Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मनीष आनंद यांना अटक व जामीन

0
0
राहत्या घराच्या वादावरून घरमालकिणीला धमकाविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष आनंद आणि त्याचा भाऊ संदीप उर्फ सनी आनंद यांची खडकी कोर्टाने जामिनावर सुटका केली.

महिला सक्षम होणार...पण गैरवापराची भीतीही

0
0
विवाह कायदा दुरुस्ती विधेयकात घटस्फोटित महिलेला पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीत पुरेसा वाटा देण्याच्या शिफारशीला केंद्रीय मंत्रीमंडळाने दिलेल्या मंजुरीबाबत पुण्यातील वकिलांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

साईबाबांच्या चरणी पुणेकराकडून फुलांची सजावट

0
0
एखाद्या व्यक्तीची भक्ती कशी असते त्यासाठी तो काय करू शकतो याची प्रचिती शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांसह भक्तांनाही सोमवारी आली!

कॅम्पमध्ये हॉकर्सचे धाबे दणाणले

0
0
पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाने कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटवरील हॉकर्सना हलवण्याचे ठरवल्याने येथील अनधिकृत हॉकर्समध्ये अस्वस्थता पसरली असून, अधिकृत हॉकर्सने थकित परवाना शुल्क भरण्यासाठी सोमवारी बोर्डाच्या कार्यालयात हजेरी लावली.

दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड

0
0
गुलटेकडी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी गुरुवारी रात्री गजाआड केले. त्यातील एक आरोपी पसार झाला आहे. या टोळीने नेहरू रोडवरील प्रकाश मोबाईल स्टोअर्सचे मालक दुकान बंद करत असताना त्यांच्याकडील रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला होता.

निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू

0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची लांबणीवर पडलेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, महिला तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रभाग निश्चित करण्याबाबतचे पत्र संरक्षण खात्याने बोर्डाला पाठवले आहे.

डॉ. रॉय यांचे अनधिकृत बांधकाम हटविले

0
0
यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी (२२ जुलै) पाडले. डॉ. रॉय यांचे धर्मराजनगर, चिखली येथे एक हजार ३८४ चौरस फूटाचे पत्राशेड होते.

‘एलबीटी’ वसुलीत पुणे पालिकेची बाजी

0
0
जकात बंद करून सुरू करण्यात आलेल्या स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) उत्पन्न काही प्रमाणात कमी असले, तरी एलबीटी सुरू करण्यात आलेल्या महापालिकांच्या तुलनेत पुणे शहराने बाजी मारली आहे.

फर्ग्युसनमध्ये घुमला ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा

0
0
ब्रिटिश गव्हर्नर सर अर्नेस हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या वासुदेव बळवंत गोगटे यांच्या पराक्रमाची आठवण.. उपस्थित विद्यार्थ्यांचा भारावलेला समुदाय... ‘इन्कलाब जिंदाबाद’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी दुमदुमलेले फर्ग्युसन कॉलेजचे ग्रंथालय...

शहिदांच्या कुटुंबीयांना मदत ही आपलीच जबाबदारी

0
0
‘उत्तराखंडमधील महाप्रलयातील मदतकार्यात सहभागी झालेल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची जबाबदारी प्रत्येकाने उचलली पाहिजे,’ असे राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी सोमवारी म्हटले.

‘गोल्डन अवर’मध्ये उपचाराचे धडे देणारा यंत्रमानव

0
0
हार्ट अॅटॅक, अर्धांगवायू, अपघातासारख्या घटनेत ‘गोल्डन अवर्स’मध्ये उपचार कसे द्यावे याचे धडे ‘सीम मॅन थ्री जी मॅनीकीन्स’ अर्थात यंत्रमानवाद्वारे देणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची राज्यातील पहिली अत्याधुनिक लॅब भारती हॉस्पिटलमध्ये विकसित करण्यात आली आहे.

अक्षयकुमारने केले चाहत्यांना खुश

0
0
‘नमस्कार, कसे आहात तुम्ही’...समोर जमलेल्या शेकडो पुणेकर युवक-युवतींना अक्षयकुमारने हा प्रश्न विचारला अन् ‘छान’ असा प्रतिसाद जोरदार घुमला. ‘मी पंजाबी असूनही मला मराठी येते, याचा मला अभिमान आहे,’ असे म्हणत पुढची १०-१५ मिनिटे त्याने मराठीतून संवाद साधत पुणेकरांना जिंकले.

रक्त संकलन समन्वयासाठी हवी यंत्रणा

0
0
एप्रिल ते जून महिन्यादरम्यान होणारा रक्ताचा तुटवडा, अन्य महिन्यांत असलेला अतिरिक्त साठा, शिबिरांचे नियोजन तसेच रक्ताचा पुरेसा साठा कोणत्या रक्तपेढीत आहे याबाबत रक्तपेढ्यांमध्ये समन्वय साधणारी स्वतंत्र यंत्रणा पुण्यात कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ससून हॉस्पिटलमध्ये लवकरच कॅन्सर सेंटर

0
0
ससून हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी सुविधा सुरू करण्याबरोबरच लवकरच कॅन्सर रिसर्च सेंटर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी दिले.

तीन वर्षांसाठी आर्किटेक्ट निलंबित

0
0
दत्तवाडी येथे भिंत कोसळून तीन महिला ठार झाल्याप्रकरणी संबंधित इमारतीच्या आर्किटेक्टचा परवाना पालिकेने तीन वर्षांसाठी निलंबित केला आहे. तसेच, या प्रकरणी स्ट्रक्चरल इंजिनीअरचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

मनसेच्या आठ नगरसेवकांना अटक व सुटका

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(मनसे) वतीने सोमवारी सिमला ऑफिस चौकात आंदोलन करण्यात आले.

त्रुटी आढळल्यास हॉस्पिटलची परवानगी रोखणार

0
0
शहरातील सर्व हॉस्पिटलमधील सक्षम अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्यात येणार असून, त्यात त्रुटी आढळल्यास अशा हॉस्पिटलची परवानगी रोखण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

सात बचत गटांना ‘एफडीए’च्या नोटिसा

0
0
शहरातील शाळांना माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत आहार पुरविणाऱ्या सात परवानाधारक बचत गटांना ‘स्वयंपाकघरात स्वच्छता ठेवा, तसेच अन्य कामांत सुधारणा करा,’ अशा आशयाच्या नोटिसा ‘एफडीए’कडून देण्यात आल्या आहेत.

थकबाकीदारांविरुद्धची मोहीम तीव्र

0
0
थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणकडून तीव्र करण्यात आली आहे.

मारहाणप्रकरणी तिघांना शिक्षा

0
0
किरकोळ वादातून एकाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड सुनावण्यात आला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. पी. बावसकर यांनी हा निकाल दिला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images