Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता हवाच

$
0
0
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) वाहतुकीची कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी विकास आराखड्यातील पर्यायी रस्त्यांचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवारी करण्यात आली. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बस स्वच्छताही 'बीओटी'वर

$
0
0
अत्याधुनिक मशिनरीच्या वापराद्वारे पीएमपीच्या ताफ्यातील बसची स्वच्छता राखली जावी यासाठी बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर सर्व डेपोंमध्ये स्वच्छता यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे.

मोबाइल नंबर द्या पत्र वेळेत घ्या

$
0
0
पोस्ट खात्याचा कारभार आणखी वेगाने होण्यासाठी ‘मोबाइल नंबर द्या आणि वेळेत पत्र मिळवा’ अशी खास योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार स्पीडपोस्ट सेवेप्रमाणे कागदपत्रे पाठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीलबंद पाकिटे किंवा अन्य पत्रांवर मोबाइल नंबर दिल्यास नागरिकांना वेळेत पत्र मिळू शकणार आहेत.

क्षण अमृताचा...

$
0
0
संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी नुकताच लता मंगेशकर यांच्यासोबत एक अल्बम केला. २७ जूनला त्याचं मुंबईत प्रकाशन आहे. या अल्बमचं काम सुरू असताना त्यांना दिसलेल्या दीदी, त्यांच्याच शब्दांत...

प्रस्थापितांना धक्का देऊन मत परिवर्तन पॅनेल विजयी

$
0
0
होलसेल बाजारातील व्यापा-यांचे नेतृत्व करणा-या ‘द पूना मर्चंटस्’ चेंबरच्या निवडणुकीत प्रस्थापित पॅनेलला धक्का बसला असून, आठ जागा मिळवित मत परिवर्तन पॅनलने सत्ता खेचून आणली.

‘बायफोकलची’ पहिली गुणवत्ता यादी जाहीर

$
0
0
अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधील बायफोकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर झाली. बायफोकल अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध पाच हजार ९५० जागांसाठीच्या या यादीमध्ये पाच हजार ७३० विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार क्रमांक देण्यात आले आहेत.

पोटनिवडणूक चार प्रमुख पक्षांमध्ये

$
0
0
शहरातील प्रभाग क्र. ४० च्या (पुणे स्टेशन) पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्याने चार प्रमुख पक्षांमध्येच थेट लढत होणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.

‘सुमारभारती’

$
0
0
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून अर्थातच ‘बालभारती’कडून राज्यभरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी तयार होणाऱ्या जवळपास १९ कोटी पुस्तकांसाठीच्या कागदाचा दर्जा तपासण्याची कोणतीही यंत्रणा ‘बालभारती’कडे नसल्याचे आता उघड झाले आहे.

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट !

$
0
0
लक्ष्मी रोडवरील व्यापा-यांचा, येथे खरेदीसाठी येणा-या ग्राहकांचा, या परिसरातील रहिवाशांचा, येथील वाहतुकीचा, पार्किंगचा सर्वंकष अभ्यास करून त्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचे स्वप्न दाखविणारे प्रारूप पाहण्यासाठी नागरिकांनी शनिवारी विश्रामबागवाड्यात गर्दी केली.

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

$
0
0
फुरसुंगी येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

उद्यापासून औषधविक्री आठच तास

$
0
0
राज्यातील फार्मासिस्टवर होत असलेल्या सक्तीच्या निषेधार्थ उद्यापासून (२४ जून) पुण्यासह राज्यातील ५५ हजार औषध विक्रेत्यांची दुकाने दुपारी दोन ते रात्री दहा एवढे आठच तास सुरू राहणार आहेत.

डॉक्टरांकडून वैद्यकीय सुविधा

$
0
0
बद्रिनाथ, केदारनाथसह अन्य ठिकाणी महापुरात अडकलेले पर्यटक सर्दी, ताप, खोकला, बीपी आणि डायबेटिसच्या आजाराने त्रस्त आहेत. हरिद्वार आणि हृषीकेश येथे सुरू केलेल्या विशेष आरोग्य केंद्रांत सुमारे ११०० पर्यटकांवर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी उपचार केले आहेत.

पिंपरीतील २७५ भाविक सुखरूप

$
0
0
उत्तराखंडातील बद्रिनाथ येथे दर्शनासाठी गेलेले पिंपरी-चिंचवड भागातील २७५ पर्यटक सुखरूप असल्याची माहिती हेल्पलाइनवर मिळाली आहे. मात्र, अद्याप नऊ भाविकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

फेडररची ‘मोबाइल’ कोर्टवर जादू!

$
0
0
पॉवरफुल सर्व्हिस आणि चपळाईने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आणि ‘विंबल्डन’वर सात वेळा कब्जा मिळविणारा रॉजर फेडरर सोमवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत आठवे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविण्यास सज्ज झाला असतानाच त्याने ‘मोबाइल’ कोर्टवरही ‘एस’ टाकली आहे.

जिद्दीने केली परिस्थितीवर मात

$
0
0
जेमतेम दीड खोलीचे घर, आजारी वडील आणि धुण्याभांड्यांची कामे करणारी आई; परंतु शिकून मोठे व्हायचे आणि घरची परिस्थिती बदलायची, अशी जिद्द बाळगलेल्या अक्षय अनंत धरपळे याने दहावीच्या परीक्षेत ९०.५५ टक्के मिळवून आव्हानांचा समर्थपणे मुकाबला केला आहे.

शेतकरी होतायेत टेक्नोसॅव्ही

$
0
0
पिकांवर कीड पडली, कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करू? जमिनीचा पोत हलका आहे, कोणते पीक घेऊ?, सोयाबीनची लागवड करताना काय काळजी घ्यावी... या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शेतकरीबांधवांना आता केवळ एसएमएसद्वारे मिळत आहे.

केदारनाथच्या दुर्घटनेतील मृतांसाठी मदतनिधी

$
0
0
उत्तराखंड आणि केदारनाथ येथील दुर्घटनेतील नागरिकांसह नातेवाइकांच्या मदतीसाठी पंतप्रधान सहायता निधीला ५० लाख रुपये देण्यासाठी मदतनिधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

फुलेनगरमधील ३४५ झोपड्या बाधित

$
0
0
महात्मा फुलेनगर झोपडपट्टीतून जाणाऱ्या अंतर्गत रिंगरोडमुळे (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रोड) सुमारे ३४५ झोपड्या बाधित होणार आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेत प्रश्नोत्तराच्या तासाच प्रशासनाने दिली आहे.

अन्यथा कोळी समाजाचा आंदोलनाचा इशारा

$
0
0
अनुसूचित जमात व तत्सम जमातीच्या जात पडताळणीचे राज्य शासनाने काढलेले परिपत्रक त्वरित रद्द करावे, अन्यथा राज्यभर रेलरोको आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत तरे यांनी दिला आहे.

आवक कमी झाल्याने भाज्या कडाडल्या

$
0
0
कोकण परिसरातून मागणी वाढल्याने भाज्यांचे भाव कडाडले आहेत. अगोदर दुष्काळ आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. बाजारपेठेत फ्लॉवर, कोबी, टॉमेटो, शेवगा, कैरी, मटारच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images