Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘कँन्टोन्मेंट’ निवडणुका जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली घ्या!

$
0
0
पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका लष्कराऐवजी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली घेण्याची मागणी भाजपने केली आहे. बोर्डाची लांबणीवर पडलेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. महिला तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रभाग निश्चित करण्याबाबतचे पत्र संरक्षण खात्याने बोर्डाला पाठवले आहे.

‘मल्टिऑर्गन’ ट्रान्सप्लांटसाठी आता पुणे सज्ज...!

$
0
0
आयटी, मेट्रो सिटी म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात लवकरच डोळे, किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पॅनक्रियाज, हार्ट, लंग्ज, तसेच इन्टेस्टाइन यासारखे ‘मल्टिऑर्गन ट्रान्सप्लांट’ करणे शक्य होणार आहे. पॅनक्रियाजबरोबर अन्य अवयवांच्या ट्रान्सप्लांटच्या सुविधांसह प्रशिक्षित तज्ज्ञ उपलब्ध करण्यासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

राज्यभर पावसाची कृपादृष्टी

$
0
0
गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्रावर यंदा पावसाने हंगामातील पहिल्या दोन महिन्यांत कृपादृष्टी दाखवली आहे. राज्याच्या सर्व भागांत जोरदार पाऊस झाल्याने हंगामाच्या एकूण सरासरीच्या ८० टक्के पाऊस जुलैअखेरीसच झाल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

सिगारेटची विक्री बंद करणार

$
0
0
राज्य सरकारने सुगंधी सुपारी आणि प्रक्रिया केलेल्या तंबाखू विक्रीच्या निर्णयाचा निषेध करत पुण्यातील सुमारे तीस हजार पानविक्रेत्यांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली आहे. सरकारच्या या जाचक कायद्याविरोधात पुणे पान असोसिएशनने सरकारला महसूल मिळवून देणाऱ्या सिगरेटची विक्री न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्यवस्थापन यंत्रणेत समन्वयाचा अभाव

$
0
0
‘हवामान शास्त्रज्ञ आणि सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्याने नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी हानी टाळता येत नाही. त्यामुळे हवामानशास्त्रज्ञ आणि सरकारी यंत्रणेतील योग्य समन्वय राखला जावा,’अशी अपेक्षा प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ आणि तापमानवाढीचे अभ्यासक डॉ. ब्रायन हॉस्किन्स यांनी व्यक्त केली.

विद्यापीठात आता ‘फॅशन डिझायनिंग’ही!

$
0
0
फॅशन क्षेत्रातील वाढत्या करिअरसंधींच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने चार वर्षे कालावधीच्या ‘बॅचलर्स इन फॅशन डिझायनिंग’ या पदवी अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे. फक्त विद्यार्थिनींसाठी असलेला हा अभ्यासक्रम याच शैक्षणिक वर्षापासून (२०१३-१४) सुरू होत आहे.

आपत्ती व्यवस्‍थापन कार्य नियोजनबद्ध करणार

$
0
0
‘इंडियन रेडक्रॉस सोसायटी’च्या माध्यमातून अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध आपत्ती व्यवस्थापन कार्य सुरू करण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे सूतोवाच इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र राज्य सचिव होमाई मोदी यांनी पुण्यात केले.

सोसायट्या घेतायत वीजबचतीचे धडे

$
0
0
पार्किंगमधील अनावश्यक लाइट, लिफ्ट, जनरेटर आणि पाण्याच्या पंपांमुळे येणाऱ्या लाखो रुपयांच्या विजेच्या बिलाची बचत कशी करावी, याचे धडे सध्या पुण्यातील मोठ्या तीस सोसायट्या घेत आहेत. ग्रीन एनर्जी फाउंडेशन आणि रेकॉल्ड थर्मो या कंपनीतर्फे सुरू असलेल्या या ‘ऊर्जा संवर्धन प्रकल्प’मुळे काही सोसायट्यांची विजेची बिले ४० ते ६० टक्क्यांनी झाली आहेत.

लोडशेडिंगची पूर्वसूचना मिळणे शक्य

$
0
0
राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे आणि त्यातून किती प्रमाणात वीजनिर्मिती होऊ शकते, याचा अचूक अंदाज आता मिळणार आहे. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन (सीडब्ल्यूपीआरएस) यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या ‘डिजिटल वॉटर लेव्हल रेकॉर्डर’मुळे ही बाब साध्य होणार असून, याद्वारे राज्यातील नागरिकांना लोडशेडिंगच्या संकटाची पूर्वसूचनाच दिली जाणार आहे.

संत तुकोबारायांची पालखी आज देहूत परतणार

$
0
0
रिमझिम पावसाच्या जलधारा अंगावर घेत, मुखी विठूनामाचा जयघोष करीत आनंदाने भारावलेल्या वैष्णवांच्या मेळ्यासह संत तुकाराम महाराजांची परतीची पालखी पिंपरीगावात मुक्कामासाठी गुरुवारी (एक ऑगस्ट) दाखल झाली. पालखी शुक्रवारी (दोन ऑगस्ट) देहूत परतणार आहे.

