Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अजूनही अंगावर शहारे येतात

$
0
0
ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेली आमची बस.. त्यामागे पन्नास फुटांवर कोसळणाऱ्या दरडी.. आणि शेजारून वाहणारा नदीचा रुद्रावतार.. अशा परिस्थितीत रात्र आठवली तरी अंगावर काटा येतो.. जगण्याबद्दल शंका वाटावी, अशी वेळ आमच्यावर आली होती..

२५ हजार हरकतींचा 'डीपी'वर पाऊस

$
0
0
'शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्या'वर (डीपी) सोमवारअखेर तब्बल २५ हजार हरकती-सूचना दाखल झाल्या आहेत. हरकती-सूचना दाखल करण्यासाठी बुधवार (२६ जून) अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उर्वरित दिवसांत हरकतींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कधी घरी परत येतील...

$
0
0
आठ दिवस झाले, त्यांच्यांशी संपर्क झालेला नाही, टीव्हीवर दिसणारी भयानक दृश्य पाहून खूप काळजी वाटते आहे.. कुठे असतील आमचे नातेवाईक, त्यांना मदत मिळाली असेल ना… कधी घरी परत येतील…त्यांच्या काळजीने आमची झोप उडाली आहे…

रस्तारुंदीकरण रद्द केल्याने आरपीआय नाराज

$
0
0
विकास आराखड्यात (डीपी) अनेक रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करणाऱ्या पालिकेने बोपोडी-खडकी रस्तारुंदीकरण उपसूचनेद्वारे रद्द केल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे त्याविरोधात पालिकेकडे हरकत दाखल करण्यात आली आहे.

४६ लाख रुपयांची नुकसान भरपाई

$
0
0
हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स शाळेत काम करत असलेल्या एका शिक्षिकेच्या अपघातप्रकरणी ट्रकमालक आणि इन्शुरन्स कंपनीला ४६ लाख रुपयांची नुकसानभरपाई शिक्षिकेच्या कुटुंबाला देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. मोटार वाहन अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य एन. पी. धोटे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

अनधिकृत बांधकामे पोसणा-यांवर कारवाई

$
0
0
जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे ज्या अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत झाली, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. दरम्यान, शिंदेवाडी येथील दुर्घटना आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावरून आमदारांनी प्रशासनाला धारेवर धरले.

'मैत्री'चा गट उत्तराखंडात रवाना

$
0
0
उत्तराखंडमध्ये झालेल्या पूर प्रलयात अडकलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी 'मैत्री'च्या चार प्रशिक्षित स्वयंसेवकांचा गट उत्तराखंडमध्ये दाखल झाला आहे. त्या भागात काम करणाऱ्या 'अर्पण' या संस्थेच्या आपत्कालीन कामामध्ये मैत्रीचे स्वंयसेवक सहकार्य करणार आहेत.

वृद्धाश्रम? नव्हे; आता 'ज्येष्ठ निवास'

$
0
0
दयनीय, अन्यायग्रस्त किंवा आयुष्याला कंटाळलेल्या मंडळींचे वास्तव्य असलेले ठिकाण म्हणजे 'वृद्धाश्रम' असा गैरसमज समाजामध्ये सध्या पसरला आहे. ही नकारात्मक भावना बदलण्यासाठी यापुढे 'वृद्धाश्रम' नव्हे; तर 'ज्येष्ठ निवास' या संकल्पनेचा वापर करावा, असे ठराव ज्येष्ठ नागरिकांनी एकमताने मंजूर केला.

महापालिकेच्या आरोग्यप्रमुखांची नोंदणी रद्द

$
0
0
पालिकेचे वादग्रस्त आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांची नोंदणी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) रद्द केली आहे. 'एमसीआय'च्या रजिस्टरमधून डॉ. परदेशी यांचे नाव काढून टाकण्यात आल्याने त्यांच्याकडे असलेले आरोग्यप्रमुख पद धोक्यात आले आहे.

