Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अनैतिक संबंधांवरून तरुणाचा खून

$
0
0
महिलेशी असलेले प्रेमसंबंध तोडावेत म्हणून एका २५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. राकेश ज्ञानेश्वर हरगुडे (वय - २५, रा. खेसे कॉलनी, गुरुद्वारा लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पाणीपुरवठ्याच्या वेळात बदल

$
0
0
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एक जुलैला पुण्यात दाखल होणार असून, वारकऱ्यांच्या सोयीसाठी कळस, विश्रांतवाडी, फुलेनगर, आळंदी रोडवरील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सॉफ्टवेअर

$
0
0
शालेय मुलांच्या हातात 'टॅब्लेट पीसी' आल्याने अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ प्रभावी करण्याच्या उद्देशाने 'महाराष्ट्र ज्ञान महामंडळा'तर्फे (एमकेसीएल) सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सोमवारी दिली.

'त्या' बांधकामांसाठी श्वेतपत्रिका

$
0
0
पुण्यालगतच्या टेकड्यांवर अनिर्बंध बांधकामे, टेकडीफोड, डोंगर सपाटीकरण सुरू असल्याने अशा बांधकामांबाबतची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी 'भारतीय जनता पक्षा'तर्फे सोमवारी करण्यात आली.

'ते' सात इंजिनीअर दोषी

$
0
0
मगरपट्टा येथील २२० केव्ही वीज उपकेंद्राच्या उभारणीसाठी काळी माती काढून मुरूम टाकण्याच्या महापारेषण कंपनीच्या कामात झालेल्या एक कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी दोन मुख्य इंजिनीअरसह सात इंजिनीअरना दोषी धरण्यात आले आहे.

पालखी मार्गावर वारक-यांना आरोग्य सुविधा

$
0
0
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पुण्यनगरीतील मुक्कामादरम्यान येत्या एक ते दोन जुलैदरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागाचे फिरते वैद्यकीय पथक कार्यरत राहणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना आरोग्य सुविधा मिळणे शक्य होणार आहे.

सफाई कर्मचा-यांच्या तक्रार निवारणासाठी समिती

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरात कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी चारही प्रभागांमध्ये सफाई कर्मचारी तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली आहे.

अफू व गांजाची शेती रोखण्यासाठी कायद्यात शिक्षेची तरतूद करा

$
0
0
सरकारने अफू व गांजाची बेकायदेशीर शेती करणाऱ्यांना जरब बसेल अशा शिक्षेची कायद्यामध्ये तरतूद करण्याची मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

चौकशीसाठीही चौकशी समिती!

$
0
0
कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या निलंबनावरील कारवाईबाबतचा निर्णय वेळेत व्हावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामात गती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'सोशल मीडियाचा धोका मीडियापेक्षा जास्त'

$
0
0
प्रिंन्ट किंवा इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधींपेक्षा सोशल मीडियामुळे पसरणाऱ्या अफवा किंवा घटना हाताळणे अवघड होत आहे. त्यामुळे पोलिस आणि पत्रकारांनी एकमेकांशी सुसंवाद वाढवणे गरजेचे आहे, असे मत पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

डॉक्टर आयुक्तांचे 'मिशन आरोग्य'

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहर आरोग्य सेवेच्या दृष्टीने मिशन हाती घेतले असून, भोसरी आणि थेरगाव येथे नवीन हॉस्पिटल उभारण्याच्या कामाला गती देणार असल्याचे मंगळवारी (२५ जून) स्पष्ट केले.

'एलबीटी'तून जकातीच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक उत्पन्न

$
0
0
जकात बंद झाल्यानंतरच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात पालिकेला 'एलबीटी'तून सुमारे एकशे ऐेंशी कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या जकातीच्या उत्पन्नाच्या तुलनेत ही रक्कम ७५ टक्क्यांहून अधिक असून, जकातीएवढेच उत्पन्न यातून मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

तीन अतिरिक्त प्रांत अधिकारी पुणे जिल्ह्याला उपलब्ध

$
0
0
प्रत्येक दोन तालुक्यांना एक प्रांत अधिकारी नियुक्त करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यास तीन अतिरिक्त प्रांत अधिकारी उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये येत्या एक ऑगस्टपासून हवेली आणि खेड तालुक्यास स्वतंत्र प्रांत अधिकारी मिळणार आहे.

ब्युटी पार्लरवर छापा; ३ मुलींची सुटका

$
0
0
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने फातिमानगर रोडवरील मर्मेड हर्बल ब्युटीपार्लरवर छापा घालत दोन बांगलादेशी आणि एका दिल्लीतील मुलीची सुटका केली. या पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याने गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.

लोककलावंतांसाठी लवकरच 'कलाकार कल्याण संस्था'

$
0
0
महाराष्ट्रातील लोककलावंत आणि बॅकस्टेज कलाकारांसाठी 'कलाकार कल्याण संस्था' स्थापन करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला लवकरच सादर करण्यात येणार आहे.

'मेट्रो'तील 'एफएसआय' खिरापतीला 'रेड सिग्नल'

$
0
0
पुण्याचे कारभारी अजित पवार आणि त्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चालना दिलेल्या मेट्रो प्रकल्पातील 'एफएसआय'च्या खिरापतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण यांनीच 'रेड सिग्नल' दाखवला आहे.

अखेर पालिकेला उपनगरसचिव मिळाले

$
0
0
पालिकेच्या कारभारात महत्वाची भूमिका बजाविणारे आणि गेली चार वर्षे रिक्त असलेले उपनगरसचिव पद भरण्यास अखेर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नगरसचिव कार्यालयातील कार्यालय अधीक्षक राजेंद्र शेवाळे यांना पदोन्नती देत त्यांच्याकडे उपनगरसचिव पदाचा कार्यभार देण्यात आला.

औषध विक्रेत्यांचा संप मागे

$
0
0
राज्यातील औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध खात्याचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पाच दिवसांत समिती स्थापन करण्याचे आदेश देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केमिस्टांच्या दुखण्यावर मंगळवारी 'उपाय' केला.

पालिकेत तैलचित्रावरून राजकारण

$
0
0
छत्रपती संभाजी महाराजांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याच पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाऐवजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव मंगळवारी पुढे केले. या विषयावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजकारण उफाळून आले.

यात्रेकरूंच्या संपर्कासाठी अडचणींशी सामना

$
0
0
ट्रॅव्हल कंपन्यांच्या बेफिकीरीमुळे उत्तराखंडमध्ये संपर्क तुटलेल्या यात्रेकरूंचे नाव-पत्ते व तपशील मिळविण्यात जिल्हा प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images