Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मंदीचा फटका छोट्या कंपन्यांना

$
0
0
बाजारपेठेतून मंदावलेली मागणी, निवडणुका या पार्श्वभूमीवर मोठ्या कंपन्यांचे उत्पादन १० ते १५ टक्के कमी झाले आहे आणि याचा सर्वाधिक फटका लहान आणि मध्यम आकाराच्या (एसएमई) कंपन्यांना बसला आहे.

‘लखन’ करणार मराठी सिनेमानिर्मिती

$
0
0
‘झकाऽऽऽस’... डोळ्यांवर गॉगल चढवलेल्या अनिल कपूरने आपल्या खास शैलीत अशी झोकात एंट्री घेतली आणि खूप वर्षांनी पुन्हा एकदा आपण चक्क ‘लखन’लाच समोर पाहात असल्याची साक्ष उपस्थितांना पटली.

‘एफआयआर’ पाहिजेच, पण...

$
0
0
तळेगाव दाभाडे येथे तक्रार दाखल करून न घेतल्याने युवतीने केलेली आत्महत्या असो, की बिबवेवाडी येथे केबल व्यावसायिकाचा झालेला खून... तक्रार दाखल न केल्यामुळे घडलेल्या या घटना आहेत.

भाजपचा कारभार सामूहिक पद्धतीनेच चालतो

$
0
0
‘भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र, पक्षाचा कारभार सामूहिक पद्धतीनेच चालतो,’ असा दावा पक्षाचे प्रवक्ते राजीवप्रताप रुडी यांनी मंगळवारी केला.

‘पंतप्रधानपदाचा उमेदवार राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता हवा’

$
0
0
‘हिंदू राष्ट्रवादाची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरात मांडणे ठीक आहे; परंतु पंतप्रधानपदाचा उमेदवार हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता असू नये. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराने भारतीय राष्ट्रवादाचाच पुरस्कार केला पाहिजे,’ असे मत खासदार अमरसिंह यांनी मंगळवारी व्यक्त केले.

सामान्य माणूस राजकारण्यांना योग्य वेळी ताकद दाखवील

$
0
0
‘सध्या राजकारणी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी कोणत्याही गोष्टीचा वापर करत आहेत. जात-पात, पैसा आणि बळाच्या जोरावर राजकारण केले जात आहे.

संशयकल्लोळ... तिचा आणि त्याचा!

$
0
0
समुपदेशनातून कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलिस आयुक्तालयातील महिला सहाय्य कक्षात येणाऱ्या तक्रारींमध्ये माझ्या पतीचे किंवा पत्नीचे ऑफिसमध्ये ‘अफेअर’ आहे, अशी व्यथा अलीकडे सातत्याने मांडली जाते आहे.

दरोडा घालणारी टोळी गजाआड

$
0
0
सॅलिसबरी पार्क परिसरात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटण्याऱ्या टोळीतील चौघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत आणखी तीन गुन्हेगार सामील असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त रामनाथ पाकळे यांनी दिली.

चीनच्या इंजिनीअरचा पाण्यात बुडून मृत्यू

$
0
0
विमाननगर येथील ‘हयात रिजेंसी’ या हॉटेलमधील स्विमिंग टँकमध्ये पोहोण्यास गेलेल्या चीनच्या स्वॉफ्टवेअर इंजिनीअरचा सोमवारी रात्री पाण्यात बुडून मृत्यू झाला.

आरक्षण बदला : बागुल यांचे आरोप खोटे

$
0
0
‘पर्वती शिवदर्शन येथील आरक्षण बदलाबाबत काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी केलेले आरोप खोटे असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे काम बागुल करत आहेत,’ अशी टीका सभागृह नेते सुभाष जगताप यांनी केली.

७ वर्षांत ‘BRT’चे ‘सेफ्टी ऑडिट’च नाही

$
0
0
‘बीआरटी’ मार्गातील धोके दूर करण्याचे जाहीर आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या सात वर्षांत ‘बीआरटी’चे ‘रोड सेफ्टी ऑडिट’च करणे शक्य झालेले नाही.

‘RTO’, ‘विक्रीकर’कडून मागविली माहिती

$
0
0
जकात रद्द करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्थानिक संस्था करातून (एलबीटी) पालिकेला पहिल्या सहा महिन्यांत अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने पालिकेचा डोलारा सांभाळण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून माहिती घेण्याची शक्कल पालिका प्रशासनाने लढविली आहे.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

$
0
0
बीआरटी ‌मार्गावरील त्रुटी दूर करण्याची मागणी वारंवार पालिका प्रशासनाकडे करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या वाहतूक नियोजन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.

‘परीक्षा’ आली तरी ‘अभ्यास’ अपूर्णच

$
0
0
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बीआरटी’ सेवेच्या अंमलबजावणीची परीक्षा जवळ आली, तरी अभ्यास अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे ‘रिझल्ट’बाबत प्रवासीदेखील साशंक आहेत.

परीक्षेच्या ताणामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0
कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये (सीओईपी) शिकणाऱ्या संगमेश्वर जाधव या विद्यार्थ्याने मंगळवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली.

‘आरटीओ’ बनलेय भ्रष्टाचाराचे कुरण

$
0
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) पैसे खाण्याच्या प्रचलीत पद्धतींचा अभ्यास केला असून, त्यास आळा घालण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात येत आहे.

‘बहिःस्थ’वर आज अंतिम निर्णय

$
0
0
बहिःस्थांच्या प्रश्नांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची आज (बुधवार) बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जलस्रोत प्रदूषित करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

$
0
0
जलस्रोतांचे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांकडून आता पाच टक्के दंडनीय पाणीपट्टी आकारणी करण्यात येणार असून, दंडात्मक कारवाईनंतरही प्रदूषण केल्यास संबंधित उद्योगाचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ही दंडात्मक आकारणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईव्यतिरिक्त असेल. हा निर्णय राज्यभरासाठी लागू असेल.

सहारा इंडिया : विभागीय आयुक्तांची साक्ष

$
0
0
सहारा इंडियाच्या लोणावळा येथील जमीन खरेदी प्रकरणी विभागीय आयुक्तांची मंगळवारी विधिमंडळाच्या आश्वासन समितीसमोर साक्ष घेण्यात आली.पवना धरणालगत सहारा इंडियाने शेकडो एकर जमिनीवर अॅम्बी व्हॅली लेकसिटी प्रकल्प उभारला आहे.

गांधीहत्येनंतर मराठी साहित्य प्रभावहीन: गिरीश कार्नाड

$
0
0
‘गांधीहत्येनंतर मराठी साहित्य ‘अतिसभ्य’ झाल्याने त्याचा प्रभाव ओसरला. परिणामी, देशातील सर्वोच्च प्रतिष्ठा असलेल्या ज्ञानपीठसारख्या पुरस्कारापासून ते दूरच राहिले,’ असे परखड मत ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड यांनी व्यक्त केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images