लायसन्स रद्द करण्याचा औषध विक्रेत्यांना इशारा

$
0
0
आंदोलन सुरू ठेवून पेशंटांना वेठीस धरणाऱ्या औेषध विक्रेत्यांविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने आक्रमक भूमिका घेतली असून, अशा औषध विक्रेत्यांचे लायसन्स रद्द करण्याचा इशारा दिला आहे; तसेच हॉस्पिटलशी संलग्न मेडिकल्समध्ये २४ तास औषधे उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वाहतूक पोलिसांच्या मदतीला अत्याधुनिक उपकरणे

$
0
0
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात लवकरच स्पीडगन, ब्रेथ अॅनालायझर आणि व्हिडिओ कॅमेरा आदी अत्याधुनिक उपकरणांचा समावेश होणार आहे. या उपकरणांच्या खरेदीसाठी 'जिल्हा नियोजन समिती'ने सोमवारी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

इंजिनीअर खून प्रकरणी सराईत गुन्हेगार अटकेत

$
0
0
आयटी कंपनीतील इंजिनीअरचा खून करून त्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सोमवारी अटक केली. अनैतिक संबधातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

लाच प्रकरणी जवानाला अटक

$
0
0
लष्करात जवान म्हणून निवड झालेल्या तरुणाला नियुक्तीपत्र देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी 'सीबीआय'ने एक अधिकारी आणि जवानाला अटक केली आहे.

महापालिकेच्या आरोग्यप्रमुखांची नोंदणी रद्द

$
0
0
पालिकेचे वादग्रस्त आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांची नोंदणी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) रद्द केली आहे. 'एमसीआय'च्या रजिस्टरमधून डॉ. परदेशी यांचे नाव काढून टाकण्यात आल्याने त्यांच्याकडे असलेले आरोग्यप्रमुख पद धोक्यात आले आहे.

उपअभियंता धुसिया अखेर निलंबित

$
0
0
आकाशचिन्ह विभागात उपअभियंता म्हणून काम करणाऱ्या राजदीप धुसिया यांना पालिकेने निलंबित केले आहे. गेल्या सहा महिन्यांत लाच घेताना पकडल्याने पालिकेच्या दुसऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

३९ पर्यटक अद्याप बेपत्ता

$
0
0
उत्तराखंडमध्ये यात्रेसाठी गेलेल्या पुणे जिल्ह्यातील ३२१ पर्यटकांपैकी ३९ जणांचा अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. संपर्क झालेल्या पर्यटकांपैकी काहीजण परतीच्या वाटेवर असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सोमवारी दिली.

४० हजारांसह, बैलाचीही चोरी

$
0
0
बेल्हे येथे भरलेल्या बैल बाजारात बैल खरेदीसाठी आलेल्या जळगावच्या शेतकऱ्याचा खिसा चोरट्याने कापून ४० हजार रुपये लांबवले. याबाबतची तक्रार रतन बिंदा पाटील (रा.चाळीसगाव,जळगाव) यांनी बेल्हे आउट पोस्टला दिली. पाटील त्यांचा टेम्पो घेऊन बाजारात आले होते.

पोलिसांला मारहाण

$
0
0
पूर्वीच्या एका गुन्ह्याबाबत आवश्यक ती माहिती देण्याच्या बहाण्याने पोलिसाला बोलावून त्यांना मारहाण करण्याचा प्रकार रविवारी (२३ जून) रात्री बाराच्या सुमारास घडला. पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र शिवाजी वाईकर (वय ३७, निगडी पोलिस स्टेशन) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

पुन्हा परिसर पिंजून काढा

$
0
0
'केदारनाथ परिसरातील पर्वतरांगामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील पर्यटकांना वाचविण्यासाठी पुन्हा एकदा शोध मोहीम हाती घेऊन पर्वतरांगा पिंजून काढा, असे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सर्वोच्च लष्करी अधिकारी आणि उत्तराखंडातील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सांगितले आहे.

भोरमध्ये 'राष्ट्रवादी'चा धुव्वा

$
0
0
भोर नगरपरीषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला असून, चार प्रभागातील १७ जागांपैकी १३ जागा मिळवून काँग्रेसने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. नगरपरीषदेची सत्ता माझ्या हातात द्या,एका वर्षात दहा कोटी रूपये देतो.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images