Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वेळेत होत नसेल, तर BRT नकोच!

$
0
0
बाकड्यांपासून कचरापेट्यांपर्यंत कोट्यवधी रुपये खर्चणाऱ्या नगरसेवकांनी ‘बीआरटी’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या जबाबदारीतून मात्र काढता पाय घेतला आहे.

आयटी पुरस्कार ‘Log Off’च

$
0
0
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आयटी पुरस्कारांची मालिका गेली दोन वर्षे ‘लॉग ऑफ’ झाली आहे.

नरेंद्र दाभोळकरांची पुण्यात हत्या

$
0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि 'साधना' मासिकाचे संपादक ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज पुण्यात हत्या करण्यात आली. ओंकारेश्वर पुलाजवळ दोघा अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात दाभोलकर यांचा मृत्यू झाल्यानं पुण्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

हत्येचा निषेध, उद्या पुणे बंद

$
0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. तसेच दाभोलकरांच्या मारेक-यांना लवकरात अटक करण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

दाभोलकरांच्या मारेकऱ्याचे स्केच जारी

हत्येचा प्रत्यक्षदर्शी मिळाला

$
0
0
ओंकारेश्वर पुलाजवळ घराच्या बाल्कनीत उभा असलेल्या एका व्यक्तीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्ला होताना पाहिले होते. काही क्षणात घडलेल्या या प्रसंगाच्या प्रत्यक्षदर्शीकडून पोलीस माहिती घेत आहेत. अद्याप मारेकऱ्यांना शोध लागलेला नाही. पोलिसांची आठ पथके मारेकऱ्याचा शोध घेत आहे.

बिडी कामगारांचे पुण्यात आंदोलन

$
0
0
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बिडी उद्योग आणि रोजगार धोक्यात आल्यामुळे बिडी कामगारांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना अटक

$
0
0
चाकण येथे खून करून पसार झालेल्या दोघा आरोपींना फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेत सोमवारी पकडले. दोघांनाही चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

खंडपीठासाठी आज मुंबईत बैठक

$
0
0
पुण्याला मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ मिळावे या मागणीसाठी पुण्यातील वकिलांनी दोन दिवस कामावर बहिष्कार टाकल्याची हायकोर्टाने दखल घेतली आहे. त्यासाठी बुधवारी (आज) चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे.

रिक्षाचालकांचा संप मागे

$
0
0
वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज (बुधवार) मध्यरात्रीपासून पुकारलेला तीन दिवसांचा संप रिक्षाचालकांनी मंगळवारी मागे घेतला. त्यामुळे पुण्यासह राज्यभरातील रिक्षा वाहतूक उद्यापासून सुरळीत राहील. मागण्यांसदंर्भात चर्चा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने हा संप मागे घेतला.

जर्मनीचे लक्ष आता भारतीय शाळांवर

$
0
0
भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी जर्मनीने आता भारतातील शाळांवर लक्ष केंद्रीत केले आहे. नव्या संदर्भात जर्मन भाषा कशी शिकवावी, याचा अभ्यासक्रम ‘मॅक्सम्युलर भवन’ने तयार केला असून, देशभरातील एक हजार केंद्रीय विद्यालयांमध्ये तो शिकवला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही दगाफटक्याची भीती

$
0
0
‘आगामी निवडणूक काँग्रेससाठी सोपी नाही, भाजप, शिवसेना आणि मनसेने जरी आघाडी सरकारला पायउतार करण्यासाठी कंबर कसली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस कधी दगाफटका देईल याचा नेम नाही,’ असा टोला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी लगावला.

‘महसूल’चे आंदोलन स्थगित

$
0
0
महसूल कर्मचा-यांच्या प्रमुख मागण्या राज्य सरकारने तत्वतः मंजूर केल्याने ‘काम बंद’ आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे यांनी मंगळवारी दिली.

विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक उपक्रमाचे धडे

$
0
0
भावी पिढीमध्ये लहानपणापासून सामाजिक कार्याची गोडी लागावी या हेतून विखे पाटील मेमोरिअल स्कूलने ‘पद्म’ हा उपक्रम सुरू केला आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजातील घटकांचा स्तर उंचावण्यासाठी हा पुढाकार शाळेने घेतला आहे.

विद्यार्थी जाणून घेणार वाहतूक समस्या

$
0
0
लोक सिग्नल का तोडतात, झेब्रा क्रॉसिंगवर उभे का राहतात, वाहनाची कागदपत्रे का बाळगत नाहीत, वाहतूक कोंडी का होते आणि ती सुरळीत कशी करायची.

प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन

$
0
0
धरणग्रस्तांचे पुनर्वसन लाभक्षेत्रातील ४६ गावांतच करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी वांग-मराठवाडी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी सिंचन भवनासमोर ठिय्या आंदोलन केले.

अध्यासनांनी अधिक संशोधनाभिमुख व्हावे

$
0
0
विविध समाजसुधारक आणि संतांच्या नावांनी पुणे विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आलेल्या अध्यासनांनी संशोधनाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

‘महापौर बदलाबाबत विश्वासात घेत नाही’

$
0
0
महापालिकेत कारभार करताना ‘राष्ट्रवादी’कडून आघाडी धर्म पाळण्याऐवजी अनेकदा काँग्रेसला गृहित धरून परस्पर निर्णय घेतला जातो.

‘बहि:स्थ विद्यार्थ्यांचा प्रश्न आठवडाभरात मार्गी’

$
0
0
पुणे विद्यापीठामधील बहिःस्थ विद्यार्थ्यांचा प्रश्न येत्या आठ दिवसात तडीस लावण्याचे आश्वासन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिले.

पुण्यात कलाकारांचा मूक मोर्चा

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येने समाजातील पुरोगामी विचारवंत आणि सच्चा कार्यकर्ता हरपल्याची खंत आणि संताप व्यक्त करून पुण्यातील नाट्य, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी मंगळवारी मूक मोर्चा काढला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images