Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जामीन मिळाल्यानंतरही अटक करणाऱ्या पोलिसांना नोटीस

$
0
0
सदनिकेमध्ये अतिक्रमण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात महिलेला कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मिळलेला असतानाही तिला अटक केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांना नोटीस बजावण्यात आली आहे.

पोलिस, भाडेकरूंच्या चौकशीचे आदेश

$
0
0
कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार भाड्याने दिलेल्या दुकानाचा ताबा घेतलेला असतानाही जागामालकावर घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकारी आणि भाडेकरूंची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

महिलेने दिला ४ अर्भकांना जन्म

$
0
0
संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये एका महिलेने चार अर्भकांना जन्म दिल्याची घटना शुक्रवारी (२० सप्टेंबर) घडली. अनिता हातागळे (वय २५) असे या महिलेचे नाव आहे.

आरक्षण निश्चितीनंतर वाजले निवडणुकीचे नगारे

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंटच्या निवडणुकीत महिलांसाठी तीन वॉर्ड आरक्षित झाले असून, या आरक्षणाद्वारे कॅन्टोन्मेंटच्या निवडणुकीचे नगारे वाजले. विद्यमान नगरसेवक प्रसाद केदारी यांचा वॉर्ड खुला गटासाठी राहिला असून, शैलेंद्र बिडकर, संतोष कवडे आणि मन्जूर शेख यांचे वॉर्ड महिलांसाठी राखीव झाले आहेत.

मलशुद्धिकरण प्रकल्पाला रेड सिग्नल

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून उभारण्यात येणाऱ्या पहिल्या मलशुद्धिकरण प्रकल्पाला (एसटीपी) ‘रेड सिग्नल’ मिळाला आहे. हा प्रकल्प उभारण्यास कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

कॅन्टोन्मेंट उभारणार पहिला बायोगॅस प्रकल्प

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंटच्या परिसरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बोर्डाकडून पहिला बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याद्वारे तयार करण्यात येणाऱ्या विजेचा वापर बोर्डासाठीच केला जाणार आहे.

येत्या पंधरवड्यात उतरणार कांद्याची तेजी

$
0
0
कर्नाटकमधून नवीन कांदा बाजारपेठेत दाखल झाल्यामुळे गेल्या आठवड्यापासून तेजीत असणारे कांद्याचे दर उतरायला सुरुवात झाली आहे. कांद्याचे दर आवाक्यात येण्यासाठी ग्राहकांना आणखी दहा ते पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे.

‘बहिःस्थ पदव्युत्तर’ची प्रवेश प्रक्रिया खोळंबलेलीच

$
0
0
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी विद्यापीठ ‘एक्स्टर्नल टू एक्स्टर्नल’ या तत्त्वावर ठाम आहे. मात्र, त्यावर अद्याप शिक्कामोर्तब होत नसल्याने बहिःस्थची प्रथम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया खोळंबलेलीच आहे.

इंजिनीअरिंग कृती समितीची ‘कॅरीऑन’ची मागणी

$
0
0
पुणे विद्यापीठातून २००८ च्या अभ्यासक्रमानुसार इंजिनीअरिंगची परीक्षा देणाऱ्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘कॅरीऑन’ देण्यात यावा, अशी मागणी पुणे विद्यापीठ इंजिनीअरिंग कृती समितीतर्फे करण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसाठी ८ हजार अर्ज

$
0
0
पालिकेतर्फे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर शिष्यवृत्तीसाठी सुमारे साडेआठ हजार अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व अर्जांच्या छाननीनंतर यंदा तरी विद्यार्थ्यांना वेळेवर निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

अल्प, मध्यम उत्पन्न गटाचे घराचे स्वप्न भंगले

$
0
0
शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठीच्या राखीव घरांच्या कोट्यावर पालिकेनेच ‘बुलडोझर’ फिरविला आहे.

खर्चाच्या हातमिळवणीची गरवारे ‘बालभवन’ला चिंता

$
0
0
महापालिकेसोबतच्या नव्या करारान्वये मासिक ६० हजार रुपयांचा बोजा वाढणार असल्याने उत्पन्नवाढीसाठी काही इतर उपक्रम हाती घ्यावे लागण्याचे संकेत गरवारे ‘बालभवन’च्या विश्वस्तांनी दिले आहेत.

अतिक्रमण कारवाईवर विघ्न

$
0
0
म्हात्रे पुलालगतचा डीपी रोड नदीपात्रातील रस्त्याला जोडण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा ‘मुहूर्त’ पालिकेने शुक्रवारी ठरविला खरा; परंतु नगरसेवकांच्या दबावामुळे या जोड रस्त्याच्या कामामध्ये पुन्हा विघ्न उभे राहिले आहे.

पोलिस आयुक्तालयात गोंधळ

$
0
0
एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या पती-पत्नीच्या नातेवाइकांमध्ये शुक्रवारी (२० सप्टेंबर) दुपारी पोलिस आयुक्तालयातच जुंपली. हमरीतुमरीवर आलेल्या भांडणांनंतर त्यांच्यात हाणामारीही झाली.

बनावट नोटा : ६ परप्रांतीयांना अटक

$
0
0
लोणावळ्यात बनावट नोटा चालवून व्यापारी व व्यवसायिकांची फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगाल येथील एका रॅकेटमधील सहा जणांना लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे.

खरिपाचा कांदा ऑक्टोबरमध्ये बाजारात

$
0
0
राज्यात खरिपाच्या हंगामात लागवड केलेला कांद्याचे उत्पादन साडेसात लाख मेट्रिक टनापर्यंत जाण्याची शक्यता असून हा कांदा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये बाजारात येणार आहे.

रिअल इस्टेट एजंटचे अपहरण

$
0
0
जमिनीचा व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकाचे अपहरण करून सात लाख रुपयांची खंडणी उकळण्याची घटना पौड येथे घडली. या प्रकरणी संशयितांचे स्केच तयार करण्यात आले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

वर्गणीच्या रकमेवरून कोयत्याने मारहाण

$
0
0
जमा झालेली वर्गणीची रक्कम आणि चांदी गणेश मंडळाकडे जमा करण्यास सांगितल्याचा राग आल्याने उत्सवप्रमुखाने मंडळाच्या उपाध्यक्षाच्या भावावर कोयत्याने वार केले.

विसर्जन मिरवणुकीत पोलिसाला धक्काबुक्की

$
0
0
धनकवडी येथील कानिफनाथ चौकात शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना अडविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार विसर्जन मिरवणुकीत घडला.

सामान्यांचे मरण माननीयांना स्वस्त

$
0
0
आपल्या मर्जीतील व्यक्तीला टेंडर, टीडीआर मिळावा, यासाठी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरून तासनतास चर्चेचे गुऱ्हाळ चालविणाऱ्या महापालिकेतील ‘माननीयांना’ सर्वसामान्यांचे कोणतेही देणेघेणे नसल्याचे शुक्रवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images