Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोलिसांत तक्रार दाखल करणे शक्य

$
0
0
‘एटीएम’मधून रक्कम कमी आली किंवा पैसे आलेच नाहीत, तर पोलिसांत तक्रार दाखल होऊ शकते. यासाठी तक्रारीच्या अर्जाबरोबर संबंधित तक्रारीची ‘एटीएम’ पावती जोडावी, असे पोलिसांनी सांगितले.

एकहाती सत्ता आणा

$
0
0
‘काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापासून संघटना मजबूत करून देशात २७२ जागा मिळवून दिल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच काय, अन्य कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याची गरज भासणार नाही,’ असा संदेश देत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यात काँग्रेसजनांना एकहाती सत्ता मिळवून देण्याचे आवाहन केले.

संजय दत्तचा कार्यक्रम रद्द

$
0
0
अभिनेता कैदी संजय दत्तचा सहभाग असलेला आणि येरवडा कारागृहाने आयोजित केलेला आजचा ‘महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन’ हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणामुळेच हे पाऊल उचलण्यात आल्याचे कारागृहाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

गांजामिश्रित तरंग गोळ्या जप्त

$
0
0
बी. टी. कवडे रोडवर गांजामिश्रित तरंग गोळ्या विक्रीसाठी घेऊन आलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातून साडे पाच किलो गांजामिश्रित गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

केदारचं ‘लाख’मोलाचं गाणं

$
0
0
युवा संगीतकार केदार भागवत यानं यू-ट्यूबवर प्रसिद्ध केलेल्या ‘श्वास मी’ या गाण्यानं लाखांहून अधिक हिट्स मिळवले आहेत. हरिहरन यांचे स्वर लाभलेल्या या गाण्याला तरुणांची पसंती मिळतेय.

४० टक्के विद्यार्थी लठ्ठंभारती

$
0
0
देशाचे भवितव्य समजल्या जाणाऱ्या दहावीपर्यंतच्या ४० टक्के शालेय विद्यार्थ्यांना लठ्ठपणाने वेढले आहे. त्यामुळे शालेय मैदानावर धावण्यापेक्षा आता विद्यार्थ्यांना ‘कम्प्युटर गेम’च अधिक जवळचे वाटत आहेत.

दुचाकी चोरांची टोळी गजाआड

$
0
0
जुन्नर, खेड तालुक्यात मोटारसायकली चोरून त्या लिलावात घेतल्याची बतावणी करून अशिक्षित आदीवासींना विकण्याचा फंडा चालवणाऱ्या दुचाकीचोरांची टोळी ओतूर पोलिसांनी गजाआड केले आहे.

नागरिकांच्या सूचनांची नोंद घेऊ!

$
0
0
नागरिकांच्या सूचनांची नोंद घेतल्यानंतरच केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे कस्तुरीरंगन पश्चिम घाट जैवविविधता अहवालावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

जलस्रोत प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई

$
0
0
जलस्रोतांचे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांकडून आता पाच टक्के दंडनीय पाणीपट्टी आकारणी करण्यात येणार असून, दंडात्मक कारवाईनंतरही प्रदूषण केल्यास संबंधित उद्योगाचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

अजितदादांचा पंढरपूर दौरा रद्द

$
0
0
वारकरी संप्रदाय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेकडे पाठ फिरवली आहे. अजित पवारांनी पंढरपूरचा पूर्वनियोजित दौरा तडकाफडकी रद्द केला आहे. महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.

जतन एका ऐतिहासिक कालखंडाचे

$
0
0
समाजसुधारक विठ्ठलराव वंडेकर आणि रामचंद्रराव वंडेकर यांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी मराठी सोसायटीतर्फे संस्थेच्या लायब्ररीचे नामकरण नुकतेच ‘वंडेकर लायब्ररी हॉल’ असे करण्यात आले. त्या निमित्ताने...

ब्राह्मण महासंघाची राज्यव्यापी रथयात्रा

$
0
0
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे १७ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संत रथयात्रा आयोजित केली आहे.

आदिवासींना सक्षम करणार

$
0
0
‘आदिवासींना स्थलांतर आवडत नाही, पण पर्यायच नसल्याने ते शहराकडे वाट्टेल ती कामे स्वीकारतात.

वाढत्या नक्षलवादास खाणकंपन्याही जबाबदार

$
0
0
‘स्वतःच्या स्वार्थासाठी खाणकाम उद्योजक कंपन्या टप्प्याटप्प्याने खेड्यापाड्यातील आदिवासींचा विश्वास संपादन करतात आणि विकासाची प्रलोभने दाखवत त्यांच्या जमिनी बळकावून खाणकाम करीत आहेत.

लोणावळ्यात मालमत्तेच्या वादातून खून

$
0
0
वडिलोपार्जित जागेच्या व घराच्या किरकोळ वादामधून लोणावळ्यातील वलवण गावात सख्या चुलत भावाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री साडे दहा वाजता घडली.

लाच घेतली : आदिवासी अधिका-याला अटक

$
0
0
निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना न पाठविण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आदिवासी अधिकाऱ्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बनावट डॉक्टरला फसवणुकीवरून अटक

$
0
0
हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या पेशंटला बाहेरून रक्त आणावे लागेल, असे सांगून बँकेच्या खात्यावर वीस हजार रुपये भरावयास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी एका बनावट डॉक्टरला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

बनावट औषधे विक्रेता अटकेत

$
0
0
कंपनीचा बनावट लोगो वापरून औषधांची विक्री करणाऱ्या औषधे विक्री केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टाने १६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

वेबसाइट अपडेट करण्यात शिक्षणमंडळ ‘नापास’

$
0
0
बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरून शालेय विद्यार्थ्यांना अपडेट राहण्याची शिकवण देणाऱ्या पालिकेच्या शिक्षणमंडळाला मात्र स्वत:ची वेबसाइट ‘अपडेट’ करायला वेळ मिळत नसल्याचे समोर आले आहे.

सर्वेक्षणाच्या कामासाठी वेळ देण्याच्या सूचना

$
0
0
पालिकेतील कर्मचाऱ्यांना आर्थिक सर्वेक्षणाच्या कामाला जुंपण्यात आल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याचे लक्षात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images