Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गढीत होणार शिवकालीन वस्तू संग्रहालय

$
0
0
चिखली गावातील शिवकालीन गढीमध्ये कलादालन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार आहे. यासाठी गेल्या चार महिन्यांपासून गढीचा जीर्णोद्धार करून त्यावर दोन मजले चढविणार असल्याची माहिती गढीचे मालक अॅड. अमरसिंह जाधवराव आणि विश्वस्त अमोल थोरात यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली.

पालखी मार्गावर औषध फवारणी

$
0
0
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद‍्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या पुण्यनगरीतील आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धूरफवारणी तसेच नालेसफाई करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

ज्येष्ठ महिलांचा अधिकारासाठी 'एल्गार'

$
0
0
पती, मुले-मुली आणि नातवंडांसाठी झिजल्यानंतर आयुष्याच्या सायंकाळी हक्क-अधिकारांपासून वंचित ठेवले जाऊ नये, यासाठी ज्येष्ठ महिला 'एल्गार' करणार आहेत.

ज्ञानेश्वरी, भगवद्गीता हेच शाश्वत ज्ञान

$
0
0
‘सायन्स आणि अध्यात्म यांच्या समन्वयातूनच आपण अंतिम सत्यापर्यंत पोचू शकतो. आजच्या काळातही ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता हेच शाश्वत ज्ञान असल्याचे आपण ठामपणे म्हणू शकतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.

डीपीची नियोजन समिती अद्यापही कागदावरच!

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर (डीपी) गेल्या तीन महिन्यांमध्ये १९ हजारांहून अधिक हरकती सूचना आल्या आहेत. डीपीवर हरकती नोंदविण्यासाठी आता केवळ तीन दिवस उरले असले तरी या हरक‌तींवर सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकारने अद्यापही नियोजन समिती स्थापन केलेली नाही.

सहकार निवडणूक प्राधिकरण पुण्यातच

$
0
0
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी असलेले नियोजित राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण अखेर पुण्यात स्थापन होणार आहे.

प्रलयातून परतलेल्या भाविकांवर पोलिसांचा 'प्रकोप'

$
0
0
केदारनाथ येथील प्रलयातून मृत्यूच्या दाढेतून वाट काढत मंचरला पोहोचताना ५० यात्रेकरूंना देशभरातून मदतीचा हात मिळाला. मात्र, मंचरच्या ट्रॅफिक पोलिसांनी त्यांची बस कागदपत्रांच्या तांत्रिकतेसाठी अडवून चांगलाच मनस्ताप दिला.

बद्रिनाथमध्ये राज्यातील ४०० जण अडकले

$
0
0
बद्रिनाथ ते जोशीमठदरम्यानचा रस्ता खचल्याने संपर्क तुटला असून बद्रिनाथमध्ये अडकलेल्या सात हजार पर्यटकांपैकी चारशे जण महाराष्ट्रातील आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी सुखरूप पोहोचविण्यासाठी हेलिकॉप्टरने ने-आण करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

'पाणी आणि दोन दिवसांचा उपवास'

$
0
0
'जोरदार पडत असलेल्या पावसामुळे पाण्याचे लोंढे आमचा अक्षरशः पाठलागच करत होते. सुदैवाने आम्ही त्यातून प्रत्येक वेळी वाचत पुढे येऊ शकलो. या सगळ्या धावपळीत दोन दिवस पूर्ण उपवासही घडला.

'आई-बाबांना तुम्ही पाहिलंत का?'

