Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

इशरत जहाँ निष्पाप... : शरद पवार

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मालेगाव बॉम्बस्फोट आणि इशरत जहाँ प्रकरणी वादग्रस्त विधान केल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

'पुणे मेट्रोला उशीरच'

0
0
पाच वर्षे केवळ चर्चेच्या फेऱ्यांमध्येच अडकलेल्या पुणे मेट्रोला उशीर झाल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.

नवे उपविभागीय अधिकारी सोमवारी कार्यभार घेणार

0
0
नव्या उपविभागांची निर्मिती व कार्यकाळ पूर्ण झालेल्या पुणे विभागातील ५२ उपजिल्हाधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश राज्य सरकारने शनिवारी काढले.

नागरिकांच्या सतर्कतेने अल्पवयीन चोरटा ताब्यात

0
0
कात्रज ते पिंपळे गुरव या बसमधून प्रवास करत असलेल्या एका ५२ वर्षीय व्यक्तीची बॅग चोरणाऱ्या दोन मुलांपैकी एका अल्पवयीन मुलाला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले.

डॉ. बाबा आढाव यांना अध्यक्षपदावरून हटविले

0
0
राज्यभरातील रिक्षाचालकांचे नेतृत्व करणाऱ्या ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीमध्ये फूट पडली असून, डॉ. बाबा आढाव यांना समितीच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले आहे.

लोकसभेचे उमेदवार महिन्यात

0
0
‘लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चा होऊन महिन्याअखेरीपर्यंत जागावाटप निश्चित होईल. त्यानंतर दहा दिवसांतच राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार जाहीर करू,’ अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी दिली.

तुम्हाला प्राण्यांची आवड आहे? स्वयंसेवकपद वाट बघतंय!

0
0
वाघ, बिबट्या, हत्तीपासून अगदी छोट्याशा हरणापर्यंतच्या सगळ्या प्राण्यांची पिंजऱ्याबाहेरून काळजी घेण्यासाठी, संग्रहालय बघायला येणाऱ्या पर्यटकांचे नियोजन आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला सध्या स्वयंसेवक हवे आहेत.

जंगलचे राजा-राणी करणार कात्रज प्राणिसंग्रहालयावर राज्य

0
0
देशातले एक आदर्श प्राणिसंग्रहालय असा मान मिळालेल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात लवकरच जंगलच्या राजा-राणीचे राज्य येणार आहे. सिंहाच्या जोडीसह काही नवीन प्राणी संग्रहालयात दाखल होणार आहेत.

ज्ञानाधिष्ठित राजकारणाआधारे विकासाचा विचार महत्त्वाचा

0
0
‘ज्ञानाधिष्ठित राजकारणाच्या आधारे विकासाचा न्यायमूर्ती रानडेंनी मांडलेला विचार आजही तितकाच गरजेचा आहे,’ असे मत अभिनेते विक्रम गायकवाड यांनी व्यक्त केले.

‘मैत्र कट्टा’ पेलणार पालकत्वाचे आव्हान

0
0
लहान वयातल्या मुलांना कधीतरी राग येतो, काही वेळा त्यांना एखाद्या गोष्टीपासून परावृत्त करायचे असते, तर काही वेळा मुलांना न दुखावता त्यांना समजावून सांगायचे असते; मोठ्या मुलांच्या बाबतीत कधी तरी कसे वागावे हेच समजत नाही; मग अशा वेळी कोणत्या पद्धतीने मुलांशी बोलावे, त्यांची मानसिकता कशी समजून घ्यावी याबाबत पालकांचा गोंधळ होतो.

१० विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस मनाई

0
0
दहा विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची रिक्षावालेकाकांची मागणी परिवहन खात्याचे सचिव शैलेशकुमार शर्मा यांनी शनिवारी धुडकावली. परंतु, विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास अन्य सक्षम पर्याय नसल्याने रिक्षांवर कारवाई करताना आखडता हात घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी कबूल केले.

लँड सीलिंग कमी होणार नाही

0
0
‘केंद्र सरकारच्या वतीने जमीन सुधारणाविषयक मसुदा मांडण्यात आला असला, तरी जमीन धारणेची कमाल मर्यादा (लँड सीलिंग) कमी होणार नाही,’ असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.

स्वस्त भाजी योजनेला मोडता

0
0
सामान्यांना स्वस्तात भाजी मिळवून देणा-या योजने विरोधात आडते एक‌त्र आले आहेत. स्वस्त भाजी विक्री केंद्रे गुलटेकडी येथील मार्केट यार्डातून अन्यत्र हलविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

एफसी रोड:उजवीकडे नो पार्किंग

0
0
फर्ग्युसन रोडवरील पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आला असून, या रोडवरील अर्चिज गॅलरी, वाडेश्वर ते सुदर्शन मंडळापर्यंत आता ‘नो पार्किंग’ करण्यात आले आहे.

पालिकेच्या उपअभियंत्याला अटक

0
0
पुणे महानगरपालिकेतील उपअभियंत्याने आपली चांगल्या ठिकाणी बदली होणार असून त्यासाठी पंधरा लाख रुपये दिल्यास सहा महिन्यात ३० लाख देतो, असे सांगून खडकवासला येथील एका बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

टक्केवारी घेणा-यांवर कारवाई

0
0
‘महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक यांच्यापैकी कोणीही टक्केवारी घेत असेल, तर हा सूर्य, हा जयद्रथ दाखवून द्या. मी त्यांच्यावर कारवाई करीन,’ अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी मांडली.

मनसेचा ‘ई-स्क्वेअर’मध्ये गोंधळ

0
0
शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर थिएटरमध्ये ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपट बंद करून त्याऐवजी चेन्नई एक्स्प्रेस हा हिंदी चित्रपट दाखविल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी थिएटरमध्ये गोंधळ घातला.

आर्थिक निकषांवरच आरक्षण हवे

0
0
एससी-एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणापैकी पाव टक्क्यालाही धक्का लागू देणार नाही आणि त्यानंतरही आर्थिक निकषांवर सर्वच जातीधर्मातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यात यावे, अशीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका राहील, असे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात स्पष्ट केले.

...तर मुस्लिमांचा दोष काय:पवार

0
0
‘मालेगाव बॉम्बस्फोटात १९ मुसलमान तरुणांना नाहक शिक्षा होते. कॉलेजात शिकणाऱ्या इशरत जहाँला अचानक दहशतवादी ठरवले जाते. या अन्यायाचा राग मुस्लिम तरुणांच्या डोक्यात शिरला व त्यांनी काही कृत्य केले तर त्यांचा दोष काय?,’ असे वक्तव्य कृषिमंत्री शरद पवार यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

तात्यासाहेब गोडसे यांच्यावर पुस्तक

0
0
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे एक प्रमुख मार्गदर्शक प्रतापराव उर्फ तात्यासाहेब गोडसे यांच्यावरील ‘तात्यासाहेब गोडसे व्यक्ती, काळ आणि कर्तृत्व’ या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन दगडूशेठ गणपती मंदिरात करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images