Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बेकायदा फ्लॅटची विक्री करून फसवणूक

$
0
0
पुणे महानगरपालिकेकडून २७ फ्लॅट बांधण्याची परवानगी असताना आणखी नऊ फ्लॅट बांधून त्यातील फ्लॅटची विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

५० तालुक्यांतील जमिनींचे आरोग्य खालावले

$
0
0
पुणे विभागातील ५० तालुक्यांत शेतजमिनीचे आरोग्य खालावल्याचे स्पष्ट झाले असून, या जमिनींमध्ये जस्त व लोह या सूक्ष्म मूलद्रव्यांची साठ टक्क्यांपेक्षा कमी उपलब्धता आढळली आहे.

गोळीबार मैदानावर साकारतेय क्रीडा संकुल

$
0
0
प्रदर्शनांसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळीबार मैदानावर आता क्रीडा संकुल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने हाती घेण्याचे ठरवले आहे.

‘बॉम्बे ओ पॉझिटिव्ह’ रक्ताचा तुटवडा

$
0
0
अतिशय दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘बॉम्बे ओ पॉझिटिव्ह’ या नव्या गटाच्या रक्ताचा शहरात तुटवडा निर्माण झाला आहे.

झाड कोसळल्याने महिला गंभीर जखमी

$
0
0
अलंकार पोलिस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाताना रस्त्याच्या कडेला असलेले बाभळीचे झाड सोमवारी रात्री आठच्या सुमारास कोसळले. या झाडाखाली दोन दुचाकी सापडल्या असून, एक महिला गंभीर जखमी व इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

कारच्या धडकेत मुलाचा मृत्यू

$
0
0
डुडुलगाव येथे रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलाचा कारच्या धडकेने मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालकावर अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. समर्थ संजय पवार (वय ७, रा. डुडुलगाव) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.

अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार नाही

$
0
0
‘साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा बहुमान असल्याने त्याबाबत एकमताने निर्णय घेतला पाहिजे. साहित्य संमेलनाची निवडणूक प्रक्रिया मला मान्य नाही.

मुसळधार पावसाची राज्यात शक्यता

$
0
0
राज्यभर मंगळवारी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्याने ओला जुलै आणखी चिंब होणार आहे.

‘डीपी’त कचरा प्रकल्पांसाठी ५ भूखंड

$
0
0
शहरात निर्माण होणा-या घनकच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) बाणेर, आंबेगाव, कोंढवा, हडपसर, वडगाव या पाच ठिकाणी कचऱ्याच्या प्रकल्पासाठी भूखंड आरक्षित ठेवले जातील.

...म्हणूनच रस्ते खड्ड्यात

$
0
0
‘इंडियन रेड काँग्रेस’च्या (आयआरसी) मानकांचे आणि निकषांचे पालन न करताच अशास्त्रीय धोरणाद्वारे रस्त्यांची दुरुस्ती केली जात असल्यानेच खड्ड्यांवर वारंवार खर्च करावा लागत असल्याची तक्रार स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

खड्ड्यांवर चर्चेचा आणखी एक तास

$
0
0
शहराच्या सर्व भागांतील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांसाठी अधिकाऱ्यांच्या दिरंगाईला दोषी धरत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी प्रशासनावर चौफेर टीकास्त्र सोडले. रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची एकमुखी मागणीही या वेळी करण्यात आली.

अपघातस्थळांना ‘ब्रायफेन’चे कवच

$
0
0
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील सर्व अपघातस्थळांवर ब्रायफेन वायर रोप बसविण्यास रस्ते विकास महामंडळाच्या बैठकीत सोमवारी मंजुरी देण्यात आली. द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी १२ किलोमीटर अंतरापर्यंत वायर रोप बसविल्या जाणार आहेत.

बालवाड्यांच्या नावावर गल्ला

$
0
0
‘तुमच्या मुला-मुलीला बोलता येत नसेल तरी चालेल. आमच्या शाळेत ‘सोशल’ करून त्यांचा अभ्यासही घेऊ,’ अशी आश्वासने देऊन नोकरदार पालकांकडून हजारो नव्हे; लाखो रुपये वसूल करणाऱ्या हौशी नर्सरी आणि प्ले ग्रुपचा सध्या गल्लोगल्ली किलबिलाट आहे.

बळींनंतरही आमदारांना पाझर नाही

$
0
0
मायलेकींना बळी गमवावा लागलेल्या शिंदेवाडी ‘प्रलया’च्या दुर्घटनेसंदर्भातील लक्षवेधी सूचना विधानसभेत सोमवारी कोणत्याही चर्चेविना गुंडाळण्यात आली.

दांडीबहाद्दर डॉक्टरांवर कारवाई

$
0
0
सरकारी हॉस्पिटलमध्ये नियुक्त झाल्यानंतरही प्रत्यक्षात तीन वर्षांपर्यंत नोकरीच्या ठिकाणी न फिरकणाऱ्या तीनशे डॉक्टरांवर आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारत त्यांना ‘घरचा रस्ता’ दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.

खडकवासल्याच्या विसर्गात वाढ

$
0
0
पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील बारा धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला धरणाचा विसर्ग चार हजार ८६६ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला, त्यामुळे मुठा नदी मंगळवारी दुथडी भरून वाहिली.

प्रादेशिक विकास आराखड्याला मुहूर्त कधी?

$
0
0
पुण्याची वाढती लोकसंख्या, घरांची गरज, जमिनींचे आरक्षणे आणि त्या तुलनेत असलेली जमिनीची उपलब्धता याचा विचार करता नवा प्रादेशिक विकास आराखडा (आरपी) करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

‘पवने’तून विसर्ग वाढविला

$
0
0
पिंपरी-चिंचवड आणि परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊन नदी काठच्या वस्त्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘झेडपी’च्या शिबिरांत लाखो रुपयांचा घोटाळा

$
0
0
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने लाखो रुपये खर्च करून आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे.

कम्प्युटर प्रणाली रोखणार धान्याचा काळाबाजार

$
0
0
रेशन दुकानदारांना वितरणासाठी दिल्या जाणाऱ्या धान्याचे कम्प्युटरद्वारे स्वयंचलित वाटप (ऑटो अॅलोकेशन) करण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे विशिष्ट दुकानदारांवर मेहेरनजर दाखविण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images