Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गणेश मंडळांवरील खटले मोफत चालविणार

$
0
0
गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांवर दाखल होणारे खटले पुणे बार असोसिएशनच्या पुढाकाराने मोफत चालविण्यात येणार आहेत. गणेश मंडळांवर अनेकदा कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे खटले दाखल होतात.

तुरुंगात आढळला मोबाइल

$
0
0
येरवडा तुरुंगामधील सर्कल तीनमध्ये एक मोबाइल फोन कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दुपारी सापडला. तुरुंगामध्ये मोबाइल कसा आला याची चौकशी जेल प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे.

‘बहिःस्थ’ पदव्युत्तर पातळीवरही ‘बहिःस्थ’च

$
0
0
पुणे विद्यापीठाने बहिःस्थ विद्यार्थ्यांविषयी नुकत्याच घेतलेल्या निर्णयांचा येत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये पुनर्विचार होण्याची शक्यता आहे.

सणासुदीतही पाणी कमीच

$
0
0
ऐन सणासुदीच्या काळात पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शनिवारी शहराच्या बऱ्याच भागांतील पाणीपुरवठा विस्कळ‌ित झाला.

‘स्वच्छ’मुळे नदी स्वच्छ

$
0
0
निर्माल्य नदीत सोडून जलप्रदूषणाला हातभार लावू नका, निर्माल्य आमच्या स्वाधीन करा, आम्ही तुम्हाला खत देतो असे आवाहन करणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेच्या कचरावेचकांमुळे नदीत सोडले जाणाऱ्या निर्माल्याचे प्रमाण आता कमी होते आहे.

५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

$
0
0
शिक्रापूर येथील एका शिक्षण संस्थेच्या संचालकाने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.

जेजुरी गडावरील गोंधळ अन् विद्युत रोषणाई

$
0
0
सदाशिव पेठेसह नवी पेठेतील काही मंडळांनी विद्युतरोषणाईवर भर देत असताना हत्ती गणपती मंडळाने केलेला जेजुरी गडावरील जागरण गोंधळ हा हलता देखावा लक्ष वेधून घेत आहे.

देखावे पाहण्यासाठी गर्दी

$
0
0
बाप्पाच्या प्रतिष्ठापनेपासून साथ देणाऱ्या पावसाने शनिवारी विश्रांती घेतली अन् देखावे पाहण्यासाठी सायंकाळपासून शहरातील रस्त्यांवर भाविकांची गर्दी झाली होती.

देखाव्यांचा ‘लाइव्ह’ माहौल

$
0
0
ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक विषयांशी संबंधित प्रसंग ठराविक आणि साचेबद्ध चौकटीत मांडण्याऐवजी ‘लाइव्ह’ सादर करून भक्तांपर्यंत थेट संदेश घेऊन जाणाऱ्या जिवंत देखाव्यांनी यंदा शहरात शतकी टप्पा ओलांडला आहे.

हार्डवेअर साहित्यातून गणेशमूर्ती

$
0
0
गणपती बाप्पा म्हणजे बुद्धी आणि कलेला प्रोत्साहन देणारे दैवत. त्यामुळे कलेच्या माध्यमातूनच या दैवताची अनोखी रूपे साकारून कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकल्प कलाकार मुकुंद दातार यांनी केला आहे.

पुणे पोलिसच केस ‘क्रॅक’ करतील

$
0
0
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अन्य कोणत्याही यंत्रणेकडे देण्याची गरज नसून या एजन्सींच्या मदतीने पुणे पोलिसच या गुन्ह्याचा शोध लावतील,’ असा विश्वास गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला.

दरवाढीची कोसळली ‘वीज’

$
0
0
वीजनिर्मिती प्रकल्पांचा वाढलेला खर्च आणि इंधनआकार या महानिर्मितीच्या खर्चांची रखडलेली वसुली करण्यास मान्यता मिळाल्यामुळे राज्यातील वीजग्राहकांच्या डोक्यावर आणखी एका दरवाढीचा बोजा पडला आहे.

गणेशोत्सवात ‘अवयवदानाचा’ जागर

$
0
0
अवयव निकामी झालेल्यांना जीवदान देऊन त्याचे महत्त्व समाजात रुजावे या भावनेतून बुधवार पेठेसह बंडगार्डन, धानोरी, जुनी सांगवी भागातील गणेश मंडळांनी देखाव्यातून ‘अवयवदाना’चा जागर हाती घेतला आहे.

तुळजाभवानीच्या पलंगाची जुन्नरमध्ये स्थापना

$
0
0
तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या पलंगाचे जुन्नरमध्ये आगमन झाले असून अनंत चतुर्दशीपर्यंत पलंगाची मुक्काम तिळवण तेली सभागृहात राहणार आहे.या औचित्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बेपत्ता विद्यार्थी मृतावस्थेत आढळला

$
0
0
राजुरी येथील सह्याद्री व्हॅली इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत असलेला सोमनाथ बाळासाहेब कारखेले (२५, रा. पारनेर) हा वसतिगृहात राहणारा विद्यार्थी मृतावस्थेत आढळला.

दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड

$
0
0
सोलापूर रोडवर किर्लोस्कर पुलाखाली दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली तर दोघे आरोपी पसार झाले आहेत.

गुलाल वापरू नका

$
0
0
गणेशोत्सवाच्या काळात वापरला जाणारा गुलाल हा डोळ्यांना तसेच त्वचेला घातक असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्सवामध्ये गुलालाचा वापर टाळावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पालेभाज्या महागलेल्याच

$
0
0
गणेशोत्सवामुळे मागणी कायम राहिल्याने पालेभाज्या स्वस्त होण्याचे नाव घेत नाहीत. टोमॅटो आणि शेवगा महाग झाला असून, अन्य फळभाज्यांचे भाव मात्र, उतरले आहेत.

पुण्याच्या काही भागांत तुफानी पाऊस

$
0
0
रविवारी पहाटे आणि रात्री शहर आणि परिसराला तुफान पावसाने झोडपून काढले. सातारा-सिंहगड रोड, कर्वेनगर-कोथरूड या भागांत काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटी झाल्याप्रमाणे पाऊस पडला.

‘एक्स्प्रेस वे’वरील बोगद्यात कार पेटली

$
0
0
‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे’वर कामशेत बोगद्यात कार आणि कंटेनरच्या अपघातात कार जळून खाक झाली. अपघानंतर मार्गावर दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images