Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

श्रीधरन यांनी सांगितली विकासकामांची चतुःसूत्री

$
0
0
देशातील कोणताही विकास प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वे‍ळेचा काटेकोरपणा, कामातील एकात्मकता, व्यावसायिक गुणवत्ता आणि सामाजिक दायित्त्व ही चतु:सूत्री आवश्यक असल्याचे ‘मेट्रोमॅन’ डॉ. ई. श्रीधरन यांनी गुरुवारी सांगितले. महत्त्वाकांक्षी कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रो प्रकल्प यशस्वी होण्यामागे ही चतु‍:सूत्रीच असल्याचे गुपित त्यांनी उघड केले.

... तर 'कॅशलेस मेडिक्लेम' बंद!

$
0
0
उपचारदरांच्या प्रमाणीकरणाच्या नावाखाली हॉस्पिटलची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारी विमा कंपन्यांनी धोरणात बदल न केल्यास आम्ही ‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजनाच बंद करू, असा इशारा छोट्या हॉस्पिटलनी दिला आहे.

पुण्याला मिळणार हक्काचे पाणी

$
0
0
गेल्या दीड वर्षापासून पाणीकपात सोसल्यानंतर पुणेकरांना अखेर हक्काचे पाणी मिळणार आहे. समाधानकारक पावसाने धरणे ९५ टक्क्यांहून अधिक भरल्याने आता दिवसातून दोन वेळ पाणीपुरवठा करण्यात येईल.

पुणे मेट्रो इतक्यात नाही: श्रीधरन

$
0
0
पुण्यातील मेट्रो प्रकल्प लगेचच सुरू होणे शक्य नसल्याचे ‘मेट्रोमॅन’ डॉ. ई. श्रीधरन यांनी गुरुवारी सांगितले. ‘पुणे मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) देऊन पाच वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, चर्चा आणि वादावादीशिवाय काहीही झालेले नाही,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.

येरवडा जेलमध्ये कैद्याची आत्महत्या

$
0
0
येरवडा जेलच्या गोडाउन यार्डमध्ये आढ्याला टॉवेलने गळफास घेऊन घरफोडीतील कैद्याने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट होवू शकले नसून येरवडा पोलिस आणि जेल प्रशासशाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

पुणे स्टेशनवर नवे ४४ सीसीटीव्ही

$
0
0
पुणे रेल्वे स्टेशन आणि आवारातील हालचालींवर आता ४४ नव्या क्लोज सर्किट कॅमेऱ्यांची (सीसीटीव्ही) नजर राहणार आहे. तसेच, शिवाजीनगर, कोल्हापूर आणि मिरज रेल्वे स्टेशनवर ही यंत्रणा कार्यन्वित होणार आहे. गुप्तचर यंत्रणेने दक्षतेचा इशारा दिल्यानंतर लगेचच ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

इथे कन्हैय्या ‘फुलचंद’ नाही...

$
0
0
राज्य सरकारने गुटख्यापाठोपाठ प्रक्रिया केलेल्या तंबाखूच्या विक्रीवर बंदी घातली. मात्र, असे करताना सरकारने तंबाखू, सिगारेटच्या उत्पादनांना मात्र, रान मोकळे सोडले. त्यांच्यावर बंदी घातली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. याकडे सरकार डोळेझाक करते आहे. अशी बेबंदशाही सरकारच्या दुटप्पीपणाचेच दर्शन घडवित असून महाराष्ट्रात लोकशाही आहे की मोगलाई, असा प्रश्न पानविक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.

‘श्रावणक्वीन’च्या मैत्रीणी

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘श्रावणक्वीन’ स्पर्धेनं ब्युटी विथ ब्रेनला व्यासपीठ दिलं, तसंच या व्यासपीठानं स्पर्धकांमध्ये मैत्रही जुळवलं. १५ दिवसांच्या स्पर्धेनं या स्पर्धकांना आयुष्यभरासाठी मैत्री देऊ केली आहे. ‘श्रावणक्वीन’ला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या आणि फ्रेंडशिप डेनिमित्त त्यांनी मैत्रीच्या नात्याला दिलेला स्पर्धकांनी दिलेला उजळा...

