Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

परदेशीवारीला घरचा आहेर

$
0
0
स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबासह केलेल्या परदेशवारीवर शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी मंगळवारी टीका केली. पदाधिकारी पालिकेचे प्रतिनिधी म्हणून या दौऱ्यात सहभागी होते.

युवकाला मारहाण करून पावणेसहा लाख लुटले

$
0
0
बँकेत पैसे भरायला निघालेल्या युवकाच्या डोक्यात रॉड घालून पावणेसहा लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना नीलायम टॉकीजजवळील पुलावर मंगळवारी दुपारी घडली. विशाल वाईकर (३२, रा. कोल्हेवाडी) असे जखमी युवकाचे नाव आहे.

पुण्यात अमली पदार्थांची विक्री वाढली

$
0
0
वेगाने वाढणाऱ्या पुणे शहरात अमली पदार्थांची रेलचेल वाढत असल्याचे चित्र आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या वर्षी ६९ लाखांचा तर यावर्षी सहा महिन्यांत एक कोटी ४८ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. त्याव्यतिरिक्त केंद्रीय अबकारी विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे.

अखेर डॉ. परदेशी निलंबित

$
0
0
महापालिके‌चे वादग्रस्त प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांना मंगळवारी पालिका आयुक्त महेश पाठक यांनी निलंबित केले. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे प्रभारी आरोग्यप्रमुखाचा पदभार देण्यात आला आहे.

'भ्रष्ट' उपायुक्तांवर कारवाई होणार

$
0
0
भ्रष्टाचाराचे आरोप असलेलेल पालिका उपायुक्त रमेश शेलार यांना पालिका सेवेतून निलंबित करावे, अशी जोरदार मागणी करत भाजप-सेना युतीने सर्वसाधारण सभा दणाणून सोडली. सत्ताधाऱ्यांनीही चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्याचा सूर लावल्याने याबाबत गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन आयुक्तांना द्यावे लागले.

पावसाचा जोर कायम राहणार

$
0
0
पावसाने दिवसभर दमदार हजेरी लावल्याने मंगळवार पुणेकरांसाठी पावसाचा दिवस ठरला. दिवसभरात कधी रिमझिम, तर कधी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. शहरात मंगळवारी १४.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

धरणांत सव्वापाच टीएमसी पाणी

$
0
0
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोटक्षेत्रातही पुन्हा हजेरी लावली आहे. या चारही धरणांमध्ये मिळून सुमारे सव्वापाच टीएमसी इतका उपयुक्त साठा जमा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने मंगळवारी देण्यात आली.

'कोरिया व-हाडा'ला मनसे झटका

$
0
0
पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी नातेवाइकांसोबत केलेल्या कोरिया दौऱ्याच्या 'वऱ्हाडा'चा जाब विचारण्यासाठी मंगळवारी मनसेने महापौर वैशाली बनकर यांना बंदिस्त केले; तसेच सर्वसाधारण सभेतही पुणेकरांची माफी मागा, अशी मागणी करत मनसेच्या सदस्यांनी काही काळ कामकाज रोखून धरले.

तळजाईचं ग्रहण कधी सुटणार..?

$
0
0
शहराचं हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वती आणि तळजाई परिसराला समस्यांचं ग्रहण लागलं आहे. यासाठी महापालिका आणि वनविभागानं केलेल्या उपाययोजना अद्याप कागदावरच आहेत.

आळंदीत हवे स्वच्छतेचे पसायदान

$
0
0
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या अलंकापुरीत सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. इंद्रायणी नदीच्या घाटावर जलपर्णी इस्ततः पसरली असून, स्वच्छतेच्या कामात कमालीची गती मिळावी, अशी मागणी होत आहे.

रिक्षा चालकांचा औरंगाबादमध्ये राज्यव्यापी मेळावा

$
0
0
रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे औरंगाबाद येथे येत्या शुक्रवारी (२८ जून) सायंकाळी सहा वाजता रिक्षा चालकांचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.

पुण्यातल्या तरूणांचं लाईफ ऑफ रॉडी

$
0
0
सह्याद्रीच्या कुशीत उनाडत केलेलं मनसोक्त ट्रेकिंग, दुर्गम कडे आणि कपाऱ्यांच्या साक्षीनं केलेले धाडसी उपक्रम, रिव्हर क्रॉसिंग, बाईकींग असं सह्याद्रीतलं भन्नाट साहस छायाचित्रांतून उलगडणार आहे. रॉ अॅडव्हेंचर सोल्यूशन्सतर्फे 'रॉ जर्नीज - लाइफ ऑफ अ रॉडी' या भन्नाट छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आहे.

घरगडी होण्यावर वनकामगारांची 'कु-हाड'

$
0
0
वनक्षेत्रावर कु-हाड चालवण्याचे उद्योग तेजीत असताना वनकामगारांना आपल्या घरचे गडी बनवून राबविणा-या वनाधिकाऱ्यांच्या सक्तीविरोधात कामगारांनी लढा उभारला आहे.

फी निश्चिती प्रस्ताव अपेक्षेपेक्षा कमीच

$
0
0
मेडिकल आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या फी निश्चितीसाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी २९ जून ही अंतिम मुदत असताना प्रत्यक्षात खूपच कमी कॉलेजांनी प्रस्ताव सादर केले आहेत. आतापर्यंत मेडिकलच्या केवळ ९, तर तंत्रशिक्षणाच्या ६४ अभ्यासक्रमांची फी अंतिम झाली आहे.

लोणावळा नगराध्यक्षांनी अखेर दिला राजीनामा

$
0
0
लोणावळयाच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनराध्यक्ष राजू बच्चे यांनी अखेर आपला अट्टहास आणि मौनव्रत सोडून राजीनामा दिला आहे. सुरेखा जाधव यांनी बुधवारी (२६ जून) जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

एकविरा गडाची संरक्षक भिंत कोसळली

$
0
0
मावळात व लोणावळ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्या जवळील वेहरगाव, कार्ला येथील एकविरा गडाची सुमारे सुमारे ९० फुट लांबीची संरक्षक भिंत आणि त्या बाजूचा भराव कोसळला आहे. यामुळे गड व पायथ्याला धोका निर्माण झाला आहे.

आसबे यांना राजर्षी शाहू पुरस्कार

$
0
0
राजर्षी शाहू समता विकास संस्थेतर्फे देण्यात येणारा 'राजर्षी शाहू पुरस्कार' ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. बाबुराव गुरव आणि ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांना जाहीर झाला आहे.

सर्जनशील ‘व्हेस्पा’कार!

$
0
0
अभिनव कला महाविद्यालयातील एका ‘बिडी’च्या कॅम्पेनपासून सौरभ चांदेकरचा जाहिरात आणि चित्रकला क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.

लोकप्रशिक्षणाची चळवळ व्यापक करावी

$
0
0
गणेशोत्सवात देखाव्यांच्या माध्यमातून लोकप्रशिक्षणाचा जागर होत असतो. ही चळवळ मंडळांनी व्यापक करून शहराचा सांस्कृतिक वारसा जतन करावा, असे आवाहन महापौर मोहिनी लांडे यांनी मंगळवारी (२६ जून) केले.

पासच्या सवलतीपासून ग्रामीण विद्यार्थी वंचित

$
0
0
महापालिकेच्या हद्दीचा वाद उपस्थित करून यंदाही शालेय विद्यार्थ्यांना 'पीएमपीएमएल'च्या बस पासमधील सवलत नाकारण्यात आली आहे. त्यामुळे शालेय शिक्षणाच्या खर्चाबरोबरच बस पासच्या खर्चाचा बोजा विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images