Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

NTS परीक्षा येत्या १७ नोव्हेंबरला

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या १७ नोव्हेंबरला राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्तीसाठी राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत.

मुले-सुनांच्या जाचामुळे आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
मुले आणि सुनांच्या जाचाला कंटाळून ७५ वर्षांच्या वृद्धेने शिवाजी पुलावरून नदीत उडी मारून रविवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने नदीच्या पात्रात असलेल्या दोघांनी अवघ्या काही मिनिटांत त्यांना सुखरूप पाण्याबाहेर काढले.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या

$
0
0
गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा वापरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आर्थिक निकषांचा विषय मांडून मराठा समाजाची फसवणूक केली, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी केला.

संमेलनस्थळ होणार ‘जगताप साहित्यनगरी’?

$
0
0
जानेवारी महिन्यात सासवडमध्ये होत असलेल्या ८७ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणास ‘श्रीमंत गोदाजीराजे जगताप साहित्यनगरी’ असे नाव द्यावे, असा ठराव अत्रे प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेच्या बैठकीत करण्यात आला आहे.

कॅमेरे बसवा. स्पीकरची मर्यादा पाळा

$
0
0
दहीहंडी साजरी करत असताना ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवा, धोकादायक इमारतींना दहीहंडी बांधू नका, याबरोबरच लाउड स्पीकरची मर्यादा पाळा, असे आवाहन पोलिस उपायुक्त मकरंद रानडे यांनी दहीहंडी मंडळांना रविवारी केले.

किरकोळ बाजारपेठेत तेजी

$
0
0
घाऊक बाजारपेठेत कांद्याचे दर उतरले असले, तरी किरकोळ बाजारपेठेतील दर अजून तेजीतच आहेत. कांद्याचे घाऊक बाजारातील दर ८० ते ९० रुपयांनी खाली आले असले, तरी किरकोळ बाजारातील व्यापारी कांद्याची विक्री ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो दराने करीत आहेत.

हॉटेलमध्ये कांद्याची वानवा

$
0
0
गगनाला भिडलेल्या कांद्याच्या दरांनी सर्वसामान्य गृहिणींबरोबरच हॉटेल व्यावसायीकही अडचणीत आले आहेत.

'तो' मुहूर्तही BRTने हुकवला

$
0
0
मोठा गाजावाजा केलेल्या नगर रोड आणि आळंदी रोडच्या ‘बीआरटी’ला लोकप्रतिनिधींच्या दुटप्पी भूमिकेमुळे आणि प्रशासनाच्या कूर्मगतीमुळे अजूनही स्टार्टर मिळालेला नाही.

शिफारसपत्रांचा होतोय गैरवापर

$
0
0
महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नगरसेवकांना देण्यात आलेल्या शिफारसपत्रांचा गैरवापर होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शिफारसपत्रांच्या वापराबाबत बहुतांश नगरसेवक अनभिज्ञ असल्याचेही पुढे आले आहे.

रिक्षा प्रवास महागणार

$
0
0
प्रवास दराच्या मुद्द्यावरून राज्यभरातील रिक्षा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना प्रवास दरात सोमवारी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक एका किलोमीटरमागे साधारणत: एक रुपयाने वाढ होण्याचा अंदाज आहे.

अपंगांना सुविधा देण्यात पुणे विद्यापीठ असमर्थ

$
0
0
विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांची तपासणी करताना अंध-अपंगांच्या सुविधांविषयी जागरूकता दाखवणारे पुणे विद्यापीठ आपल्याच आवारात अशा सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरले आहे.

माकडांना खायला देऊन पाळीव करू नका

$
0
0
घराच्या गच्चीत, गॅलरीत अथवा रस्त्याच्याकडेला एखादे माकड दिसले, तर नागरिकांमधील भूतदया अचानक जागी होते आणि हौशी मंडळी त्यांना वेफर्स, बिस्किटे किंवा फळे खायला देतात. लोकाश्रयात राहण्याची सवय लागल्यामुळेच माकडांचा उपद्रव वाढला आहे.

आवकीनुसारच ठरतात कांद्याचे भाव

$
0
0
घाऊक बाजारपेठेत दररोज कांद्याची आवक किती होते, याच आधारावर पुण्यातील बाजारपेठेत कांद्याची किंमत ठरते.

कांद्याचे दर लवकरच आवाक्यात

$
0
0
घाऊक बाजारामध्ये कांद्याचे भाव कमी झाले असून, येत्या दोन-तीन दिवसांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचे दर आवाक्यात येण्याची शक्यता आहे. कांद्याचे घाऊक बाजारातील दर १० ते १५ रुपयांनी घसरले होते.

अशी ही दुनियादारी

$
0
0
घरातील नातवांना साभाळण्याची जबाबदारी ज्येष्ठांची मानली जाते. मुलगा-सून नोकरी करतात त्यामुळे ज्येष्ठच घरात असतात. तरुणांनी ज्येष्ठांशी मनमोकळे बोलणे, त्यांच्याबद्दल जाणून घेणे या गोष्टी तर दुरापास्तच झाल्या आहेत.

पानविक्रेते गेले आमदारांच्या दारी

$
0
0
सुगंधित सुपारी आणि प्रक्रिया केलेल्या तंबाखूची विक्री न करण्याचा नियम राज्य शासनाने मागे घ्यावा यासाठी पुणे पान असोसिएशनने पुण्यातील आमदारांची दारे ठोठावली आहेत.

पश्चिम भारताचा हरित लवाद पुण्यात

$
0
0
महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दीव दमण भागातील पर्यावरणावर आधारित खटल्याचे कामकाज आता पुण्यातून चालणार आहे. येत्या रविवारी (२५ ऑगस्ट) नवीन प्रशासकीय इमारतीत सुरू झालेल्या हरित लवादाचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्या हस्ते होणार आहे.

पोस्ट ATM बांधकामाला PMC ची परवानगी

$
0
0
पोस्टातील व्यवहारांसाठी ऑटोमेटिक टेलर मशिन (एटीएम) सेंटर उभारण्यास पुणे महापालिकेने परवानगी दिली आहे.

इस्त्रीची घडी मोडू न देता राजकारण

$
0
0
‘इस्त्रीची घडी मोडू न देता राजकारण करण्याचा प्रघात महाराष्ट्रात सुरू झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे विकासासाठी भांडण करणेच थांबले आहे,’ असे स्पष्ट मत राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी नुकतेच व्यक्त केले.

संपावर आम्ही ठाम!

$
0
0
रिक्षाचालकांच्या मागण्यांसाठी पुकारलेला २२ ते २४ ऑगस्ट रोजीच्या संपावर ठाम असल्याचे राज्य ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शरद राव यांनी पुण्यात स्पष्ट केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images