$
0
0
उत्तराखंडात गेल्या आठवड्यात झालेल्या महाप्रलयानंतर अजूनही अनेकांच्या आई-वडिलांचा किंवा नातेवाइकांचा काहीही पत्ता लागलेला नाही, त्यांच्याशी संपर्क झालेला नाही किंवा त्यांची ख्यालीखुशालीही कळालेली नाही. त्यामुळेच दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या प्रत्येक रेल्वेकडे त्यांच्या नातेवाइकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कार कंटेनरला धडकून दोघांचा मृत्यू

$
0
0
पुणे-मुंबई महामार्गावर निगडी जकात नाक्याजवळ रविवारी पहाटे तीन वाजता झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाले. सूरज सुरेंद्र छाब्रा (२४, रा. अजमेरा कॉलनी) आणि तनुजा सुनील म्हात्रे (२४, रा. वाघोली, ता. अलिबाग, जि. रायगड) अशी या अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत.

आधार कार्ड मिळवताना…

$
0
0
केंद्र तसेच राज्य सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी नोंदणी करण्यापासून आधार कार्ड घरपोच मिळेपर्यंत सर्वसामान्यांना अनेक अग्निदिव्यांतून जावे लागते.

प्रॉपर्टी टॅक्सला १ जुलैपासून २ टक्के दंड

$
0
0
कोणताही दंड न देता प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. ३० जूनपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स भरणाऱ्या नागरिकांकडून कोणताही दंड घेतला जाणार नाही. मात्र, एक जुलैपासून पहिल्या सहामाहीच्या रकमेवर दोन टक्के दंड वसुल करण्यात येणार आहे.

निवडणुकीत ८३ टक्के मतदान

$
0
0
राज्यातील २२ जिल्ह्यांतील ३५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी सरासरी ८३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केला.

विक्रेत्यांकडे औषधांचा ३० टक्के तुटवडा

$
0
0
औषध खरेदी बंद आंदोलनामुळे सदाशिव पेठेच्या औषध बाजारातील होलसेल विक्रेत्यांकडेच डायबेटिसचे इन्सुलिन इंजेक्शन, अँटिबायोटिक्स, हार्टवरील 'इकोस्प्रिन'सारख्या औषधांचा तुटवडा झाल्याने आरोग्य सेवा धोक्यात येऊ लागली आहे.

'आयटी'वारीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर

$
0
0
नोकरी व्यवसायाच्या धबडग्यात अध्यात्माच्या वाटेवर जाण्याचा मार्ग म्हणून तरुणाई वारीकडे पाहू लागली आहे. 'आयटी' कंपन्यांमध्ये काम करताना वारीच्या थोर परंपरेची प्रत्यक्षानुभूती घेण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या आयटी वारीची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होऊ लागली असून, यंदा मॉरिशसमधून काही लोक या आयटी दिंडीमध्ये सहभाग घेणार आहेत.

जादूटोणा विरोधी कायद्यातील आक्षेपार्ह भाग वगळा

$
0
0
प्रस्तावित जादूटोणाविरोधी कायद्यातील आक्षेपार्ह भाग वगळण्याच्या नावाखाली शासनाने त्याची भीषणाता आणि व्याप्ती वाढविली आहे.

त्या अडीचशे स्कूलबस पुन्हा रस्त्यावर...

$
0
0
सुरक्षिततेच्या नियमांना बगल देऊन विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सुमारे अडीचशे स्कूलबसना 'आरटीओ'ने नोटीस देऊनही या बसमधून सर्रास विद्यार्थी वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या स्कूलबसचे परमिट रद्द होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोळी समाजाचा आंदोलनाचा इशारा

$
0
0
अनुसूचित जमात व तत्सम जमातीच्या जात पडताळणीचे राज्य शासनाने काढलेले परिपत्रक त्वरित रद्द करावे, अन्यथा राज्यभर रेलरोको आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत तरे यांनी दिला आहे.

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर टँकर उलटला

$
0
0
पुणे-मुंबई जुन्या राष्ट्रीय महामार्गावर आणि 'एक्स्प्रेस वे'च्या अगदी जवळील अंडा पुलावरील तीव्र उतारावरील वळणावर ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारा टँकर सोमवारी (२४ जून) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास उलटला. त्यामुळे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे सहा तास विस्कळित झाली होती.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>