Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0
गुंतवणुकीची जाहिरात देऊन एक लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दोघा आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सीएनजी पंपावर गोंधळ

$
0
0
वाकडेवाडीतील ‘सीएनजी’ पंपांवर रिक्षाचालकांची दिशाभूल करून जादा पैसे घेतले जात असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी बुधवारी केला. तसेच, व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

११५ औषध दुकानांना टाळे

$
0
0
सक्ती केल्यानंतरही आदेशाला केराची टोपली दाखवित फार्मसिस्टच्या अनुपस्थितीत औषध विक्री करणाऱ्या पुणे शहर जिल्ह्यातील ११५ औषध दुकानांना ‘स्टॉप सेल’चे आदेश देऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) टाळे ठोकले आहे.

मल्टिप्लेक्सचालकांची याचिका कोर्टाने फेटाळली

$
0
0
करमणूक कर थकविल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मल्टिप्लेक्सचालकांना बजाविलेल्या नोटिशीविरोधातील याचिका सुनावणीला घेण्याचे आणि त्यावर निर्णय करण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट करून जिल्हा कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

शालोपयोगी साहित्य वेळेवर द्या

$
0
0
हिवाळा सुरू झाला की शिक्षणमंडळ विद्यार्थ्यांना छत्र्या देते, पावसाळ्यात स्वेटर, तर वर्ष संपत आले की मुलांना बूट देतो. वस्तूचे महत्त्व लक्षात घेऊन किमान या पुढील काळात तरी विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करा, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी शिक्षणमंडळाच्या सदस्यांना सुनावले.

शनिवार पेठेतील देवीचे मंदिर फोडले

$
0
0
शनिवार पेठेतील अष्टभुजा देवीच्या मंदिराचा कडी कोयंडा तोडून देवीच्या गळ्यातील सोन्याची गळसरी आणि मंगळसूत्र असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला.

‘एचआयव्हीबाधितांना नोकरीवरून काढता येणार नाही’

$
0
0
‘एचआयव्ही झाल्याच्या कारणावरून कोणत्याही व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकणे, म्हणजे त्या व्यक्तीच्या उपजीविकेचा हक्क हिरावून घेण्यासारखे आहे. व्यक्तीची कार्यक्षमता महत्त्वाची असून, त्याला झेपेल असे काम देणे आवश्यक आहे,’ असा निकाल हायकोर्टाच्या खंडपीठाने एका याचिकेसंदर्भात दिला आहे.

आरोग्यमंत्री आणणार औषध किमतीवर नियंत्रण

$
0
0
हॉस्पिटलची औषध दुकानांच्या माध्यमांतून होणारी हॉस्पिटलची नफेखोरी चिंताजनकच आहे. ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्राईस अॅथोरिटी’शी (एनपीपीए) समन्वय साधून औषधांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिले.

संशयितांची धरपकड सुरू

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचे रेखाचित्र तयार झाल्यानंतर पुणे शहर, पुणे ग्रामीण, ठाणे आणि नगर जिल्ह्यातील बहुतांश संशयितांची उचलबांगडी सुरू झाली आहे.

ढोल पथकांत ४० वादकांनाच परवानगी

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशे मिळून ४० वादकांना वाजविण्यास परवानगी देण्यात येणार आहे. ढोल पथकांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून त्यांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केले.

खंडपीठासाठी वकिलांचा ‘रक्तयज्ञ’

$
0
0
‘मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्यात व्हावे,’ या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील वकील सात सप्टेंबर रोजी स्वेच्छेने रक्ताचा प्रत्येकी एक थेंब देऊन अनोखे आंदोलन करणार आहेत. पुणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात हा कार्यक्रम होणार आहे.

कोकणातील जागेच्या आमिषाने लूट

$
0
0
कोकणात प्लॉट विकत घेऊन देण्याच्या बहाण्याने २७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या रोहा येथील एका एजंटला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.

नानांची ‘सुन्या’ला क्लीनचिट

$
0
0
‘काही दिवसांपूर्वी तुझ्यावर जी चिखलफेक झाली, त्याबद्दल वाईट वाटते, तू असे करणार नाहीस...’ ... रंगभूमी-चंदेरी दुनियेत अनेक भूमिका गाजविणारे अभिनेते नाना पाटेकर गुरुवारी न्यायाधीशाच्या भूमिकेत गेले.

मृतदेह पाठविण्यास विलंब

$
0
0
बोट्स्वाना देशात गुंडांच्या हल्ल्यात मारले गेलेले शिरूर येथील रहिवासी महेश ब्रह्मे (वय ४५) यांचे पार्थिव तातडीने भारतात पाठविण्यात यावे, यासाठी शुक्रवारी उच्चस्तरीय प्रयत्न सुरू होते.

चंचला कोद्रे नव्या महापौर

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंचला संदीप कोद्रे यांची गुरुवारी पुण्याच्या महापौरपदी निवड झाली. महापौर निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतल्याने कोद्रे यांचा एकतर्फी विजय झाला.

आठवीपर्यंत पुन्हा परीक्षा

$
0
0
आठवीपर्यंतच्या परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा ठराव विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केले. ‘आठवीपर्यंत परीक्षाच न घेण्याचे केंद्र सरकारचे धोरण पटणारे नाही.

चन्या बेगला पकडले, पण...

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी काहीच धागेदोरे लागत नसल्याने तपास यंत्रणांनी राज्यभरातील रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांकडे मोर्चा वळवला असून श्रीरामपूरमधला कुख्यात गुन्हेगार आणि कॉन्ट्रॅक्ट किलर सागर ऊर्फ चन्या बेग व त्याच्या दोन साथीदारांना एटीएसने ताब्यात घेतले आहे.

राजू शेट्टी ‘एनडीए’त सहभागी होणार

$
0
0
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’मध्ये (एनडीए) सहभागी होण्यास ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी सशर्त अनुकूलता दर्शविली. आपल्या काही मुद्यांचा ‘एनडीए’च्या जाहीरनाम्यात समावेश करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.

फेसबुकवरील मैत्री लाखोंची फसवणूक

$
0
0
फेसबूकवर झालेल्या मैत्रीवर अतिविश्वास ठेवून संकटात सापडलेल्या ई- मित्राला मदत करण्याच्या प्रकारात आरती जैन यांची तब्बल ७ लाख ९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी हेन्नी फिलीप, सबिना मिश्रा आणि संजय गुप्ता या तिघांविरूद्ध् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसूल लोकअदालत केस तडजोडीने सोडविणार

$
0
0
जमीन मालकी हक्क व तत्सम केसेस तडजोडीने निकाली काढण्यासाठी पुण्यात ‘महसूल लोकअदालत’ सुरू करण्याचा निर्णय महसूल दिनाच्या कार्यक्रमात घेण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images