Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

उपमहापौरपदासाठी ६ जण इच्छुक

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदावर दावा करणाऱ्या काँग्रेसच्या सहा इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखती बुधवारी घेण्यात आल्या.

महिनाभरात मेट्रोचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर

$
0
0
मेट्रो प्रकल्पासाठी लागणारा निधी कायद्या‌त काही बदल करून डेव्हलपमेंट चार्जेस वाढवूनच उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई स्फोटातील दोषी पावलेचा तुरुंगात मृत्यू

$
0
0
येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला मुंबई १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी महम्मद फारूख युसूफ पावले (वय ५०) याचा मंगळवारी रात्री दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला.

उत्तराखंड पोलिस पुण्यात

$
0
0
केदारनाथ महाप्रलयात बेपत्ता झालेल्या पुण्यातील यात्रेकरूंविषयी उत्तराखंड पोलिसांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रात माहिती घेतली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्याकडून या पोलिसांनी माहिती घेतली.

धरणांमध्ये ७८ टक्के पाणीसाठा

$
0
0
राज्यांतील धरणांमध्ये ७८ टक्के पाणीसाठा झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. तथापि, पिकांसाठी आणखी पावसाची गरज असल्याचे कृषी खात्यातून सांगण्यात आले.

संजय दत्त येणार फंडासाठी धावून

$
0
0
तुरुंग विभागाच्या कल्याणकारी योजनांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी अभिनेता संजय दत्त हातभार लावणार आहे.

सिलिंडरसाठी मोजा ९७० रुपये

$
0
0
राज्य सरकारची योजना लागू झाल्यानंतर पुणेकरांना आता गॅस सिलिंडरसाठी ९७० रुपये रोख मोजावे लागणार आहे.

एकाच पिस्तुलातून केला गोळीबार

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर एकाच पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती ‘बॅलॅस्टिक एक्स्पर्ट’च्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.

औषध कंपन्यांशी साटेलोटे

$
0
0
डॉक्टरांबरोबरच शहरातील बड्या साखळी हॉस्पिटलच्या प्रशासनाचे औषध कंपन्यांशी वर्षानुवर्षे व्यवस्थित साटेलोटे आहे.

पुणे महापौरपदी चंचला कोद्रे

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदाची माळ अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंचला कोद्रे यांच्या गळ्यात पडली आहे. त्यांनी शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार सोनम झेंडे यांचा ४१ मतांनी पराभव केला.

३५० उत्तरपत्रिका, मॉडरेशन २०० मिनिटांत!

$
0
0
पुणे विद्यापीठामध्ये इंजिनीअरिंगच्या पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या साडेतीनशे उत्तरपत्रिका अवघ्या दोनशे मिनिटांमध्ये हातावेगळ्या केल्याचा पराक्रम एका मॉडरेटने केल्याचा खळबळजनक आरोप सिद्धार्थशंकर शर्मा यांनी केला आहे.

फर्ग्युसन ते पासोड्या विठोबा... फक्त ८४५ रुपये!

$
0
0
फर्ग्युसन रोडवरील ज्ञानेश्वर पादुका चौक ते पासोड्या विठोबापर्यंतच्या प्रवासाचे भाडे तब्बल ८४५ रुपये...शिवाजीनगर ते पेरूगेट भावे हायस्कूल ६९५ रुपये... हा प्रवास दर आहे, भरवशाचे इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या रिक्षाचा!

शिस्त असेल तरच सहकारावर विश्वास

$
0
0
ज्येष्ठ पत्रकार आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते जयराम देसाई हे अमृतमहोत्सव पूर्ण करीत आहेत. गेली पन्नास वर्षे सहकार क्षेत्रात कार्य, सहकारविषयक निरनिराळ्या नियतकालिकांचे संपादक आणि पत्रकार संघटनांमध्ये विविध पदांवर देसाई यांचे तळमळीचे कार्य या क्षेत्रात सुपरिचित आहे.

गणेशोत्सवात केवळ जीवरक्षकांची नेमणूक

$
0
0
गणेशोत्सवाच्या काळात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून कोणत्याही विशेष सेवा पुरविण्यात येणार नसून, फक्त विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी कॅनॉलजवळ जीवरक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.

गौरार्इच्या स्वागतासाठी लगबग

$
0
0
गौरींच्या मूर्ती, मुखवटे, विविध दागदागिने, साड्या, मखरे, सजावटीचे साहित्याने बाजारपेठ सजली आहे. लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे स्वागत करण्यासाठी महिलावर्गाची तुळशीबाग, रविवार पेठेत खरेदीसासाठी धावपळ सुरू आहे.

‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये लेझरमॅन, रोबो शो

$
0
0
कला आणि संस्कृती यांचा संगम साधणाऱ्या पुणे फेस्टिव्हलमध्ये बहुभाषिक कार्यक्रमांची रेलचेल पुणेकरांना अनुभवता येणार आहे. तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘लेझरमॅन’ आणि ‘रोबो शो’ महोत्सवाची शान वाढविणार असून, प्रख्यात गायक बालमुरली कृष्णन् आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांना ‘पुणे फेस्टिव्हल अॅवॉर्ड 'ने गौरविण्यात येणार आहे.

पेट्रोल पंपावर ‘सीएनजी’चा आज निर्णय

$
0
0
सीएनजी गॅस पुरवठ्यावरून हमरीतुमरीचे प्रसंग येऊ लागल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नी आज (शुक्रवारी) बैठक बोलावली आहे. शहरातील पेट्रोल पंपांवर ‘सीएनजी’चे आउटलेट सुरू करण्याबाबतची त्यामध्ये चाचपणी होण्याची शक्यता आहे.

बहिःस्थांसाठी सरसावली विद्यार्थी संघटना

$
0
0
पुणे विद्यापीठाने बहिःस्थ विद्यार्थ्यांसाठी नव्याने घेतलेल्या निर्णयाविरोधात थेट राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

जपानमधील शिक्षणसंधींविषयी मिळणार माहिती

$
0
0
कौन्सुलेट जनरल ऑफ जपान आणि मोम्बुश्यो स्कॉलर्स असोसिएशनतर्फे (मोसाइ) येत्या ८ आणि ९ सप्टेंबरला एस. पी. कॉलेजमध्ये ‘एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. जपानमध्ये असलेल्या उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या संधींविषयीची माहिती या प्रदर्शनात मिळणार आहे.

बँकेच्या फसवणूकप्रकरणी कंपनीच्या संचालकाला अटक

$
0
0
बनावट कागदपत्रे सादर करून पुण्यातील इंडियन ओव्हरसीज बँकेची सुमारे २४ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीमाऊली इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकाला मुंबई येथे अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images