Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘आदिवासी विकास’ प्रभावीपणे राबवा

$
0
0
आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि यंत्रणांचे सक्षमीकरण करा, अशा सूचना राज्यपाल के. शंकरनारायण यांनी केल्या आहेत.

बहिःस्थांचे प्रवेश विद्यापीठाच्या बाहेरच

$
0
0
नव्या शैक्षणिक वर्षाचे जवळपास दोन महिने सरले, तरी पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बहिःस्थ प्रवेशांना अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.

‘इमर्जन्सी मेडिसीन’: १० हजार डॉक्टरांची गरज

$
0
0
देशात आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस) कार्यरत झाली असली, तरी हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंटला ‘गोल्डन अवर्स’मध्ये नेमके उपचार देण्यासाठी पुण्यासह देशातील हॉस्पिटलना सुमारे दहा हजार ‘इमर्जन्सी मेडिसीन’ (आपत्कालीन वैद्यकीय शास्त्र तज्ज्ञ-ईएम) विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची गरज निर्माण झाली आहे.

कागदाच्या लगद्यातून साकारले गणराय

$
0
0
जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी सुरू केलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या चळवळीत अनिरूद्ध उपासना केंद्रानेही आता स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे.

साच्याशिवाय तयार करा आकर्षक गणेशमूर्ती

$
0
0
कोणताही साचा न वापरता आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कशी बनवायची याचे प्रशिक्षण देणारे मूर्तिकार मंदार मराठे यांची सध्या लगबग सुरू आहे.

आता आरासही पर्यावरणपूरक

$
0
0
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि रासायनिक रंग टाळण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांचे जोरदार संशोधन सुरू आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी वेगवेगळे उपक्रम त्यांच्यातर्फे राबविण्यात येत आहेत.

नावे वगळल्याची मतदारांना कल्पनाच नाही

$
0
0
मतदार यादीतून दुबार, स्थलांतरित व मृत मतदारांची नावे वगळल्याची कल्पना अनेकांना नाही. मतदार यादीच्या सुधारणेच्या नावाखाली वगळलेली नावे कोणाला कळूच नये अशी दक्षता निवडणूक आयोगाने घेतल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

मतदार यादीत नावांच्या समावेशासाठी सुनावणी

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार यादीत समावेश नसलेल्या आणि यादीतून नावे वगळलेल्या नागरिकांसाठी २२ ते २७ ऑगस्ट या कालावधीत सुनावणी घेण्यात येणार आहे.

रेशनिंगचा तांदूळ पकडला

$
0
0
पुण्यातून गुजरातमधील नवसारीला घेऊन चाललेल्या रेशनिंगच्या तांदळाचा ट्रक निगडी जकात नाका येथे गुन्हे शाखेच्या युनिट तीनने शनिवारी पहाटे पकडला.

बेकायदा होर्डिंगबाबतच्या धोरणांसाठी समिती

$
0
0
शहरात उभारल्या जाणाऱ्या बेकायदा होर्डिंगबाबत धोरण ठरविण्यासाठी निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

गुजरातचा विकास हा बनावच

$
0
0
‘आपले राजकीय मनसुबे साध्य करण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे सोशल नेटवर्किंगसारख्या माध्यमांचा वापर करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आहेत.

‘अभिनय सोपा नाही’

$
0
0
मनापासून असलेली आवड...त्याला अविरत कष्टांची दिलेली जोड देत आज गाठलेली उंची... मनोरंजनाच्या क्षेत्रात यशस्वीपणे कारकीर्द घडविलेल्या व्यक्तींकडून मनोरंजनाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना रविवारी अशा मोलाच्या टिप्स मिळाल्या.

महिला बाल कल्याण समिती नावालाच

$
0
0
महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने पालिकेत महिला सभासदांची संख्या अर्ध्याहून अधिक आहे. असे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे मात्र महिला बाल कल्याण समितीला कोणतेही अधिकार नसल्याने समितीच्या बैठकींना पालिकेतील अधिकारी सर्रास गैरहजर राहतात.

मराठा महासंघाला मात्र हवा OBC त समावेश

$
0
0
मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गात २५ टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन मर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रीयन मराठा महासंघाने मराठा आरक्षण समितीकडे केली आहे.

प्रसूतिगृहातील साधनसामग्री वापराविनाच

$
0
0
शहरातील प्रसूतिगृहांमधील साधनसामग्रीवर कोट्यवधी रुपये खर्चूनही त्याचा पुरेसा विनियोग होत नसल्याची बाब समोर आली आहे.

वाहतूक आराखडा आणि हक्काचे पाणी

$
0
0
शहरातील रस्त्यांवरील खड्डे, बेकायदा होर्डिंग, अधिकाऱ्यांची बैठकांना अनुपस्थिती यामुळे पालिका प्रशासनावर सर्वपक्षीय राजकीय ने‌त्यांकडून टीकेची तोफ डागली जात आहे.

कंत्राटदारावर कारवाई होणार

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील ‘पे अँड पार्क’ करण्यात आलेल्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या बोर्डाच्या आदेशाला कंत्राटदाराने हरताळ फासला आहे.

FC रोडवर या, गाडी डोक्यावर घेऊनच!

$
0
0
‘दहशतवाद्यांची धमकी... ‘नो पार्किंग-नो वॉकिंग’. कृपया, घरातून बाहेर पडू नये, डोक्यावर वाहन घेऊनच फर्ग्युसन रोडवर यावे... उपरोधिक सल्ले देत डेक्कन पसिरातील रहिवाशी आाणि दुकानदारांनी रविवारी फर्ग्युसन रोडवरील ‘एकेरी पार्किंग’च्या निर्णयाला विरोध केला.

एम. जी. रोडवरील दुकानाला आग

$
0
0
एम. जी. रोडवरील अॅक्वारिअमच्या दुकानाला रविवारी सकाळी लागलेल्या आगीत दुकानातील वस्तू आणि खाद्यपदार्थ जळून खाक झाले. शेजारी असलेल्या बँकेच्या काचा उष्णतेने फुटल्या असल्या, तरी फायर ब्रिगेडच्या जवानांनी बँकेचा आगीपासून बचाव केला.

विद्यार्थ्यांना देणार ‘स्वाइन फ्लू’चे धडे

$
0
0
महापालिकेच्या अखत्यारीतील साडेचारशेहून अधिक शाळांमध्ये आता आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिकांचे पथक जाऊन ‘स्वाइन फ्लू’च्या संसर्गापासून दूर राहण्यासंबंधीचे ‘धडे’ देणार आहेत; तसेच शाळांमध्ये पालकांच्या बैठका घेऊन त्यांना सतर्क करण्याचे आदेश शिक्षण मंडळांच्या शिक्षणप्रमुखांनी देण्यात आले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images