Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नदीपात्र विद्रूपीकरण करणा-यांविरोधात गुन्हा

$
0
0
शहरातील सार्वजनिक ठिकाणी जाहिराती रंगवून-चिकटवून विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियमांतर्गत पालिकेतर्फे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

इंजिनीअरिग प्रवेशासाठी ‘डोमिसाइल’ची पुन्हा मागणी

$
0
0
राज्यातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिवास प्रमाणपत्रामधून (डोमिसाइल सर्टिफिकेट) सूट देण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली असतानाही यंदा मात्र तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) हे प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना विद्यार्थ्यांना केली आहे.

मुंजाबाचा बोळ मंडळाच्या मांडवाला किरकोळ आग

$
0
0
नारायण पेठेतील मुंजाबाचा बोळ तरुण मंडळाच्या मांडवाला गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. मंडळाचे कार्यकर्ते आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली.

‘रोजगार हमी’वर ‘गुणवत्ता निरीक्षक’

$
0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून राज्यात करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा राखण्यासाठी ‘गुणवत्ता निरीक्षक’ नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोजगार हमीतून केलेल्या कामांची गुणवत्ता अंदाजपत्रकाप्रमाणे झाल्याची खात्री हे निरीक्षक करणार आहेत.

पुन्हा पीएमटी करा

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) तोट्यात होणारी वाढ चिंताजनक असल्याने कंपनीचे भवितव्य अंध:कारमय आहे.

पवारांच्या टीकेतील ‘रिअॅल्टी’ काय ?

$
0
0
फायलींवर सह्या होत नसल्याच्या मुद्यावरून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेतील ‘रिअॅल्टी’ काय आहे, असा सवाल भारतीय जनता पक्षाने गुरुवारी विचारला आहे.

बहिःस्थ प्रश्नी कुलगुरूंशी चर्चा

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या बहिःस्थ प्रवेशांच्या प्रश्नी काही सिनेट सदस्यांनी गुरुवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंशी याबाबत चर्चा करू, असे आश्वासन टोपे यांनी दिल्याचा दावा या सदस्यांनी केला.

जाहिरातबाज डॉक्टरांवर कारवाई

$
0
0
वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या विविध शाखांच्या तज्ज्ञ डॉक्टरांसह बड्या हॉस्पिटलकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातबाजीच्या विरोधात कारवाई करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.

बँडपथक येण्याची भीती आली कामी

$
0
0
सणासुदीच्या काळात थकविलेल्या प्रॉपर्टी टॅक्सच्या वसुलीसाठी पालिकेचे बँडपथक दारात येईल, या भीतीने केवळ दोन दिवसात‌च दोन कोटी रुपयांचा महसूल करदात्यांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.

'GPRS'चा डेटा तपासण्यास सुरुवात

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी करोडो मोबाइल कॉल्सची तपासणी करून हाती काही न लागल्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ‘जीपीआरएस’ डेटा तपासण्यास सुरुवात केली आहे.

कलमाडींबाबत काँग्रेसची नरमाई?

$
0
0
खासदार सुरेश कलमाडी सर्वेसर्वा असलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे उद्घाटन केंद्रीय कायदामंत्री आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय कपिल सिब्बल यांच्या हस्ते होत असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विजयश्रीचे बाप्पा!

$
0
0
आमच्या विजयश्री टॉवरमध्ये विजयश्री मित्रमंडळाची स्थापना २००१मध्ये झाली. यंदाचं हे तेरावं वर्ष आहे. त्यावेळी नव्यानं झालेल्या या गृहसंकुलात सभासदांच्या एकमेकांशी ओळखी व्हाव्यात.

फसवणूक प्रकरणी एकाला अटक

$
0
0
गुंतवणुकीची जाहिरात देऊन एक लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दोघा आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

महोत्सवाकडे आयुक्तांची पाठ

$
0
0
गणेशोत्सवानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शनिवारवाडा सांस्कृतिक महोत्सवाकडे पालिका आयुक्तांसह शहरातील माननीयांनी पाठ फिरविली.

कलमाडींनी मांडली बाजू

$
0
0
‘फेस्टिव्हलपासून मॅरेथॉनपर्यंत आणि चित्रपट महोत्सवापासून क्रीडानगरीपर्यंत पुण्याने मला साथ दिली असून, शहराचा लौकिक कमी होईल, असे काम मी करणार नाही.

फेस्टिव्हलचे धुमधडाक्यात उद्घाटन

$
0
0
श्री गणेशवंदना, शिवराज्याभिषेक, लावणी-कथ्थक जुगलबंदी अशा पारंपरिक कलाप्रकारांसह लेझर अॅक्टच्या आधुनिक आविष्काराच्या सादरीकरणाद्वारे पुणे फेस्टिव्हलचा रौप्यमहोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी रंगला.

आता ‘वाजवा रे वाजवा’

$
0
0
गौरी विसर्जन आणि पुढील पाच दिवस रात्री बारापर्यंत लाउडस्पिकरला परवानगी देण्यात आल्याने गणेशोत्सवात भाविकांची गर्दी वाढणार आहे. गर्दी लक्षात घेता अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, ध्वनीची पातळी मोजून आवाजाचा दणदणाट रोखण्याचे आदेश पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहे.

स्वस्त प्रवासासाठी प्रवाशांचे प्रबोधन

$
0
0
कमी अंतरासाठी शहरात स्वस्तात प्रवास करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध व्हावी, या उद्देशाने स्वयंसेवी संस्थांतर्फे शनिवारी बस स्थानकांवर पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.

चोख बंदोबस्तातही सोनसाखळ्यांची चोरी

$
0
0
गणेशोत्सवासाठी कडक पोलिस बंदोबस्त व नाकेबंदी असताना शनिवारी दिवसभरात शहरातील विविध भागांत सोनसाखळी चोरीच्या सहा घटना घडल्या. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सोनसाखळ्या हिसकावून पोलिसांना हुलकावणी दिली आहे.

‘जीएमआरटी’ची फ्रिक्वेन्सी बदलतेय

$
0
0
अवकाशीय घटनांचा रेडिओ लहरींच्या आधारे ठाव घेणारा खोडद येथील ‘जाएंट मीटरवेव्ह टेलिस्कोप’ (जीएमआरटी) आता कात टाकणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images