Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पानविक्रेत्यांची ‘चलो मुंबई’ची हाक

$
0
0
सुगंधित सुपारी आणि प्रक्रिया केलेल्या तंबाखूची विक्री न करण्याच्या राज्य सरकारच्या नियमाला चुना लावण्यासाठी पानविक्रेत्यांनी तयारी केली आहे. या नियमाविरोधात पानविक्रेत्यांनी १६ ऑगस्टला ‘चलो मुंबई’ची हाक दिली असून, या दिवशी राज्यभरातील पानविक्रेते दुकान बंद ठेवून एल्फिन्स्टन रोडवरील कामगार मैदानावर एकत्र येणार आहेत.

‘जिंदगी बडी होनी चाहिये;..!’

$
0
0
‘आनंद’ चित्रपटातील ‘जिंदगी बडी होनी चाहिये; लंबी नही,’ हा डायलॉग सार्थ ठरवीत काही कलाकृती कालातीत ठरतात. त्याप्रमाणेच ‘चिंटू’सारख्या काही कलाकृती काळाची आणि वयाची मर्यादा पार करून अजरामर ठरतात, असे प्रतिपादन व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केले.

एक्सप्रेसववर अपघात, चार ठार

$
0
0
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर तुंगार्ली येथील नारायणीधाम जवळ आज (शुक्रवारी) सकाळी ६.४५ वाजता मारुती ओम्नीने संरक्षक कठडा (डिव्हायडर) ओलांडून ट्रकला धडक दिली. या अपघातात ओम्नीतील चारजण ठार झाले. सर्व मृत व्यक्ती मुंबईच्या रहिवासी आहेत.

‘बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करा’

$
0
0
बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द केल्यास हीच आंदोलनात बळी पडलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे.

‘डास निर्मूलनावर प्रभावी उपाययोजना करा’

$
0
0
डास मारण्यासाठी फॉगिंग मशीनमधून केल्या जाणाऱ्या धूर फवारणीवर बंदी घालण्यात आल्याने शहरात डेंग्यू, मलेरियाच्या पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

उपजिल्हाधिका-यांच्या बदल्यांचे आदेश आज मिळणार

$
0
0
पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी सुरेश जाधव, मावळ प्रांत अधिकारीपदी सुभाष बोरकर, हवेली प्रांतपदी स्नेहल बर्गे व खेड प्रांत अधिकारी पदावर हिम्मत खराडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

ऑलिम्पियाड, एनटीएसमध्ये हवा समन्वय

$
0
0
विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे असेल, तर विविध विज्ञान ऑलिम्पियाड, नॅशनल टॅलेंट सर्चसारख्या (एनटीएस) परीक्षा, आयआयटी-जेईई यांच्यात समन्वय आणण्याचा विचार व्हायला हवा, असे मत व्यक्त होत आहे.

‘आयटीआय’साठी पुन्हा मिळणार संधी

$
0
0
‘शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ अर्थात ‘आयटीआय’साठी अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शनिवारपासून पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

फार्मासिस्टचा लपंडाव अधिका-यांच्या मानगुटीवर

$
0
0
फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत ‘प्रीस्क्रिप्शन’शिवाय औषधविक्री करताना औषध विक्रेते आढळल्याने पुण्यातील ‘अन्न व औषध प्रशासना’तील (एफडीए) एका औषध निरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले, तर सहायक आयुक्तांसह सहआयुक्तांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

सत्तेसाठी मतभेद, मनभेद दूर सारा

$
0
0
भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेत यायचे असेल, तर पक्षातील लोकांनी आपला अहंकार बाजूला ठेवायला हवा. बुरसटलेल्या मनाने काम करू नका, असे सांगत पक्षातील मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी शुक्रवारी केले.

टिंबर मार्केटच्या आरक्षणास जागामालकांची हरकत

$
0
0
टिंबर मार्केटसाठी आरक्षित असलेल्या बिबवेवाडीतील ५७ एकर जागेवरील आरक्षण उठविण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला आहे.

एक्स्प्रेस वेवरील अपघातात मुंबईचे चौघे ठार

$
0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्यातील तुंगार्ली गावच्या हद्दीत भरधाव ओम्नी कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण मुंबईचे रहिवासी होते.

हवेलीतील वाड्यांना गावठाण दर्जाचा प्रस्ताव

$
0
0
‘डोंगरमाथा व डोंगर उतार’ विभागातील सुमारे दोनशे एकर जमीन निवासी करण्याचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे दाखल झाला होता. या प्रस्तावाला नगर रचना सहायक संचालकांनी आक्षेप घेतला आणि गावठाणापुरताच निवासीकरणाचा मुद्दा विचारात घ्यावा असे सूचविले.

खड्डे बुजविण्याची घोषणाही ‘खड्ड्यातच’

$
0
0
महापालिकेची खड्डे बुजविण्याची घोषणा पुन्हा एकदा ‘हवेतच’ विरली आहे. नऊ ऑगस्टपर्यंत शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचा शब्द पाळण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.

पोषण आहारासंबंधी संघटना आक्रमक

$
0
0
विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात काही त्रुटी आढळल्यास संबधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शि‌क्षक यांना जबाबदार धरण्याच्या निर्णयाला मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.

गटारांमुळे पालिका तोंडघशी

$
0
0
शहरातील विकासकामांसाठी कोट्यवधींचा खर्च करूनही प्रत्यक्षात हलक्या प्रतीचे काम करण्याची पालिकेची हातोटी केंद्र सरकारच्या योजनांमध्ये झळकली आहे.

पोलिसाला लाच घेताना अटक

$
0
0
बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सलाउद्दीन अल्लाउद्दीन शेख यांना ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले.

कॅन्टोन्मेंट बोर्डच करणार वसुली?

$
0
0
‘पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डा’च्या हद्दीत ‘स्थानिक संस्था कर’ (एलबीटी) वसूल करून बदल्यात प्रतिवर्षी पूर्वीप्रमाणे रक्कम देण्याचा पुणे महापालिकेचा प्रस्ताव बोर्डाने धुडकावला.

पावसाळी गटारे रस्त्यांच्या मुळावर

$
0
0
शहरातील ६० टक्के रस्त्यांवर पावसाळी गटारे नसल्याचे वास्तव असले, तरी ४० टक्के रस्त्यांवरही त्यांची अवस्था निकृष्ट दर्जाचीच आहे. पावसाळी गटारांच्या झाकणांच्या बाजूलाच तळी साचत असल्याने रस्ते खराब होत आहेत.

अश्वगंधामुळे लस परिणामकारक

$
0
0
लशीची परिणामकारता वाढविण्यासाठी ‘अॅडज्युव्हंट’ (रोगप्रतिकारक पदार्थ) म्हणून अश्वगंधा वनस्पतीच्या अर्काचा वापर करण्याच्या पुण्यातील प्रयोगाला अमेरिकेचे पेटंट मिळाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images