Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्वारगेट उड्डाणपुलाला मुहूर्त

$
0
0
अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या स्वारगेट उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शनिवारी (२० जुलै)उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रस्ते विकास महामंडळाचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार आहे.

जुलैच्या एलबीटीला राहिले दोन दिवस

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस उरले असून या मुदतीनंतर व्यापाऱ्यांकडून दोन टक्के दंड वसूल केला जाणार आहे. गुरूवारपर्यंत जुलै महिन्याचा २६ कोटी २० लाख रूपयांचा एलबीटी व्यापाऱ्यांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.

सहायक आयुक्तांना अटक; चार दिवसांची पोलिस कोठडी

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा अनिल भोसले यांच्या मिळकती करांबाबत कम्प्युटरमधील नोंदीत फेरफार केल्याने महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना गुरुवारी चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.

सहाव्या मजल्यावरून पडून बालिकेचा मृत्यू

$
0
0
इमारतीच्या सहाव्या मजल्याच्या गॅलरीमधून पडल्यामुळे दीड वर्षाच्या मुलीचा गुरुवारी मृत्यू झाला. पिंपळे सौदागर येथील ऑर्चिड सोसायटीमध्ये दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. रुची जैस्वाल असे या मुलीचे नाव आहे.

चंद्रभागेच्या काठी वारकऱ्यांचा महापूर

$
0
0
समस्त वारकरी संप्रदायाचे आराध्यदैवत असलेल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या संतांच्या पालख्या गुरुवारी पंढरपुरात दाखल झाल्या. विठ्ठलचरणी वारी रुजू करण्यासाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांना सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

$
0
0
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ४४ साव्या स्मृतिदिनानिमित्त शहर आणि परिसरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे ‘या देशातील नक्षलवाद कसा थांबवता येईल’ या विषयावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.

लॅपटॉप चोरणाऱ्या दोघांना अटक

$
0
0
लॅपटॉप चोरणाऱ्या दोघा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने डेक्कन पीएमपी बसस्टॉपजवळून अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे सात लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. विशाल काकडे (२५, रा. जनवाडी) आणि अजिंक्य रुईकर (३१, रा. कसबा पेठ) अशी आरोपींची नावे आहेत.

आंदोलनाचा रिक्षा पंचायतीचा इशारा

$
0
0
रिक्षा प्रवासदरात वाढ आणि सीएनजीचा पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीवरुन रिक्षा पंचायतीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या दोन्ही मागण्यांचा विचार न झाल्यास नऊ ऑगस्टपासून शहरभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायतीने दिला आहे. उद्या (शनिवारी) रिक्षाचालकांची बैठक होणार आहे.

‘CCTV’साठी ३३८ कोटींचा प्रस्ताव

$
0
0
शहराची सुरक्षाव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारने पाच वर्षांचा ‘रोडमॅप’ तयार केला असून, त्याअंतर्गतच सीसीटीव्ही बसविण्याच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी दिले.

पोस्टात पाकिटांचा तुटवडा

$
0
0
सुमारे तीस हजार पुणेकरांची ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक गेला महिनाभर पोस्टात अडकली आहेत. त्यामागचे कारण आहे, चक्क पाकिटांची टंचाई! त्यामुळे घरपोच लायसन्स योजनेसाठी आगाऊ पैसे भरूनही वाहनचालकांना ‘आरटीओ’त हेलपाटे घालावे लागत आहेत.

मुठावर झोपड्यांचा ‘कालवा’

$
0
0
खडकवासला धरणाच्या नवीन व मुठा जुन्या उजव्या कालव्यालगतच्या जलसंपदा खात्याच्या जागेवर पर्वती जनता वसाहतीपासून सोलापूर रस्त्यावरील स्टड फार्मपर्यंत सुमारे साडेतीन हजार झोपड्यांचा विळखा पडला आहे.

बॉयफ्रेंडने केला रेप, त्याच्या पत्नीने बनवला MMS

$
0
0
पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक्स बॉयफ्रेंडने त्याच्या पत्नीसमोर आपल्यावर बलात्कार केला आणि पिस्तूलचा धाक दाखवून त्याच्या पत्नीने एमएमएस बनवला असा आरोप एका महिलेने केला आहे. ही महिला शिक्षिका असून तिचा घटस्फोट झाला आहे.

उपद्रवी पर्यटकांवर पोलिसांची ‘कृपावृष्टी’

$
0
0
दारूच्या नशेत बेबंदशाही करीत मस्तवालपणे पर्यटकांना त्रास देणाऱ्या ‘तळीरामां’वर कारवाई करण्याऐवजी चिरिमिरी घेऊन त्यांचीच तळी उचलण्याचे प्रकार पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहेत.

दस्त नोंदणीची घरभेट होणार कॅमे-यात बंद

$
0
0
मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे मृत्यूपत्र वा असाध्य रोगाने जर्जर झालेल्या व्यक्तीच्या नावाचा दस्त नोंदविण्यास घरभेट देण्याचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.

अवघे गरजे प्रति पंढरपूर

$
0
0
टाळ, मृदुंग आणि भजन-कीर्तनाच्या भक्तिमय वातावरणात विठुरायाला आळवत पुणेकरांनी आषाढी एकादशी साजरी केली.

पौडजवळ वकिलाचा खून

$
0
0
पाषाण येथील वकील हरिश्चंद्र शंकर निम्हण (वय ६०, रा. पाषाण) यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन खून करण्यात आला. पौड-कोळवण रस्त्यावरील दाखणे गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री हा प्रकार घडला.

विद्यार्थिनींचा विनयभंग

$
0
0
कर्वेनगर येथील एका शिक्षण संस्थेतील क्रीडा शिक्षकाने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेत. सायबू हिरू राठोड (वय ३९, रा. नवी सांगवी) या शिक्षकाला अटक केली आहे.

उड्डाणपुलाचा ‘गनिमीकावा?’

$
0
0
स्वारगेट येथील उड्डाणपुलाच्या श्रेयावरून पेटलेला वाद शमण्याचे चिन्ह नसून भारतीय जनता पक्षाचे आमदार आज, शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुदळ मारण्यापूर्वीच या उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

बरखास्तीला तूर्त स्थगिती

$
0
0
महापालिकांमधील शिक्षण मंडळे बरखास्त करण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या वटहुकूमाला मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी तात्पुरती स्थागिती दिली.

‘आधार’असेल तरच गॅस अनुदान

$
0
0
‘तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले गेले नसल्यास एक ऑक्टोबरपासून थेट बँकेत जमा होणाऱ्या गॅस सिलिंडरच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते,’ असा इशारा ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या महाराष्ट्र विभागाने शुक्रवारी दिला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images