
पुणे जिल्ह्यातील ९० भूखंडांवरील वाळू उपशांचे लिलाव येत्या १२ आणि १३ डिसेंबर रोजी होणार आहेत. यंदा प्रथमच इ-ऑक्शन पद्धतीने हे ऑनलाइन लिलाव होत असून त्यामुळे लिलावातील संगनमत, दमदाट्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे.

मिर्झा गालिब मराठीत येतोय...

$
0
0
उत्तमोत्तम शेर-गझला लिहिणाऱ्या थोर उर्दू शायर मिर्झा गालिब यांच्या रचनांचा आता मराठीतूनही आस्वाद घेता येणार आहे. अर्वाचिन काव्याचे अभ्यासक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी गालिबचे साहित्य आणि चरित्र या विषयावर द्विखंडात्मक प्रकल्प प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

बंडखोरी रोखण्यासाठी राज मैदानात

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी सोमवारी थेट पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. ‘गेल्या काही दिवसांत घडलेल्या सर्व घटनांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली आहे. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल,’ असेही नाराजांच्या गोटातून सांगण्यात आले.

आधी कळस, मग पाया!

$
0
0
पाया पक्का करून वर इमला बांधण्याच्या मूलभूत धड्याचा पुणे विद्यापीठाला विसर पडला असून, विद्यार्थ्यांना आपल्याच कॉलेजमध्ये टिकवून ठेवण्यासाठी पहिल्या वर्षाचा प्रवेश देऊन थेट दुसऱ्या वर्षाची परीक्षा द्यायला लावण्याची ‘प्रथा’ विद्यापीठात जोर धरत आहे.

जुन्या शिवसैनिकांना गेट आऊट!

$
0
0
माजी खासदार आणि चार दशके शिवसेनेत सक्रीय राहिलेल्या मोहन रावले यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला असताना पुण्यातही उप जिल्हाप्रमुख असलेल्या एका २९ वर्ष जुन्या सैनिकाची हकालपट्टी करण्यात आल्याने निष्ठावंत सैनिकांमध्ये पक्ष नेतृत्वाबद्दल नाराजीची लाट पसरली आहे.

अग्निशमन केंद्रांचे आठवड्यात एकदा मॉकड्रील

$
0
0
अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयात महिनोमहिने धूळखात पडलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या साहित्याचा वापर नियमितपणे होऊन याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व्हावे, यासाठी शहरातील सर्व अग्नीशमक केंद्रांनी आठवड्यातून एकदा मॉकड्रील घ्यावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे.

संजय दत्तचा पॅरोल ‘पोलिस कस्टडीत’

$
0
0
येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला पॅरोल देण्याबाबतचा अहवाल मुंबई पोलिस आयुक्तांकडून अद्याप विभागीय आयुक्तांना मिळालेला नाही. त्यामुळे त्याच्या पॅरोलबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

LBT चुकविणा-या हॉस्पिटलची इमारत ‘सील’

$
0
0
अद्ययावत उपकरणे आणि इतर साधनसामग्री आयात करूनही त्यावर स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करून सोमवारी तीन मजले सील करण्यात आले. हॉस्पिटलचे अद्याप बांधकाम सुरू असून, कोणीही पेशंट नसल्याने इमारत सील करण्यात आल्याचे एलबीटी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>