Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पवनेच्या प्रकल्पामुळे खर्चाचा भुर्दंड

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना थेट जलवाहिनीच्या प्रलंबित प्रकल्पांमुळे कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच, प्रकल्पाचे काम पूर्ण न झाल्यास यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले अनुदान त्यांना परत करावे लागेल, अशी भीती सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (२० सप्टेंबर) व्यक्त करण्यात आली.

हॉस्पिटलमधून आरोपीचे पलायन

$
0
0
बारामती सबजेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणारा घरफोडीतील आरोपी शुक्रवारी (२० सप्टेंबर) सकाळी ससून हॉस्पिटलमधून पळाला. मुळचा कासेवाडी येथील असलेल्या या आरोपीला बारामती परिसरात घरफोडी करताना अटक करण्यात आली होती.

३५ लाखांचे सोने जप्त

$
0
0
दुबई येथून सव्वा किलो सोन्याची तस्करी करून पुणे विमानतळावर लँडिंग केलेल्या हसन जमालउद्दीन खान या आरोपीला कस्टम विभागाने गुरुवारी (१९ सप्टेंबर) ताब्यात घेतले.

‘अंनिस’चे आता निषेध आंदोलन

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला एक महिना होऊनही तपास न लागल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तनवादी संघटनांतर्फे आता आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

‘पीएमपी’चे ९०% मार्ग तोट्यात

$
0
0
सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी पुणेकर टाहो फोडत असताना ‘पीएमपी’तर्फे चालविण्यात येणाऱ्या ३५७ मार्गांपैकी तब्बल ९० टक्के म्हणजेच ३२२ मार्ग तोट्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांचा ‘सोर्स’ होता उस्मानी!

$
0
0
मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोक्का कोर्टातून पसार झालेल्या अफझल उस्मानीची ओळख इंडियन मुजाहिद्दीनचा सक्रिय सदस्य म्हणून करून दिली जात आहे. पण खरं तर, हा उस्मानी पोलिसांचा मोठ्ठा ‘सोर्स’ ठरला होता आणि त्याच्याचमुळे इंडियन मुजाहिद्दीनचं, भटकळ बंधूंचं बिंग फुटू शकलं होतं.

...तरच ‘रुपी’च्या विलिनीकरणाला मान्यता

$
0
0
सर्व ठेवीदार-खातेदारांचे शंभर टक्के पैसे मिळणार असतील, तरच रुपी बँकेच्या सारस्वत बँकेतील नियोजित विलीनीकरणाला मान्यता देऊ, अन्यथा त्याला विरोध करण्यात येईल, असा इशारा रुपी बँक हक्करक्षक बचाव समितीच्या वतीने शनिवारी देण्यात आला.

मतदार नोंदणीची आज मोहीम

$
0
0
जिल्हा प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मतदारयादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेत आज (रविवारी) शहरातील सर्व मतदान केंद्रांमध्ये मतदार नोंदणी आणि यादीत दुरुस्ती करण्याची कामे करण्यात येणार आहेत.

समन्वयाअभावी दिरंगाई

$
0
0
माननीयांच्या हौसेपायी सुरू केलेले आणि नंतर तोट्यात गेलेले बसमार्ग बंद करण्यामध्येही संचालक मंडळ आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने तोट्यातील बसमार्गांची संख्या कमी करण्यात दिरंगाई सुरू आहे.

वृक्षतोडीची स्थगिती हायकोर्टाने उठविली

$
0
0
शहराच्या हद्दीत वृक्षतोडीसाठी असलेली स्थगिती उठवताना, त्या संदर्भातील जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळली. मात्र, वृक्ष तोडीसाठी परवानगी देताना काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना पालिकेला देण्यात आल्या आहेत.

‘नापास’ विद्यार्थ्यांची पुन्हा घेणार परीक्षा

$
0
0
प्रश्नपत्रिकेतील गुणांचे बदलेले स्वरूप आणि अभ्यासक्रमातील बदलानुसार नसलेल्या प्रश्नपत्रिका ही परीक्षा विभागाची झालेली चूक अखेर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्य केली.

कल्पना बहिरट यांना अटक आणि सुटका

$
0
0
पुणे महापालिकेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बनावट जातप्रमाणपत्र दाखल करून नगरसेविका झालेल्या कल्पना बहिरट यांना बंडगार्डन पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली.

भेकड राज्यकर्ते, अंधश्रद्ध पोलिसांमुळे गुन्हेगार मोकाट

$
0
0
उजेडाला घाबरणा-या सध्याच्या भेकड राज्यकर्त्यांकडून सामाजिक न्यायाची अपेक्षा कशी करणार, असा परखड सवाल ज्येष्ठ नेते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांनी शनिवारी विचारला.

प्राध्यापकाची नेट बँकिंगद्वारे फसवणूक

$
0
0
न-हे येथील इंजिनीअरिंग कॉलेजातील प्राध्यापकाची इंटरनेट बँकिंगद्वारे फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खात्यातील पैसे काढून घेण्यापूर्वी सिमकार्ड बंद केल्याचे समोर आले आहे.

२ लाखांचे भेसळयुक्त तेल जप्त

$
0
0
सरकीसह अन्य तेलाचे मिश्रण करून भेसळयुक्त तेलाची विक्री करणाऱ्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्याकडून दोन लाखांचा तेलाचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

स्टेशनरी संपली : RTO चे कामकाज बंद

$
0
0
नवे वाहन आणि लायसन्ससंदर्भातील फी घेण्याच्या पावत्या संपल्याने ‘आरटीओ’तील कामकाज शनिवारी थांबले. परिणामी, लर्निंग लायसन्स आणि नव्या वाहनांच्या नोदंणीसाठी आलेल्या लोकांची गैरसोय झाली.

आई-बाबा जेव्हा मांडतात मुलीची ‘सहसंवेदना’

$
0
0
मुलगी ही ‘वजावट’, मुलगी म्हणजे ‘ओझे’, मुलगी झाली की खिशाला कात्री... ...मुलगी झाल्याचा अभिमान बाळगून मुलीबद्दलची अशी मानसिकता दूर करण्याचे समाजधनुष्य पेलण्याच्या मोहिमेने आता बाळसे धरले आहे.

‘प्लेटलेट’चा पुन्हा तुटवडा

$
0
0
शहरातील हॉस्पिटलमध्ये डेंगीच्या पेशंटच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्यासाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या ‘प्लेटलेट’ची डिमांड वाढल्याने रक्तपेढ्यांमध्ये त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

दादांचा सहकार मंत्र्यांवर निशाणा

$
0
0
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत समाप्त झाल्यामुळे राज्य सरकारने पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची तातडीने निवडणूक घ्यावी, असा ठराव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात शनिवारी मंजूर करण्यात आला.

पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त

$
0
0
शिरूरजवळील सणसवाडी येथील एका घाऊक विक्रेत्याकडून दोन लाख ७७ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्या विक्रेत्याच्या विरोधात पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images