पौड रोड नव्हे हा तर ‘खड्डे’ रोड

$
0
0
डबल पार्किंग, पदपथांची दुरवस्था, बसस्टॉपमध्ये साचलेले पाणी, खड्डेमय रस्ते यामुळे पौड रोडची अवस्था वाईट झाली आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेच्या (जेएनयूआरएम) माध्यमातून विकसित होऊनही या रस्त्यावरील समस्या कायम आहेत. या समस्यांकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे.

‘आरटीओ’चे कामकाज पोलिस बंदोबस्तात

$
0
0
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) दैनंदिन कामकाज आता पोलिस बंदोबस्तात होणार आहे. वरिष्ठ लिपिकाला झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुढील पंधरा दिवस ऑफिसमध्ये बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परिणामी, कर्मचारी आणि एजंट यांच्यातील वादाला लगाम बसण्याची आशा आहे.

स्वारगेट फ्लायओव्हरचा आराखडा सदोष

$
0
0
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भूमिपूजन झालेल्या स्वारगेटच्या जेधे चौकातील उड्डाणपुलाचा आराखडा सदोष असून, त्यात योग्य बदल केल्याशिवाय प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू नये, असे आवाहन शहरातील स्वयंसेवी संस्थांतर्फे पालिका आयुक्तांकडे करण्यात आले आहे.

विद्यापीठात बहि:स्थ पदव्युत्तरांना बाहेरचा रस्ता?

$
0
0
पदव्युत्तर वर्गांसाठी ‘बहिःस्थ’ म्हणून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठ बाहेरचा रस्ता दाखविण्याची दाट शक्यता आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या येत्या बैठकीमध्ये तसा निर्णय झाल्यास, विद्यापीठ केवळ पदवी पातळीवरच बहिःस्थांसाठीचे अभ्यासक्रम चालविणार आहे.

मिळकतकराद्वारे पालिकेला पाचशे कोटींचा महसूल

$
0
0
मिळकत करापोटी (प्रॉपर्टी टॅक्स) पुणेकरांनी महापालिकेच्या तिजोरीत गेल्या चार महिन्यांत तब्बल पाचशे कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. मागील वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी यंदा ११५ कोटींचा महसूल अधिक मिळाला आहे. चालू बजेटमध्ये दिलेल्या उदिष्टांपैकी ७० टक्के उदिष्ट पहिल्या चार महिन्यातच पूर्ण झाल्याचे कर संकलन आणि कर आकारणी विभागाचे उपायुक्त हेमंत निकम यांनी सांगितले.

शिक्षण, क्रीडा विभागासाठी ३ अब्ज २२ कोटींचा निधी

$
0
0
शैक्षणिक वर्ष २०१३-१४ साठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागासाठी प्रस्तावित एकूण ३ अब्ज २२ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने संबंधित विभागांना वितरीत केला आहे. यातील तीन अब्ज १५ कोटी रुपयांचा निधी माध्यमिक शिक्षण संचालकांकडे, तर सहा कोटी ७६ लाख रुपयांचा निधी क्रीडा आणि युवक सेवा आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे.

आक्षेप डावलून मेट्रोच्या मान्यतेचा प्रस्ताव

$
0
0
राज्य सरकारच्या अर्थ विभागाने पुणे मेट्रोच्या प्रस्तावावर घेलेले सर्व आक्षेप डावलून हा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाईल, असे आश्वासन मुख्यमं‌त्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात दिले.

राज्यातील ४०० वाढीव जागांचा मेडिकलच्या यादीत समावेश

$
0
0
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे (डीएमईआर) मेडिकल प्रवेशांसाठी शुक्रवारी (२ ऑगस्ट) जाहीर होणाऱ्या यादीत राज्यात नव्याने निर्माण झालेल्या मेडिकलच्या ४०० जागांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रक्रियेद्वारे राज्यात एकूण दोन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

‘पीएमपी’ला पालिका कधी देणार पैसे?

$
0
0
हेवी मेटेंन्ससमुळे बंद असलेल्या ‘पीसीएमसी’च्या बस रस्त्यावर आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनुदान दिल्यानंतर ‘पीएमपी’ व्यवस्थापनाचे डोळे पुणे महापालिकेच्या अनुदानाकडे लागले आहेत. पुणे पालिकेने तत्परनेते अनुदान दिल्यास बंद बस रस्त्यावर येऊन प्रवाशांची सोय होणार आहे.

‘नेट’ची जबाबदारी बाहेरच्या संस्थेवर देणार?

$
0
0
कॉलेज शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली ‘नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट’ अर्थात ‘नेट’ ही परीक्षा घेण्याची जबाबदारी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) बाहेरच्या संस्थेवर सोपवली जाण्याची शक्यता आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images