Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

५ लाख लुटणा-याला ३ वर्षांची सक्तमजुरी

$
0
0
पोलिस आयुक्तालयासमोरील न्युक्लिअस मॉलमधील ‘शॉपर्स स्टॉप’मधील पाच लाख रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी एका तरुणाला तीन वर्षे सक्ममजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कर्तव्यात कसूर करणा-या PI ला नोटीस

$
0
0
पोटगीची रक्कम वसूल करण्यासाठी कोर्टाने वेळोवेळी वॉरंट काढूनही संबंधितांना अटक न केल्याप्रकरणी कोर्टाने वारजे माळवाडी पोलिस निरीक्षकाला कर्तव्यात कसूर ठेवल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा

$
0
0
जनमानसावर वाढलेल्या टीव्हीच्या प्रभावासह गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरुपाचा परिणाम कलाकारांवर होत आहे.

‘मिरवणुकीतील वाहने तपासा’

$
0
0
विसर्जनासह दहा दिवसांत काढल्या जाणा-या मिरवणुकांमधील वाहनांची अचानक तपासणी करण्याची मागणी मराठा युवा फाउंडेशनने पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडे केली आहे.

आर.के. लक्ष्मण यांना भारतभूषण पुरस्कार

$
0
0
प्रसिद्ध् व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा भारतभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. येत्या २२ सप्टेंबर रोजी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

गैरप्रकार रोखण्यास मतपेट्या सील

$
0
0
सासवड येथे होत असलेल्या ८७व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतपत्रिकांबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे.

कमला नेहरू हॉस्पिटलची दुरवस्था

$
0
0
नूतनीकरण केलेल्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये काही विभागांच्या छताला गळती लागली असून, त्यामुळे वॉर्डातच पाण्याचे डबके साठल्याचे आढळले आहे.

सुकाणू समितीची बैठकच नाही

$
0
0
पुणेकरांना रास्त दरात भाजी खरेदी करता यावी, म्हणून स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीची गेल्या दोन आठवड्यामध्ये बैठकच झाली नसल्याचे समजते.

अतिरिक्त आयुक्तपदी अभिषेक कृष्णा

$
0
0
गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या पालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदावर अखेर अभिषेक कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश पालिकेला बुधवारी प्राप्त झाले असून, येत्या एक-दोन दिवसांत कृष्णा पदभार स्वीकारतील, अशी शक्यता आहे.

खंडपीठाबाबत म्हणणे मांडण्याची संधी

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे पुण्यात खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी पुण्यातील वकिलांच्या समितीला १६ सप्टेंबर रोजी आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.

‘भाजपचे सरकार आल्यास मराठा समाजाला आरक्षण’

$
0
0
‘राज्यात भाजपचे सरकार आले तर मराठा आरक्षण मिळेलच. मात्र, मराठा आरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षांनी काय केले आहे, याचा जाब मराठा समाजाने विचारावा,’ असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केले.

जादूटोणा विधेयक मसुद्याला अखेर भाजपकडून पाठिंबा

$
0
0
राज्य सरकारने लागू केलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या मसुद्याला भारतीय जनता पक्षाने बुधवारी अखेर पाठिंबा जाहीर केला. मात्र, यातील एका कलमाबाबत अधिक स्पष्टता आणण्याची गरज आहे, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘आमच्या चर्चांनाच जास्त प्रसिद्धी मिळते’

$
0
0
‘शिवसेनेने फटकारल्यानंतर मनसेशी संभाव्य युतीच्या विषयावर आता भाजपने ताकही फुंकून पिण्याचा पवित्रा घेतला आहे. या संभाव्य युतीबाबत आमच्या चर्चांनाच अधिक प्रसिद्धी मिळते, आणि त्यामुळे राज्य सरकारचे घोटाळे व अपयश लपून जाते, असे आमच्या लक्षात आले आहे.

विकासाचा नुसताच कांगावा

$
0
0
‘देशात महाराष्ट्र हेच श्रीमंत आणि संपन्न राज्य आहे. अन्य राज्यातील नेते मात्र, उगाचच विकास केल्याचा कांगावा करत आहे. परंतु, ती वस्तुस्थिती नाही,’ असे सांगत वनमंत्री पतंगराव कदम यांनी बुधवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली.

मल्टिप्लेक्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

$
0
0
प्रेक्षकांकडून ६८ कोटी ६५ लाख रुपयांचा बेकायदेशीर करमणूक कर वसूल केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने बजावलेल्या नोटिशीविरोधात शहरातील मल्टिप्लेक्सचालकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.

‘आधार’ यंत्रणेला मिळणार समन्वयाचा ‘आधार’

$
0
0
आधार कार्डासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या बायोमेट्रिक स्कॅनिंग यंत्रणांमध्ये समन्वय साधणारे सॉफ्टवेअर पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने विकसित केले आहे.

जखमी महिलेचा मृत्यू; ३ अटकेत

$
0
0
किरकोळ कारणावरून डोक्यात सिमेंटची वीट मारलेल्या महिलेचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

विद्यार्थिसंख्या वाढल्याने प्रवेश प्रक्रियेत तारांबळ

$
0
0
इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाच्या थेट प्रवेशासाठीच्या कौन्सेलिंग फेरीला अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थी आल्याने प्रवेश यंत्रणेची तारांबळ उडाली. मात्र, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सलग ४० तास काम करून मुदतीत प्रवेश होतील, याची खातरजमा केली.

‘स्वाइन फ्लू’चा आणखी १ बळी

$
0
0
‘स्वाइन फ्लू’च्या संसर्गाने सातारा जिल्ह्यातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने दगावणाऱ्यांची संख्या आता ४२वर पोहोचली आहे.

नव्या महापौरांची आज निवड

$
0
0
शहराच्या नव्या महापौरांची निवड गुरुवारी (पाच सप्टेंबर) होणार असून, चंचला कोद्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. महापौर वैशाली बनकर यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images