Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एफटीआय’मधील कार्यक्रम अभ्यासक्रमाचाच भाग

$
0
0
चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेमध्ये (एफटीआयआय) होणारे चित्रपटांचे स्क्रीनिंग आणि कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असून, त्यावर कोणतीही बाह्य सेन्सॉरशिप असू शकत नाही.

‘पूर्वप्राथमिक आणि बालवाडीला आरटीई लागू करा’

$
0
0
पूर्वप्राथमिक आणि बालवाडी शिक्षणाचा समावेश शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) करत, तेही सक्तीचे आणि मोफत करण्याची मागणी अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेने केली आहे. संघटनेने या मागण्यांविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये भारतातील बालशिक्षणाच्या अनास्थेवर टीका करण्यात आली आहे.

अण्णा भाऊ साठे स्मारकात क्षेत्रीय कार्यालयाला विरोध

$
0
0
बिबवेवाडी परिसरात उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकात असलेली इमारत बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाला देण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे मांडला आहे. या प्रस्तावाला नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नगरसेवकांनी विरोध केला आहे.

सावत्र आईच्या जाचातून अखेर मुलीची सुटका

$
0
0
सावत्र आईच्या छळाला कंटाळून तिने घर सोडले. ‘आत्महत्या करेन पण परत घरी जाणार नाही’, असे सांगत शेजारच्या काकांकडे मदत मागितलेल्या त्या १४ वर्षीय मुलीच्या मदतीसाठी एक समाजसेविकेने कोर्टात केस दाखल करून तिला न्याय मिळवून दिला आहे. कोर्टाने संबंधित मुलीचा ताबा समाजसेविकेला देण्याचा आदेश दिला आहे.

नाट्यपरिषद पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सुरेश देशमुख

$
0
0
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सुरेश देशमुख यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी भाऊसाहेब भोईर यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा केली.

चाकणच्या सरपंचाला अटक

$
0
0
बनावट शिक्के बनविणे, बेकायदा नोंदी करणे व बनावट उताऱ्यांचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चाकणचे विद्यमान सरपंच काळूराम गोरे यांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. गोरे हे मंगळवारी पोलिसांना शरण आले होते. खेड न्यायालयाने गोरे यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

भांडारकरचा सुवर्णकाळ इतिहासबद्ध

$
0
0
प्राच्यविद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील संशोधकांच्या ज्ञानाची भूक भागविणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचा सुवर्णकाळ आता इतिहासबद्ध होत आहे. ‘भांडारकर’मध्येच ग्रंथपाल म्हणून अर्धशतकाहून अधिक काळ काम पाहिलेले वा. ल. मंजुळ हा इतिहास लिहित आहेत.

कांदा पुन्हा ६० रुपये किलो

$
0
0
शेतकऱ्यांनी बाजारात कांदा पाठवण्याचे प्रमाण कमी केल्यामुळे घाऊक बाजारपेठेत आवक कमी झाली असून दरामध्ये तीस रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारपेठेत कांद्याचा प्रतिकिलोचा दर ६० ते ७० रुपयांपर्यंत गेला आहे.

करमणूक कराची तिप्पट वसुली

$
0
0
सेट टॉप बॉक्समुळे केबल ग्राहकांची नेमकी संख्या आता रेकॉर्डवर येऊ लागल्यामुळे पुणे जिल्ह्यात करमणूक कराची वसूली तब्बल तिप्पट झाली आहे. करमणूक कर विभागाच्या तहसीलदार मोहिनी चव्हाण यांनी ही माहिती दिली.

शिक्षकांना पदवीची सक्ती नाही

$
0
0
इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना सध्या शिकवित असलेल्या शिक्षकांना पदवी मिळविण्यासाठी राज्य सरकारने केलेली सक्ती आता रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यासाठीचे शासकीय शुद्धीपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले.

बाप्पा चालले परदेशी...

$
0
0
परदेशातही बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी केली जात आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, हॉलंड, कॅनडा, मॉरिशस आदी देशांमधून गणेशमूर्तींना मोठी मागणी असून, मूर्ती पाठविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

ई-फिशिंगच्या रकमेचीही भरपाई शक्य

$
0
0
ऑनलाइन चोरीद्वारे (ई-फिशिंग) खात्यातील रक्कम परस्पर लाटली गेल्यास त्या रकमेची नुकसानभरपाईही मिळवता येणे शक्य झाले आहे. हा सुखद अनुभव पुण्यातील दोन खातेदारांनी घेतला.

दाभोलकर हत्येचे चार साक्षीदार

$
0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पाहणारे चार साक्षीदार पुढे आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे हे मारेकरी शहराच्या मध्यवस्तीत राहणारे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'एनडीए'मध्ये गोळीबार, एक ठार

$
0
0
पुण्यातील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) परिसरात सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी एकच्या सुमारस ही घटना घडली.

शिकारीसाठी घुसलेला ‘एनडीए’त गोळीबारात ठार

$
0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) शिकारीसाठी घुसखोरी करून गोळीबार करणाऱ्या टोळीमधील एक जण ‘एनडीए’च्या सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ठार झाला. ‘एनडीए’च्या परेड ग्राउंडजवळ गुरुवारी रात्री हा ‘रणसंग्राम’ घडला.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे निषेध

$
0
0
मुंबईतील महिला पत्रकार छायाचित्रकारावर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या अमानुष घटनेचा पुणे श्रमिक पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

$
0
0
मुंबईत महिलेवर झालेला गँगरेप, लोकलमध्ये युवतीवर झालेला अॅसिड हल्ला, पुण्यात भरवस्तीत नरेंद्र दाभोलकर यांची केलेली हत्या यासह अनेक गंभीर घटना गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडल्या असून कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

पुणे सुरक्षितच, पण खबरदारी घेण्याची गरज

$
0
0
दिल्लीपाठोपाठ मुंबईतील घृणास्पद प्रकाराने पुन्हा एकदा तरुण मुलींकडे कोणत्या नजरेने पाहिले जाते, याची जाणीव नव्याने करून दिली आहे.

सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यांत फाशीच हवी

$
0
0
सामूहिक बलात्कारासारख्या घृणास्पद गुन्ह्यांमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचीच तरतूद असावी, अशी स्पष्ट शिफारस राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) केली आहे. ‘सीआयडी’तर्फे नुकतेच राज्य गुन्हे अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

‘तपासात प्रामाणिकपणा नाही’

$
0
0
पुण्यात वकिली क्षेत्रात गेली ५० वर्षे सक्रिय असलेले ८० वर्षीय ज्येष्ठ वकील अॅड. एन. डी. पवार यांचा शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर सत्कार करण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images