Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ऑलिम्पियाडसाठी हवी प्रशिक्षित शिक्षकांची फळी

$
0
0
इराण, चीन आणि हंगेरी यांसारख्या देशांत ऑलिम्पियाडची तयारी करून घेण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांच्या स्वतंत्र फळ्या उभ्या राहत असताना भारतात मात्र तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.

पावसाची दडी आणखी दोन-तीन दिवस

$
0
0
गेले काही दिवस उघडीप दिल्यानंतर गुरुवारी शहराच्या काही भागांत पावसाच्या तुरळक स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली. गुरुवारी दिवसभर शहराच्या बहुतांश भागात लख्ख ऊन पडले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेली दडी आणखी दोन-तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

‘निवडणूकनाट्य’ रंगणार

$
0
0
नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे नाट्य आता चांगलेच रंगणार असल्याची चिन्हे आहेत. कारण, पंधरा जागांसाठी चाळीस अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेचे काय होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विद्यार्थी संघटनांचा शिक्षणमंत्र्यांना घेराव

$
0
0
पुण्यातील सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना घेराव घातला. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्षा सुमन शिंदे यांनी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींवर खोटे गुन्हे दाखल केले, अशी तक्रार या प्रतिनिधींनी दर्डांकडे केली आणि त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली.

मुदतीपूर्वी ५५ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या?

$
0
0
नव्या उपविभागांची निर्मिती व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सुमारे ५५ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी काही बदल्यांचे केलेले प्रस्ताव मात्र वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

आयुक्तसाहेब, हे पाहा ‘खड्डेमुक्त’ रस्ते!

$
0
0
खड्डे आणि डबक्यांचे साम्राज्य असलेल्या रस्त्यांवर खचलेली ड्रेनेज चेंबर, साइडपट्टी... कोथरूडमधील महात्मा सोसायटी ते एकलव्य कॉलेज आणि सहजानंद सोसायटी ते आशिष गार्डन हॉटेल या रस्त्यांचा हा ‘आंखो देखा हाल.’ महानगरपालिका प्रशासन आणि माननीयांच्या ‘आदर्श’ कारभारामुळे रस्त्यांच्या दर्जाची हमी खड्ड्यात गेल्यानंतर पुणेकरांची कशी वाट लागत आहे, याचा हा उत्तम नमुना.

संमेलनाध्यक्षपदाच्या रिंगणात संजय सोनवणी

$
0
0
सासवड येथे होणाऱ्या ८७व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संजय सोनवणी यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. साहित्य परिषदेच्या पुणे शाखेतून ते अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत.

कमिशनबहाद्दर नगरसेवकांची ‘पोलखोल’ करा

$
0
0
रस्त्यांवर खड्डे पडल्यास चर्चा होते, ती फक्त संबंधित रस्त्याचे काम केलेल्या ठेकेदारांचीच. रस्ते खराब झाल्यानंतर संपूर्ण दोष प्रशासन ठेकेदाराच्या माथी मारून रिकामे होते. ठेकेदारांची यादी करून त्यांना ‘काळ्या यादीत’ टाकले जाते. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा दर्जा तपासणारे इंजिनीअर कोणत्याही कारवाईविना नामानिराळेच राहतात. ठेकेदारांना काळ्या यादीत टाकताना संबंधित इंजिन‌ीअर आणि कमिशन घेणाऱ्या नगरसेवकांची यादीही प्रसिद्ध करावी, अशी मागणी ठेकेदारांकडून करण्यात येत आहे.

‘खोदाई करणाऱ्यांवरच दुरुस्तीची जबाबदारी’

$
0
0
रस्त्यांवर खड्डे पडल्यास चर्चा होते, ती फक्त संबंधित रस्त्याचे काम केलेल्या ठेकेदारांचीच. रस्ते खराब झाल्यानंतर संपूर्ण दोष प्रशासन ठेकेदाराच्या माथी मारून रिकामे होते. ठेकेदारांची यादी करून त्यांना ‘काळ्या यादीत’ टाकले जाते. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा दर्जा तपासणारे इंजिनीअर कोणत्याही कारवाईविना नामानिराळेच राहतात. ठेकेदारांना काळ्या यादीत टाकताना संबंधित इंजिन‌ीअर आणि कमिशन घेणाऱ्या नगरसेवकांची यादीही प्रसिद्ध करावी, अशी मागणी ठेकेदारांकडून करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या उदरात आणखी सहा गावे दाखल

$
0
0
महानगरपालिकेच्या हद्दीत आणखी सहा गावे घेण्यास विधी समितीने गुरुवारी मान्यता दिली. काँग्रेस आणि मनसेने केलेला विरोध डावलून राष्ट्रवादीने भाजपच्या मदतीने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.

