Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दोन दिवसांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

$
0
0
अंदमान समुद्रात सलग सहा दिवस मुक्काम केल्यानंतर रविवारपाठोपाठ सोमवारी मान्सून बंगालच्या उपसागरात अंशतः पुढे सरकला. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

चहा झाला 'दस नंबरी'!

$
0
0
दैनंदिनीचा आविभाज्य घटक असलेला चहा आता वाढत्या महागाईच्या उकळीने दहा रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. पुणे अमृततुल्य असोसिएशनकडून त्याचे सूतोवाच करण्यात आले आहे.

पुण्यातील ३५ ढाब्यांना नोटिसा

$
0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेसह पुणे सातारा, नगर हायवेवरील ढाब्यांसह हॉटेलच्या झाडाझडतीला पुणे विभागाच्या अन्न व औषध विभागाने (एफडीए) सुरुवात केली असून, त्यात पुणे जिल्ह्यातील ३५ ढाब्यांसह हॉटेलना नोटिसा जारी केल्या आहेत.

गैरव्यवस्थेला ठेंगा

$
0
0
बायोमेट्रिक टेक्नॉलॉजी वापरून रेशनकार्डांवरील अन्नधान्याचे वितरण करण्याच्या पायलट प्रोजेक्टमध्ये धान्याची तब्बल पन्नास टक्के बचत झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील या शिरूर पॅटर्नचा राज्याच्या अन्य भागांमध्येही विस्तार होण्याची शक्यता आहे.

नायजेरियन नागरिकाला सक्तमजुरी

$
0
0
बनावट परकीय चलन आणि पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी एका नायजेरियन नागरिकाला चार वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश विनय जोशी यांनी हा निकाल दिला.

संजय दत्तला घरचा डबा कशाला?

$
0
0
येरवडा जेलमध्ये मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तला कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार घरचा डबा देण्याची तरतूद जेल प्रशासनाच्या नियमावलीत नसल्यामुळे कोर्टाने या आदेशाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी येरवडा जेल प्रशासनातर्फे मुंबई टाडा कोर्टाकडे करण्यात आली आहे.

नोटीसा बजावल्याप्रकरणी एमआयडीसीवर मोर्चा

$
0
0
संत तुकारामनगर येथील वायसीएम हॉस्पिटलमागे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेवरील झोपडपट्टीवासियांना कारवाईच्या नोटिसा बजावल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी (२८ मे) एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला.

'आमचा बाप आन् आम्ही'ची लवकरच १६१ वी आवृत्ती

$
0
0
नियोजन आयोगाचे सदस्य अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जा‍धव यांच्या 'लसावि : माझ्या समग्र अभिव्यक्तीचा' आणि 'आमचा बाप आन् आम्ही' या पुस्तकाची १६१ वी आवृत्ती अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी (१ जून) संध्याकाळी सहा वाजता मुक्तांगण महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.

मुलींच्या जन्मदरात राज्यात पुणे चौथे

$
0
0
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे लेकीच्या जन्माचे स्वागत करण्यात मात्र मागे पडत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. मुलींचे प्रमाण वाढणाऱ्या शहरांमध्ये अहमदनगर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, पुणे चौथ्या क्रमाकांवर आहे.

केवळ सर्वेक्षण नको करेक्शनही करा

$
0
0
शहरातील सर्व मिळकतींचे केवळ फेर सर्वेक्षणच नको तर करेक्शन करून नोंदीची प्रक्रियादेखील करावी, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (२८ मे) सदस्यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना केली.

‌'किवीं'च्या जीभेवर हापूसची चव

$
0
0
महाराष्ट्रातच नव्हे; तर देशातही लोकप्रिय असलेल्या हापूस आंब्याची चव आता न्यूझीलंडमधील नागरिकांच्या जीभेवरही रेंगाळली आहे. राज्यातून यंदा प्रथमच न्यूझीलंडला हापूस आंब्याची निर्यात करण्यात आली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

औंध जिल्हा रुग्णालयातील परिचारिका ६ जूनला संपावर

$
0
0
उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आलेल्या मंचरच्या ग्रामीण रुग्णालयात पुण्यातील परिचारिकांची बदली करण्याच्या निर्णयाविरोधात परिचारिकांच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन या संघटनेने तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

अनधिकृत बांधकामावर किवळे परिसरात कारवाई

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब प्रभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने किवळे परिसरातील आदर्शनगर, दत्तनगर आणि विकासनगर येथील अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी (२९ मे) कारवाई केली. यामध्ये २३ हजार ८३३ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली २३ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

घोरपडीतील फ्लायओव्हरसाठी पंतप्रधान कार्यालयाची सूचना

$
0
0
'घोरपडीतील रेल्वे क्रॉसिंगवर फ्लायओव्हर उभारण्याबाबत स्थानिक नागरिकांच्या मागणीचा विचार करून योग्य ती कार्यवाही करावी,' अशी सूचना पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण खात्याला केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या फ्लायओव्हरसाठी उभारण्यात आलेल्या नागरी आंदोलनाला यश येण्याची चिन्हे आहेत.

काळ्या काचांवर पुन्हा कारवाईचा बडगा

$
0
0
उन्हाच्या झळांपासून थोडसे लांब राहण्यासाठी वाहनचालक काळ्या काचांचा आधार घेत असतानाच त्यांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिस पुन्हा रस्त्यावर येत आहेत. दुसरीकडे 'आरटीओ'नेही अशा कारवाईची तयारी केली आहे.

कामात विलंब करणा-या कर्मचा-यांच्या बदल्या

$
0
0
जन्म-मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी कित्येक महिने वाट पाहावी लागल्याने पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर अखेर महापालिकेच्या आरोग्य विभागाने या विभागातील १५ कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.

कोथरुड, बोपोडी, वानवडीच्या हॉस्पिटलचे खासगीकरण

$
0
0
कोथरुड (गोसावी वस्ती), बोपोडी आणि वानवडी येथील तीन हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याचे निश्चित झाले आहे. या ठिकाणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. खासगीकरणासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी टेंडर भरले असून त्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.

सासवडमध्ये ११ लाखांच्या बनावट सीडी जप्त

$
0
0
पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून ११ लाख २० हजार रुपयांच्या बनावट डिव्हीडी आणि अश्लिल चित्रफिती जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली आहे. सासवड रोडवरील भेकराईनगर आणि मंत्री मार्केट येथे हा छापा टाकण्यात आला.

'त्या' कम्प्युटर कंपनीला जकातीमध्येही सवलत

$
0
0
बाजारभावापेक्षा जादा दराने कम्प्युटरची खरेदी करणाऱ्या शिक्षण मंडळाने संबधित कंपनीला जकातीमध्येही सवलत दिल्याचे समोर आले आहे. शिक्षण मंडळाने जकात खात्याकडे केलेल्या जकातमाफीच्या अर्जामुळे कम्प्युटरचा पुरवठा करणाऱ्या कंपनीला चार लाख रूपयांचा फायदा मिळाला आहे.

जिल्ह्यातील ४६ गावे बनली इको फ्रेंडली

$
0
0
करवसूली, स्वच्छतागृहे आणि झाडे लावण्याचे निकष पूर्ण करून जिल्ह्यातील ४६ गावे इको फ्रेंडली व्हिलेजेस ठरली आहेत. त्याबरोबरच सहा गावांनी तर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के करवसूलीची कामगिरी केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images