Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विमानगर येथील एजंटला अटक

$
0
0
आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध् हैद्राबाद यांच्यात झालेल्या मॅचवर २५ हजार रुपयांचे बेटिंग लावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी विमाननगर येथील एका रिअल इस्टेट एजंटला अटक केली आहे.

पालखी मार्गांवर मिळणार 'मोबाइल कनेक्टिव्हिटी'

$
0
0
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गांवर लाखो वारकऱ्यांना निरोपांची देवाणघेवाण सोयीचे होण्यासाठी या मार्गावर मोबाइल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 'बीएसएनएल'सह अन्य कंपन्यांना करण्यात आली आहे.

उमेदवार भरती अर्जांमुळे ZP त गोंधळ

$
0
0
जिल्हा परिषदेमधील विविध पदांच्या भरतीमधील उमेदवारांच्या अर्जांमधील त्रुटी दूर करण्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेत गोंधळ झाला आणि वादविवादही झडले. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महापौरांसह पदाधिका-यांची ब्राझिल दौ-याची तयारी

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर मोहिनी लांडे आणि काही पदाधिकारी ब्राझिल दौऱ्याची पूर्वतयारी करीत आहेत. वैचारिक देवाणघेवाणीसाठी लवकरच हा दौरा केला जाणार असून, तो स्वखर्चाने करणार असल्याचा दावा केला जात आहे.

क्रिकेट बेटिंगप्रकरणी ५ जणांना अटक

$
0
0
आयपीएलच्या अंतिम सामन्यावर बेटिंग लावणाऱ्या पाच जणांना पिंपरी पोलिसांनी रविवारी (२६ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास अटक केली. मात्र, मुख्य बुकी फरार झाला. या छाप्यामध्ये रोकड, दोन लॅपटॉप, १३ मोबाइल असा दोन लाख दहा हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

...अन् श्रीशांतच्या घरी पडला 'यॉर्कर'

$
0
0
पर्यटनाच्या आवडीतून दर वर्षी केरळ आणि बालाजीला जाण्याची मोहीम यंदा चांगलीच अंगलट आली आणि थेट पोलिस कोठडीची हवाच खाण्याची वेळ आली... ...आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंमधील सूत्रधार एस. श्रीशांतच्या घराजवळून बुकी समजून अटक करण्यात आलेला नीलेश रामचंद्र जगताप सांगत होता.

शिक्षणविश्वात दिशादर्शनासाठी... 'कॅम्पस प्लॅनेट'!

$
0
0
दहावीनंतर कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा? बारावीनंतर करिअरची दिशा काय ठरवायची? प्रवेशप्रक्रियेसाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे...? ... दहावी-बारावीच्या निकालाच्या तोंडावर विद्यार्थी, पालकांना असे प्रश्न भेडसावत असतील.

'जिप्सी'कार घेणार बालकवींचा ठाव

$
0
0
'प्रेम म्हणजे प्रेम असतं'सारख्या रचनांमधून मराठीमनाला भुरळ घालणारे 'जिप्सी'कार कविवर्य मंगेश पाडगावकर आता बालकवींच्या कवितांवर आधारित पुस्तकाचे लेखन करीत आहेत.

कलाकाराचा जन्म प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी

$
0
0
'कलाकाराचा जन्म केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी झालेला असतो. त्यामुळे त्याचा कोणत्याही पक्षाशी किंवा धर्माशी संबंध नसतो,' अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी सोमवारी व्यक्त केली.

रस्तेखोदाईवरील निर्बंधांमुळे BSNL'ची सेवा खंडित

$
0
0
रस्त्यावर खोदकाम केल्यास संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी काढले असल्याने 'बीएसएनएल'चे कर्मचारी रस्ता खोदून सेवा पूर्ववत करण्यास नकार देत आहेत.

स्वारगेट, शिवाजीनगरला खासगी एजंटांचा विळखा

$
0
0
ऐन सुटीच्या धामधुमीतच राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानकांना खासगी ट्रॅव्हल्स एजंटांनी घेरले आहे. जागोजागी एसटीचे अधिकारी नेमूनही एजंट प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्स आकर्षित करीत आहे.

शरद ढमाले बचावले

$
0
0
शिवसेनेचे माजी आमदार शरद ढमाले यांच्या स्कॉर्पिओला राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसची जोरदार धडक बसून सोमवारी अपघात झाला. सुदैवाने ढमाले या अपघातातून बचावले असून, पुणे-सातारा रोडवर दुपारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली.

डासांच्या उत्पत्तीला जबाबदार बिल्डरांवर खटले भरणार

$
0
0
बांधकामांच्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून त्यातून डासांची पैदास झाल्यास त्या संबंधित बांधकाम व्यावसायिकावर खटला दाखल करण्यात येणार आहे. पावसाचे पाणी साचून मलेरिया, डेंगी, चिकुनगुनियाच्या डासांची पैदास होऊ नये, या साठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने खबरदारीची पावले उचलली आहेत.

तालुका स्तरावर हवामानाचा वेध

$
0
0
खंडप्राय देशात तालुका स्तरावरील हवामान अंदाज वर्तविण्याची परीक्षा देण्यासाठी हवामान विभाग यंदाच्या पावसाळ्यापासून सज्ज होत आहे.

राज्यातील दुष्काळी कामे ठेकेदारांच्या फायद्यासाठी

$
0
0
राज्यातील दुष्काळी कामांचा उपयोग दुष्काळग्रस्तांसाठी नाही, तर केवळ ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी होत असल्याची टीका मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी सोमवारी केला.

लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंटमधील सर्व निर्णय दिल्लीत होतात, तर निवडून दिलेल्या नगरसेवकांना मर्यादित अधिकार असल्यामुळे कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आता 'स्पीड पोस्ट - कॅश ऑन डिलिव्हरी' योजना सुरू

$
0
0
पोस्ट म्हणजे केवळ पत्रांचा ढिगारा हे चित्र आता बदलणार असून, पोस्टाच्या माध्यमातून तब्बल ५० हजार रुपये किमतीपर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक साधने, ​पुस्तके, कपडे आदी वस्तू पाठवता येणार आहेत.

भारती विद्यापीठ परिसरात १० दुकाने फोडली

$
0
0
भारती विद्यापीठ परिसरातील वेगवेगळ्या इमारतीतील दहा दुकानांची शटर वाकवून पावणेतीन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटून नेली. सोमवारी पहाटे दोन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी रफीक उमर शेख (वय २५, रा. वारवडी, ता. पुरंदर) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पोलिस असल्याची बतावणी करून दागिने लांब‌विले

$
0
0
कोथरूड येथील आनंदनगरमधील एका वयोवृद्ध् व्यक्तीला पोलिस असल्याची बतावणी करून, त्याच्याकडील ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने दोन चोरट्यांनी लांबविले. रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

कोट्यवधींचा गंडा घालणा-या गुरुजीला अटक

$
0
0
गुंतवणुकीवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी नारायण पेठेतील एका गुरुजीला अटक केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images