‘आयपीएल बेटिंग’ने घेतला विवाहितेचा बळी

$
0
0
‘आयपीएल बेटिंग’मधील क्रिकेटपटूंच्या सहभागामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर याच स्पर्धेतील बेटिंगच्या जाळ्यात पती गुरफटल्यामुळे छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून विवाहितेचा पती आणि सासऱ्याला गजाआड केले आहे.

चौघा अल्पवयीनांनी केला युवकाचा खून

$
0
0
वारज्यातील विठ्ठलनगर परिसरात बालाजी मंदिराजवळील चौथाऱ्यावर चौघा अल्पवयीन मुलांनी आपल्याच साथीदाराचा कोयता आणि ब्लेडने वार करून, तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. घटनेनंतर केवळ काही तासांत सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

रंगभूमीची अविरत सेवा

$
0
0
जयमाला शिलेदार यांचा जन्म २१ ऑगस्ट १९२६ रोजी इंदौर येथे झाला होता. गोविंदराव तांबे यांच्या ‘देशांतर’ या नाटकातून त्यांनी १९४२मध्ये संगीत रंगभूमीवर पदार्पण केले.

पौर्णिमा हत्तिणीचा मालक पळाला...

$
0
0
कोर्टकेसच्या चक्रात फसलेल्या पौर्णिमा हत्तिणीवर आता जगायचं कसं, असे म्हणण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे. लोकाश्रयावर वृद्धत्वाच्या अडचणींशी कसाबसा सामना करणाऱ्या या हत्तिणीची देखभाल करणारा मालक फरारी आता झाला आहे. त्यामुळे कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तिला रस्त्यावर भीक मागावी लागणार आहे.

जयमाला शिलेदार काळाच्या पडद्याआड

$
0
0
संगीत रंगभूमीवर गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री जयमाला शिलेदार (वय ८६) यांचे गुरुवारी (८ ऑगस्ट) पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुली आहेत. रंगभूमीवरील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याच वर्षी त्यांना ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले होते.

सुहास्य वदना, गानयोगिनी...

$
0
0
जयमालाबाई शिलेदार म्हणजे एक अशा कलावंत ज्यांचा श्वास, ध्यास आणि आस सारं काही संगीताशी जोडलेलं होतं. संगीत रंगभूमी गाजविणाऱ्या त्या एक दिग्गज कलाकार तर होत्याच; पण केवळ आपलं काम तेवढं चांगलं करावं आणि बाजूला व्हावं असं त्याचं नव्हतं, तर संगीत नाटक हे सगळ्यांनी पुढे घेऊन जायचं आहे, त्यासाठी प्रत्येकानेच तयारीने रंगमंचावर उतरायला पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा.

‘एनजीओंमुळेच प्रकल्प रखडले’

$
0
0
पुण्यातील महत्त्वाचे प्रकल्प रखडण्याला स्वयंसेवी संस्थाच (एनजीओ) जबाबदार असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केली.

रेशनकार्डे होणार महिलेच्या नावे

$
0
0
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘अन्नसुरक्षा कायदा’ लागू झाल्यानंतर त्यातील तरतुदींनुसार सर्व रेशनकार्डे कुटुंबातील महिलेच्या नावावर करण्यात येणार आहेत. हा बदल लवकरच अपेक्षित असल्यामुळे राज्यात देण्यात येत असलेल्या कम्प्युटराइज्ड रेशनकार्डांचे स्वरूपही बदलणार आहे.

वॉटरलाइन नाही, रस्ते पाण्यात

$
0
0
पुण्यातील खड्ड्यांची जबाबदारी ढकलण्याच्या प्रयत्नात असलेली महापालिका स्वतःला मात्र नामानिराळे ठेवत आहे. पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या पालिकेने शहरातील तब्बल ६० टक्के रस्त्यांवर पाणी वाहून नेणाऱ्या ‘वॉटरलाइन’चीच सोय केलेली नाही. त्यामुळेच रस्त्यांवर खड्डे आणि डबक्यांचे साम्राज्य पसरले आहे.

स्वर निमाला... रंग सरला

$
0
0
संगीत रंगभूमीवर गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री जयमाला शिलेदार (वय ८६) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुली आहेत. रंगभूमीवरील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images