Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अण्णा भाऊ साठेंचे स्मारक पूर्ततेच्या प्रतीक्षेत

$
0
0
पालिकेच्या बजेटमध्ये आवश्यक त्या निधीची तरतूद न केल्याने बिबवेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे काम गेल्या नऊ वर्षापासून रखडल्याचे समोर आले आहे.

‘स्वाइन फ्लू’ने घेतला आणखी दोघांचा बळी

$
0
0
स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे पुरंदर आणि फलटण तालुक्यातील दोघांचा शहरातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

‘एलबीटी’साठी आजपासून पुन्हा सर्वेक्षण

$
0
0
एक एप्रिलपासून शहरात जकातीऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू होऊनही पहिल्या तीन महिन्यांत अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने गुरुवारपासून (एक ऑगस्ट) व्यापा-यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याची मोहीम पालिकेतर्फे घेतली जाणार आहे.

पुण्यात वाढले ‘रेनी डेज’

$
0
0
मान्सूनच्या पूर्वाधात यंदा पुण्यात पावसाने चांगली हजेरी लावली. गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात ११८ मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली. जून महिन्यात १३, तर जुलै महिन्यात १८ ‘रेनी डेज’ ची नोंद झाली.

ठेकेदारांना आता ठेंगा दाखवा

$
0
0
शहरातील खड्ड्यांना जबाबदार असणा-या ठेकेदारांची बँक गॅरेंटी जप्त करून त्यांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी आमदार मोहन जोशी यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

भाटघर धरणात महिला अडकली

$
0
0
भाटघर धरण परिसरातील बेटावर महिला अडकून पडल्याची घटना बुधवारी रात्री घडली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे धरण परिसरातील पाण्यामध्ये वाढ झाली होती.

जिल्ह्यात पाऊस समाधानकारक

$
0
0
सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि नगर जिल्ह्याच्या काही भागासाठी जीवनदायिनी ठरलेले भीमा नदीवरील उजनी धरण वेगाने भरते आहे. बुधवार अखेरीस धरणातील पाणीसाठा ९२.२३ टीएमसी झाला आहे.

राज्यकर्ते सुस्त... नागरिक दक्ष!

$
0
0
पुणेकरांच्या जिवाचा धोका टाळण्यासाठी तत्पर कारभार करण्याची संवेदनशीलता राज्यकर्त्यांमध्ये नसली, तरी सर्वसामान्य नागरिक सर्वतोपरीने काळजी घेत आहे.

पुण्याच्या सुरक्षेशी खेळ

$
0
0
संशयास्पद हालचाली टिपून दहशतवादी कृत्ये रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘क्लोज सर्किट टीव्ही’ योजनेला सत्ताधाऱ्यांतील विसंवादामुळे मुहूर्तच मिळालेला नाही.

‘जलसंपदा’चा ‘कारभार’ पुणेकरांच्या मुळावर

$
0
0
कालव्यातून सात टीएमसी पाणी सोडणारे जलसंपदा खाते पुणेकरांसाठी दररोज २५० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी सोडण्यास मात्र राजी नाही. परिणामी, शहराला दोन वेळचे पाणी मिळणेही शक्य होत नाही.

माळशेज : वाहतूक आजपासून सुरू

$
0
0
दरड कोसळून वाहतूक बंद झालेल्या माळशेज घाटातील दरड बाजूला करण्यात आली असून घाट मोकळा करण्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे.

‘पेपर आर्ट’मधून स्वयंरोजगार

$
0
0
शाळेत शिकवल्या जाणा-या कार्यानुभव या विषयाकडे मुले टाइमपास या दृष्टिकोनातून पाहतात. मात्र, या विषयाला गांभीर्याने घेतल्यास करिअरचे एक नवे दालन खुले होऊ शकते याचा प्रत्यय इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दाखवून दिला आहे.

रस्त्यासाठी मळीचा वापर करा

$
0
0
शहरातील रस्त्यांवर दर वर्षी पडणारे खड्डे बुजविण्यासाठी विविध उपाययोजना पुढे येत असल्या, तरी आता त्यासाठी नैसर्गिक मळीचा वापर करण्याची सूचना केली गेली आहे.

‘आस्क’वर करदाते खूश

$
0
0
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा चांगली असून, पहिल्या तुलनेत वेळेची बचत होत असल्याचे मत करदात्यांनी व्यक्त केले.

सौर दिव्यांनी उजळले विद्यार्थीविश्व

$
0
0
शालेय शिक्षणात मिळणा-या ज्ञानप्रकाशाबरोबर खराखुरा प्रकाशही दप्तरात भरून नेता आला तर!... ही परिकथा नाही, तर सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर गावात सुरू झालेली ही अनोखी प्रकाशकथा आहे...

आफ्रिकेत 'भारतीय विवाह'

$
0
0
पर्यटनामध्ये नेहमीच अग्रसेर असलेल्या चोखंदळ भारतीय पर्यटकांनी साउथ आफ्रिकेच्या नागरिकांना एकदमच खूष केले आहे.

‘रेव्ह पार्टी’ उधळली

$
0
0
पुण्यात आणखी एका ‘रेव्ह पार्टी’ चे बिंग फुटले असून, पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळा पोलिसांच्या हद्दीत आपटी गावात एका बंगल्यात बुधवारी पहाटेपर्यंत चाललेली पार्टी पोलिसांनी उधळली.

खडकवासला १०० टक्के

$
0
0
खडकवासला धरण बुधवारी सायंकाळी शंभर टक्के भरले असून, खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांचा एकत्रित पाणीसाठा ९७.३० टक्क्यांवर पोहोचला.

स्फोटांचे खापर रियाझने फोडले

$
0
0
‘इंडियन मुजाहिदीन’चा (आयएम) दहशतवादी रियाझ भटकळ याने जंगली महाराज रोडवरील साखळी स्फोटांच्या अपयशाचे खापर आपल्याच साथीदारांच्या माथी मारले आणि त्यांना अलगद दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात अडकविले.

शुल्क नियंत्रण कायद्यासाठी आंदोलन उभारण्याची गरज

$
0
0
शुल्क नियंत्रण कायदा अस्तित्त्वात येण्यासाठी पालकांनी एकत्र येत मोठे आंदोलन उभारण्याची गरज आहे. तसेच त्यासाठी राजकीय पातळीवरूनही सरकारवर दबाब आणणे आवश्यक असल्याचा सूर ‘महापॅरेंट्स’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादामध्ये बुधवारी उमटला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images