Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अखेरच्या रिंगणाला पावसाची साथ

$
0
0
भक्तिरसात बेभान झालेल्या वारकरी, टाळ-ढोलकीच्या नादात आणि अभंगाच्या जोडीने तुकोबांचा वाखरीत उभा रिंगण सोहळा रंगला.. बुधवारी पिराच्या कुरोलीतून तुकोबांच्या पालखीने दुपारी प्रस्थान केले.

पंढरपुरात ९ लाख वारकऱ्यांची गर्दी

$
0
0
राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी यंदा पंढपूरमध्ये तब्बल नऊ लाख वारकरी येतील असा अंदाज आहे. ऑनलाइन दर्शन बुकिंगपासून पिण्याचे पाणी, वाहनतळ, स्वच्छतेसाठी जादा कर्मचारी अशा सुविधा पंढरपूरमध्ये करण्यात आल्या आहेत.

आता वेध विठ्ठलभेटीचे

$
0
0
माउलींच्या साथीने अठरा दिवसांपासून वाटचाल करीत असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांसह बहुतांश संतांच्या पालख्या बुधवारी वाखरीत दाखल झाल्या.

‘प्रोफेशनल टॅक्स’वरील अधिभार वाढवा

$
0
0
दिवाळखोरीत निघालेल्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने महसूल मिळविण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.

‘एचआयव्ही’ला जाणून घेण्यात महिला मागे

$
0
0
‘एचआयव्ही-एड्स’ सारख्या गंभीर आजारापासून दूर राहण्यासाठी खबरदारी हाच सर्वाधिक प्रतिबंधात्मक उपाय असल्याने त्याबाबत योग्य माहिती घेण्यात अथवा हा आजार जाणून घेण्यात शहरातील महिला मागे असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.

खासगी दवाखान्यांतील ‘टीबी’ पेशंटची नोंदणी गरजेची

$
0
0
क्षयरोगाचे (टीबी) ५० टक्के पेशंट खासगी हॉस्पिटल, दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्यांची नोंदणी करणे आता बंधनकारक केले आहे. मात्र नोंदणीला खासगी डॉक्टरांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने आरोग्य विभागाने डॉक्टरांना नोंदणीबाबत पुन्हा ‘स्मरणपत्र’ दिले आहे.

ताशा कडाडला, दिशा दणाणल्या

$
0
0
शंख वाजला.. टिपरू धरलेले हात उंचावले… ताशा कडाडला आणि एकाच ठेक्यात वाजणाऱ्या ढोलांनी चारी दिशा दणाणल्या… त्यासोबत झाला मोबाइलमधील कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट !

रिकाम्या जकात नाक्यांवर ‘ट्रान्स्पोर्ट हब’

$
0
0
जकात वसुली बंद झाल्याने पालिकेच्या रिकाम्या पडलेल्या जकात नाक्यांच्या जागेवर पीएमपीएमएल, एस.टी यांच्यासह खासगी बस, रिक्षा आणि टॅक्सीसाठी ‘ट्रान्स्पोर्ट हब’ सुरू करण्यासाठी पालिकेत संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली.

उपायुक्त शेलार यांची विभागीय चौकशी

$
0
0
महापालिकेचे वादग्रस्त उपायुक्त रमेश शेलार यांची तीन सदस्य समितीकडून महिनाभर चौकशी केल्यानंतर शेलार यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

संभाजी पूल दुचाकीस्वारांसाठी खुला होणार

$
0
0
पावसाळ्यानंतर संभाजी पुलाच्या (लकडी पूल) वापरास दुचाकीस्वारांना परवानगी देण्यात येणार आहे. मध्य शहरातून डेक्कनवर जाण्या-येण्यासाठी दुचाकीस्वारांची होणारी कसरत लक्षात घेता संभाजी पूल खुला करण्याचा विचार वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे.

आयुक्तांना मीडियाची ‘अॅलर्जी’

$
0
0
सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदारांनी बोलाविलेल्या बैठकीत पालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येऊ शकतो, असे लक्षात येत‌ाच तत्परता दाखवित मीडियाच्या प्रतिनिधींना आयुक्त महेश पाठक यांनी बैठकीस उपस्थित राहण्यास मज्जाव केला.

डेंगी फणफणला; मलेरिया घटला

$
0
0
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या सहा महिन्यांत डेंगीच्या पेशंटबरोबर मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर त्या उलट मलेरियाच्या पेशंटच्या संख्येत निम्म्याने घट झाली आहे.

तमिळींच्या सुरक्षेसाठी खबरदारी

$
0
0
तमिळी आणि सिंहली नागरिकांच्या वादाची धग पुण्यात पोहोचली असून, पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात शालेय पोषणाची ‘परीक्षा’

$
0
0
शालेय पोषण आहारामधून बिहारमध्ये झालेल्या जीवघेण्या विषबाधेनंतर राज्यातील शालेय पोषण आहार योजनेची ‘परीक्षा’ घेतली जात आहे.

गार्डनी अडवली मंत्र्यांची गाडी

$
0
0
पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांना आयुक्तालयात भेटण्यासाठी आलेल्या केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांना पोलिसांकडून चांगलीच ‘मानवंदना’ मिळाली.

केंद्र सरकारच्या पेन्शनरांना दिल्ली हायकोर्टाचा दिलासा

$
0
0
सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतरच्या किमान पेन्शन आणि फॅमिली पेन्शन याबाबतच्या सूत्रामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात केंद्र सरकारच्या सर्व पेन्शनर संघटनांनी दिल्ली हायकोर्टात केलेल्या याचिकेचा निकाल संघटनांच्या बाजूने लागला आहे.

घोळ थांबेना, प्रवेश मिळेना

$
0
0
केंद्रीय प्रवेश समितीकडून पालकांच्या तक्रारी दूर झाल्याचे वारंवार स्पष्ट केले जात असतानाही गुरुवारी दिवसभर शेकडो पालकांनी आपल्या तक्रारींसह आबासाहेब गरवारे कॉलेजकडे धाव घेतली. मूळ तक्रारींवर उत्तरे न मिळालेल्या पालकांसह नव्याने तक्रारी दाखल करणाऱ्या पालकांचाही यात समावेश होता.

‘मेडिकल सीईटीबाबतचे धोरण लवकर जाहीर करा’

$
0
0
पुढील वर्षी मेडिकल प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना तयारीसाठी आता केवळ सहा ते सात महिने असल्याने प्रवेश परीक्षेबाबतची सविस्तर सूचना राज्याने लवकर जाहीर करावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी केली आहे.

‘आयबीपीएस’चे निकष त्रासदायक

$
0
0
देशभरातील विविध बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी ‘आयबीपीएस’तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीचे बदललेले निकष अन्यायकारक असल्याची तक्रार पुण्यातील उमेदवारांकडून करण्यात आली आहे. हे निकष बदलून पूर्ववत करण्याची मागणीही या उमेदवारांकडून करण्यात आली आहे.

वीजग्राहकांना ५७ कोटींचा परतावा

$
0
0
महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे विभागातील सुमारे २० लाख ग्राहकांना ५७ कोटी ३० लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यातील वीज बिलामध्ये ही रक्कम समायोजित करण्यात आली असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images