शिक्षण, क्रीडा साठी ३ अब्ज २२ कोटी

$
0
0
शैक्षणिक वर्ष २०१३-१४ साठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागासाठी प्रस्तावित एकूण ३ अब्ज २२ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने संबंधित विभागांना वितरित केला आहे.

घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस

$
0
0
दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे करणा-या दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून दोन लॅपटॉप, मोबाइल, मंगळसूत्र, अंगठी, सोन्याची साखळी असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मिळकतकराद्वारे पालिकेला पाचशे कोटींचा महसूल

$
0
0
मिळकत करापोटी (प्रॉपर्टी टॅक्स) पुणेकरांनी महापालिकेच्या तिजोरीत गेल्या चार महिन्यांत तब्बल पाचशे कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे.

‘पीएमपी’ला पालिका कधी देणार पैसे?

$
0
0
हेवी मेटेंन्ससमुळे बंद असलेल्या ‘पीसीएमसी’च्या बस रस्त्यावर आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनुदान दिल्यानंतर ‘पीएमपी’ व्यवस्थापनाचे डोळे पुणे महापालिकेच्या अनुदानाकडे लागले आहेत.

स्वारगेट फ्लायओव्हरचा आराखडा सदोष

$
0
0
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भूमिपूजन झालेल्या स्वारगेटच्या जेधे चौकातील उड्डाणपुलाचा आराखडा सदोष असून, त्यात योग्य बदल केल्याशिवाय प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू नये, असे आवाहन शहरातील स्वयंसेवी संस्थांतर्फे पालिका आयुक्तांकडे करण्यात आले आहे.

‘उर्दूपीडिया’ आजपासून होणार खुला

$
0
0
उर्दूमध्ये उपलब्ध असलेले ज्ञान एकाच वेबसाइटच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध व्हावे, यासाठी विकिपीडियाच्या धर्तीवर उर्दूपीडिया ही वेबसाइट विकसित करण्यात आली आहे.

लोडशेडिंगची पूर्वसूचना मिळणे शक्य

$
0
0
राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे आणि त्यातून किती प्रमाणात वीजनिर्मिती होऊ शकते, याचा अचूक अंदाज आता मिळणार आहे.

‘बालग्राम’मध्ये चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू

$
0
0
येरवडा येथील बालग्राममध्ये शुक्रवारी सकाळी एका सात वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दरम्यान, या मुलीच्या आईच्या संशयित खूनप्रकरणी नगर पोलिसांकडून तपास सुरू असून त्या गुन्ह्यात ही चिमुरडी साक्षीदार आहे.

शिकागोच्या महापौरांना ‘एक्स्प्रेस वे’चे धक्के

$
0
0
महामार्गावरून प्रवास करताना तो ‘स्मूथ’ असल्याचे जाणवले पाहिजे. मात्र पुणे मुंबई महामार्ग ‘स्मूथ’ नसल्याचे मत व्हिलेज ऑफ ओकुब्रुक (शिकागो) महापौर डॉ. गोपाल जी. लालमलानी यांनी गुरुवारी व्यक्त केले.

‘आर्किटेक्ट’चे असहकार आंदोलन

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागातर्फे आर्किटेक्ट आणि परवानाधारक अभियंत्यांच्या बाबतीत जाचक कारभार सुरू असल्याने त्याच्या निषेधार्थ आर्किटेक्ट असोसिएशनने गुरुवारपासून असहकार आंदोलन पुकारले आहे.

‘न्याती इन्फोसिस’च्या प्रोप्रायटरला अटक

$
0
0
राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेश्मा अनिल भोसले यांच्या मिळकत कराबाबत कम्प्युटरमधील नोंदीत फेरफार केल्याप्रकरणी ‘न्याती इन्फोसिस’चे प्रोप्रायटर तेजांश शाळिग्राम न्याती (वय ३६, रा. शास्त्रीनगर, येरवडा) यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.

अल्पवयीन मुलांनी केली ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

$
0
0
मित्रमंडळ चौकातील आश्रय हॉटेलसमोरून चाललेल्या ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम घेऊन पळ काढण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images