Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सातारला झुकते माप

$
0
0
राज्यात १८२ उपविभागांची निर्मिती करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्याला झुकते माप देण्यात आले आहे.

पीएमपी बसला स्कूलबसची धडक

$
0
0
विद्यार्थिनीला बसथांब्यावर सोडण्यासाठी थांबलेल्या पीएमपी बसला स्कूलबसने मागून जोरदार धडक दिल्याने स्कूलबसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले.

रिव्हॅल्युएशन प्रक्रिया बदलणार

$
0
0
रिव्हॅल्युएशन आणि उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी मिळवण्यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता येण्यासाठी पुणे विद्यापीठ लवकरच काही बदल करणार असल्याची माहिती कॉलेज आणि विद्यापीठ विकास मंडळाचे (बीसीयूडी) संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.

खड्डे पडल्यास ठेकेदार जबाबदार

$
0
0
रस्त्याचे काम दिलेल्या ठेकेदारांनी दिलेल्या मुदतीच्या आतच रस्त्याची दुरवस्था झाल्यास आणि या कामाचा दर्जा योग्य नसल्यास संबधित ठेकेदारांना नोटिस बजावून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

एसटी अपघात: दोन ठार, तीन गंभीर

$
0
0
पुण्याहून सागंलीकडे निघालेल्या एका विनावाहक एसटी बसने रस्त्यात उभ्या असलेल्या टँकरला धडक दिली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले तर अन्या तीन जण हे गंभीर जखमी आहेत. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजते.

कॅशलेस मेडिक्लेमवर परिणाम

$
0
0
देशातील सहा महानगरांत दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली मेडिक्लेममधील पीपीएन (प्रेफर्ड प्रोव्हायडर नेटवर्क) योजना आता लवकरच पुण्यातील हॉस्पिटल्समध्ये सुरू करण्यात येणार आहे. यामुळे येत्या काही दिवसांत विविध हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या ‘कॅशलेस’ इन्शुरन्सच्या पद्धतीत बरेच बदल होणार आहेत.

'ईरा टॅब' विक्रीसाठी पुण्यात केंद्रे

$
0
0
'बीएसएनएल' आणि 'विश लेट' या कंपन्यांनी एकत्रित येऊन 'आकाश' टॅबच्या धर्तीवर विद्यार्थी, तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन नवा 'ईरा टॅब' बाजारात आणला आहे.

दारूच्या नशेत मित्राचा खून

$
0
0
दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा गोळी घालून खून केल्याचा प्रकार चाकण येथे रविवारी रात्री घडला.

व्यापा-याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

$
0
0
‘जेनफार्मा इंटरनॅशनल’ कंपनीकडून औषधासाठी लागणारा कच्चा माल घेऊन १५ लाख रुपये परत न केल्याप्रकरणी दिल्लीतील एका व्यक्तीविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवना सहकारी बँकेच्या संचालकाच्या घरी चोरी

$
0
0
पवना सहकारी बँकेचे संचालक जितेंद्र मुरलीधर लांडगे यांच्या घरातून १३ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला आहे. हा प्रकार गुरुवारी (२५ जुलै) दुपारी अडीच ते साडेचार वेळेत घडला.

अॅडमिशनच्या नावाखाली १८ लाख उकळले

$
0
0
कात्रज येथील भारती हॉस्पिटलमध्ये ‘एमबीबीएस’च्या पहिल्या वर्षाला अॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कोर्टाची जागा महसूलला देण्यास वकिलांचा विरोध

$
0
0
शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाशेजारील शासकीय गोदामाची आठ एकर जागा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी मंजूर झालेली असताना ही जागा आता महसूल विभागाला देण्याच्या निर्णयाला वकील वर्गांकडून विरोध दर्शविण्यात आला आहे.

ऊन-पावसाचा लपंडाव

$
0
0
पावसाच्या जोरदार सरी..., त्यानंतर उघडीप, थोड्यावेळ लख्ख ऊन आणि पुन्हा पावसाच्या सरींची हजेरी, असे वातावरण शहरात शनिवारी दिवसभर कायम होते.

अंतिम आठवड्यात तरी चर्चा होणार का?

$
0
0
शिंदेवाडी येथील बेकायदा डोंगरफोड व अनधिकृत बांधकामाचा बळी ठरलेल्या मायलेकींना न्याय मिळण्यासाठी विधानसभेत एकाही आमदाराने चर्चा करण्यास पुढाकार घेतला नाही.

‘भामा आसखेड’साठी ४७ कोटी रुपये

$
0
0
भामा आसखेडमधून शहरापर्यंत पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन टाकण्यासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) पहिल्या टप्प्यात ४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

‘एटीकेटी’च्या ३८१ विद्यार्थ्यांना प्रवेश

$
0
0
अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत शनिवारी दहावीला ‘एटीकेटी’ असलेल्या ३८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

नागरिक तोंडघशी; ठेकेदार पाठीशी

$
0
0
गेल्या आठवडाभरापासून शहरातील खड्ड्यांबाबत तक्रारी येत असूनही, या रस्त्यांसाठी जबाबदार असलेल्या एकाही ठेकेदाराला पालिकेने साधी नोटीसही बजावलेली नाही.

पुणे-लोणावळा लोकलसेवा विस्कळित

$
0
0
लोकलसाठी उपलब्ध रेकपैकी एकामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलच्या सहा फे-या शनिवारी रद्द झाल्या.

जनरेशन नेक्स्ट गिरवतेय ‘अलिफ’, ‘बे’चे धडे

$
0
0
‘मिठी जबान’ म्हणून ओळखल्या जाणा-या उर्दू भाषेने तरुणाईला मोहात पाडले आहे. शहरातील विविध वर्गांमध्ये जनरेशन नेक्स्ट अलिफ (अआ), बे (ब), पे (प), ते (त) असे उर्दूचे धडे गिरवत आहे.

स्त्री-देहाचे प्रदर्शन:पुतळ्यांवर बंदी

$
0
0
शहरातील कपड्यांच्या दुकानांबाहेर स्त्री देहाचे प्रदर्शन करणाऱ्या पुतळ्यांवर (मॅनीक्यूज) बंदी घालण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images