Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुख्याध्यापकांना मिळाली ‘कारणे दाखवा’ नोटिस

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) २५ टक्के प्रवेशांबाबत घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीला गैरहजर राहणाऱ्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे.

रॉकेलचे समान वितरण होणार

$
0
0
रेशनवरील धान्याचे ‘ऑटो अॅलोकेशन’ करून धान्याचा काळाबाजार रोखण्याचे पाऊल उचलले असतानाच आता रॉकेलचे समान वितरण करण्यासाठी रेशनकार्डांवर ‘गॅसधारक’ म्हणून शिक्के मारण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

पोलिस म्हणतात... पुण्याचे नाइट लाइफ सेफ!

$
0
0
पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत प्रवास करणा-या तसेच काम करणा-या महिला आणि मुलींसाठी शहर सुरक्षित आहे.

सॅनिटरी नॅपकिनच्या कच-यावर उपाय

$
0
0
सॅनिटरी नॅपकिनच्या कच-याची समस्या सोडविण्यासाठी उत्पादक कंपन्यांवर अवलंबून न राहता पुणे महापालिकेनेच यात पुढाकार घेतला आहे.

पुण्यात ४९ हॉस्पिटल नोंदणीविनाच

$
0
0
महापालिकेच्या परवानगीविनाच शहरात ४९ हॉस्पिटल्स सुरू असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली असून, त्यातील २३ हॉस्पिटलविरुद्ध आरोग्य विभागाने कोर्टात धाव घेतली आहे.

लाच घेताना लिपिकासह दोघांना अटक

$
0
0
वडीलोपार्जित शेतजमीनीचे सातबाराप्रमाणे मोजमाप करण्यासाठी ५० हजाराची लाच घेणाऱ्या वडगाव मावळातील भूमी अभिलेख विभागाच्या उप-अधिक्षक कार्यालयातील दुरुस्ती लिपिकासह त्याच्या साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली.

सहायक पोलिसाला लाच घेताना पकडले

$
0
0
कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तपास व्यवस्थित न करण्यासाठी पोलिस शिपायामार्फत २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अलंकार पोलिस चौकीच्या सहायक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

चौथ्या दिवशीही तपास दिशाहीन

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना अद्यापही कोणती ठोस माहिती हाती लागलेली नाही. परिणामी, कोणालाही चौकशीसाठी ताब्यात घेत अटक करण्यात आलेली नाही.

महिलांसाठी हवे स्वतंत्र पोलिस ठाणे

$
0
0
दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर सर्व राज्यांत जिल्हा स्तरावर स्वतंत्र महिला पोलिस ठाणे निर्माण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले असल्याची टीका आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.

फुटपाथवर मांडव नको

$
0
0
शहराच्या काही भागांत फुटपाथ आणि सायकल ट्रॅकचा वापरही गणेश मंडळांकडून मंडप उभारण्यासाठी केला जात असल्याने त्यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांतर्फे पालिका आणि पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

‘एनडीए’च्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

$
0
0
गुप्तचर विभागाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्यानंतरही शस्त्रधारी व्यक्तींनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश केल्याने एनडीएच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

‘NDA’तला शिकारी गोळीबारात ठार

$
0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) शिकारीसाठी घुसखोरी करून गोळीबार करणाऱ्या टोळीमधील एक जण ‘एनडीए’च्या सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ठार झाला.

गणेशमूर्ती स्टॉलवर पालिकेची बंदी

$
0
0
गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी रस्त्यांवर स्टॉल उभारण्याला पुणे महापालिकेने बंदी घातली आहे. सध्या उभारण्यात आलेल्या स्टॉलवर आजपासून कारवाई केली जाणार आहे. या स्टॉलधारकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचेही पालिकेने सांगितले.

सरकारच्या अविश्वासामुळेच संरक्षण संशोधनाला खीळ

$
0
0
‘आपल्या देशातील संरक्षण संशोधक व संरक्षण क्षेत्रातील खासगी उद्योजक यांच्या क्षमतांवर सरकारचा विश्वास नाही. या ‘ट्रस्ट डेफिसीट’मुळे संरक्षण संशोधनाला खीळ बसते आहे’, अशी टीका भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या स्पेस अँड डिफेन्स विभागाचे प्रमुख डॉ. बाबा कल्याणी यांनी शनिवारी केली.

‘साधना’ची सूत्रे शिरसाठ यांच्याकडे

$
0
0
साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांच्याकडे संपादकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच डॉ. हमीद दाभोलकर यांचा साधनाच्या विश्वस्त मंडळावर समावेश करण्यात आला आहे.

‘ज्युनिअर वकिलांसाठी हेडमास्तर व्हा’

$
0
0
ज्युनिअर वकिलांचे दोष काढण्यापेक्षा हेडमास्तर होऊन त्यांना शिस्त लावून सुधारण्याची जबाबदारी सिनिअर वकिलांनी पूर्ण करायला हवी. ज्युनिअर वकिलांना जगण्यासाठी लागणारे पैसे मिळतील याकडे जातीने लक्ष दिले तर ज्युनिअर सिनिअरला सोडून पळून जाणार नाहीत, असा कानमंत्र ज्येष्ठ वकील अॅड. एन. डी. पवार यांनी दिला.

बृहत् आराखड्यानुसारच निर्णय

$
0
0
‘इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त राहात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन इंजिनीअरिंग कॉलेजांना मान्यता देऊ नये, अशी मागणी राज्य सरकारने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) केली आहे.

निळकंठराव कल्याणी यांचे निधन

$
0
0
कल्याणी उद्योगसमूहाचे संस्थापक, ज्येष्ठ उद्योगपती डॉ. निळकंठराव कल्याणी यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी शनिवारी रात्री आठच्या सुमारास निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

देशात घ्या परदेशी शिक्षण

$
0
0
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना ‘एमएस’ करण्यासाठी आता पूर्ण वेळ परदेशात जाण्याची गरज नाही!... डॉलरच्या तुलनेत घसरलेल्या रुपयामुळे महागलेले परदेशातील उच्च शिक्षणही लवकरच आटोक्यात येणार आहे!

दाभोलकर हत्येप्रकरणी धागेदोरे हाती

$
0
0
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images