Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर ससून ते साधना अंत्ययात्रा

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची बातमी पसरताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ससून हॉस्पिटलमधील शवागारासमोर गर्दी करून या प्रकाराच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

आम्ही सारे दाभोलकर...!

0
0
‘आव्वाज कुणाचा.. दाभोलकरांचा,’ ‘हत्येने विचार मरत नाहीत. वाढतात’, आम्ही सारे दाभोलकर,’ ‘हम होंगे कामयाब’...डॉ. नरेंद्र दाभोलकरांना निरोप देतानाच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचा निर्धार या शब्दामये व्यक्त झाला आणि दाभोलकरांनंतर ‘अंनिस’चा आव्वाज बुलंदच राहील, अशी ग्वाही देण्यात आली.

हत्येचा सर्व स्तरांतून निषेध

0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटून सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला.

नाकाबंदीसमोरच गोळीबार

0
0
नाकाबंदी आणि अवघ्या शंभर मीटर अंतरावर पोलिस चौकी असूनही दुचाकीवरील हल्लेखोर ओंकारेश्वराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यास धजावले.

प्रत्यक्षदर्शीने टिपला गोळीबाराचा थरार

0
0
ओंकारेश्वर चौकातील ओंकारदर्शन सोसायटीवरून एका नागरिकाने डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा थरार प्रत्यक्ष पाहिला.

आपत्ती व्यवस्थापनावर आली ‘आपत्ती’

0
0
उत्तराखंडातील महाप्रलय, पावसामुळे नद्यांना आलेले पूर अशा घटनांमध्ये अहोरात्र राबणाऱ्या राज्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या गैरव्यवस्थापनाचे चटके सोसावे लागत आहेत.

आ. दिलीप मोहितेंना रू. १६०० दंड

0
0
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अब्रुनुकसान झाले म्हणून कोर्टात दोघांविरूद्ध् दाखल केलेल्या दाव्यात उलटतपासणीसाठी हजर राहिले नाहीत म्हणून कोर्टाने त्यांना १६०० रुपयांचा दंड केला आहे.

विद्यार्थ्याला जलसमाधी

0
0
सायकलवरून जाताना चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातील वाहत्या पाण्यात तोल घसरून पडल्यामुळे एका शालेय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला.

आयुर्वेद औषधांना पाराबंदीचा फटका

0
0
आयुर्वेदाच्या औषधांमध्ये वापरात येणाऱ्या पाऱ्याच्या (मर्क्युरी) वापरावर जगातील १४७ देशांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने आयुर्वेदीय औषधांमध्ये पारा वापरण्याची पाच हजार वर्षांची परंपराच संपुष्टात येणार आहे.

‘रुपी’वरील निर्बंध आणखी ६ महिने

0
0
रुपी बँकेवरील आर्थिक निर्बंध आणखी सहा महिने कायम ठेवण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे. या निर्बंधामुळे ठेवीदारांना बँक खात्यातून फक्त एक हजार रुपयेच काढता येणार आहेत.

तपासात धागेदोरे नाहीत

0
0
हल्लेखोरांनी नियोजनबद्ध कट रचून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ओंकारेश्वर पुलाजवळील ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये दोन संशयितांची छबी मिळाली असली, तरी हत्येचा हेतू आणि मुख्य सूत्रधारांबाबत कोणतेही ठोस धागेदोरे पोलिसांना मिळवता आलेले नाहीत.

दाभोलकर हत्या; पुणं रस्त्यावर

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ‘मी दाभोलकर, तू दाभोलकर’ असे फलक हातात घेऊन तरुणांनी प्रचंड निषेध मोर्चा काढला. महाराष्ट्राचा पुरोगामी आवाज बंद होऊ देणार नाही, असा निर्धार या मोर्चाद्वारे व्यक्त करण्यात आला.

हत्येशी संबंध नाहीः सनातन संस्था

0
0
सनातन संस्थेचा लढा हा वैचारिक आहे. नरेंद्र दाभोलकरांशीही आमचे वैयक्तिक मतभेद नव्हते. त्यामुळे त्यांच्या हत्येनं आम्हालाही धक्काच बसलाय, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच, दाभोलकरांच्या हत्येशी ‘सनातन’चा संबंध नसल्याचा खुलासा संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी आज केला आहे.

उलगडणार सिनेमाचा इतिहास

0
0
चित्रपटसृष्टीच्या मूकपट ते डिजिटल या सर्व टप्प्यांची माहिती देणारे आशियातील पहिले संग्रहालय मुंबईत आकाराला येत असून, दोन टप्प्यात होणाऱ्या या संग्रहालयाचा पहिल्या टप्पा डिसेंबरपर्यंत खुला होणार आहे.

चाकणच्या सरपंचाला अटक

0
0
बनावट शिक्के बनविणे, बेकायदा नोंदी करणे व बनावट उताऱ्यांचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चाकणचे विद्यमान सरपंच काळूराम गोरे यांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. गोरे हे काल पोलिसांना शरण आले होते.

राखीव वनक्षेत्रात अतिक्रमणाचा सपाटा

0
0
गेल्या वर्षापासून जुन्नर वनक्षेत्रातील राखीव वनामध्ये लोकशासन आंदोलनकर्त्यांकडून सुरू असलेल्या अतिक्रमणाच्या कारवायांवर वनविभाग,महसूल तसेच पोलिस यंत्रणेकडून अतिक्रमण हटविण्यासाठी संयुक्तपणे कारवाई होणार आहे.

स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

0
0
सातारा जिल्ह्यातील माळगाव येथील एका २७ वर्षांच्या महिलेचा रुबी हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आतापर्यंत ३६ झाली असून, सहा जणांना स्वाइन फ्लूची नव्याने लागण झाली आहे.

ओव्हरटेकच्या नादात एसटीला अपघात

0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर राज्य परिवहन महामंडळाची बस (एसटी) आणि ट्रक यांच्यामध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात झालेल्या अपघातात बस मधील २१ प्रवासी जखमी झाले आहे. त्यापैकी १४ जण गंभीर जखमी आहेत.

दाभोलकरांना 'महाराष्ट्र भूषण' द्या

0
0
अनिष्ट रूढी, परंपरांसाठी झटणाऱ्या डॉ. दाभोलकर यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करून त्यांचे कार्य नेटाने पुढे चालविण्याचा निर्धार बुधवारी पालिकेमध्ये झालेल्या शोकसभेमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित केले जावे, अशी मागणीही करण्यात आली.

‘बालभारती’त कर्मचा-यांना सापत्न वागणूक

0
0
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images