Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‌कर भरण्यास सात दिवस शिल्लक

$
0
0
सवलतीच्या दराने मिळकतकर भरण्यासाठी अखेरचे सात दिवस शिल्लक असून, एक जूनपासून पहिल्या सहा महिन्यांसाठीच्या मिळकतकरावर दोन टक्के दंड आकारला जाणार आहे.

मिळकतकर बिलांबाबत सदस्य नाराज

$
0
0
नागरिकांना मिळकतकर बिले योग्य आणि बिनचूक मिळावीत, पूर्णत्वाचा दाखला मिळालेल्या इमारतींना करआकारणी केली जावी, अनधिकृत बांधकामांकडूनही मिळकतकराची वसुली केली जावी, यांसारख्या विविध मागण्या सर्वपक्षीय सदस्यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत केल्या.

कांताबाई खेडकर यांना 'पठ्ठे बापुराव पुरस्कार'

$
0
0
पुणे महानगरपालिकेचा २०१२ चा 'लोकशाहीर पठ्ठे बापुराव पुरस्कार' ज्येष्ठ कलावंत कांताबाई खेडकर (सातारकर) यांना जाहीर झाला आहे. खेडकर यांच्यासह लोकनाट्य क्षेत्रातील सहायक आणि उदयोन्मुख कलावंतांना दिले जाणारे पुरस्कारही या वेळी जाहीर करण्यात आले.

नाटककार असल्याचा अभिमान

$
0
0
'फिल्म इन्स्टिट्यूट'चा संचालक म्हणून चाळीस वर्षांपूर्वी पुण्यात वास्तव्य केले आहे. त्या काळच्या आठवणी आज मनात दाटून येत आहेत. माझे मराठी लिहिण्याइतके चांगले नसल्याने मराठीत सर्जनशील लेखन करता आले नाही, तरीही मराठी रसिकांनी मला प्रेम दिले.

आर्किटेक्टला जन्मठेप

$
0
0
प्रेमसंबंधातून आपल्या ऑफिसमधल्या रिसेप्शनिस्टचे अपहरण करून तिचा खून केल्याप्रकरणी एका आर्किटेक्टला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश एस. पी. तावडे यांनी हा निकाल दिला.

शिरूर तालुक्याला कुकडीचे पाणी

$
0
0
शिरूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्यासाठी कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. उजनी व जायकवाडी धरणापाठोपाठ आता कुकडी धरण प्रकल्पातून दुष्काळी जनतेला पाणी सोडण्यात येणार आहे.

फुकट्या प्रवाशांना ८४ लाखांचा दंड

$
0
0
पीएमपीने प्रवास करणाऱ्या ८४ हजार फुकट्या प्रवाशांकडून मागील वर्षात ८४ लाख रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. पीएमपीने एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे.

जन्म-मृत्यू कार्यालयाचे वाभाडे

$
0
0
जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात नागरिकांकडून सर्रास पैसे घेतले जातात, प्रमाणपत्रावरील नाव-पत्ता बदलण्याचे अधिकार नसताना पैसे घेतले जातात, सर्व्हर डाउन असल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांना हेलपाटे खावे लागतात...

लढा... 'वर्किंग वुमेन'चा

$
0
0
उच्चशिक्षित मुलींची टक्केवारी वेगाने वाढत असताना 'वर्किंग वुमेन'ची टक्केवारी घटत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष जनगणनेच्या अहवालातून पुढे आला आहे. विशेष म्हणजे महानगरांमध्येच नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चिमुकल्यांच्या जीवावर उठली 'चायना मेड' खेळणी

$
0
0
सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा खेळण्यातल्या व्हिडिओ गेमचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला. हे खेळणे 'मेड इन चायना' होते. खरं तर याआधीही अशा घटना घडल्या आहेत.

समुद्रापार होतेय संस्कृतीची समृद्धी

$
0
0
सभागृहाच्या दारात गणपतीची मूर्ती.. दिव्यांची रोषणाई, फुलांच्या माळा आणि हातात तबक घेतलेल्या, पारंपरिक नऊवारी साडी परिधान केलेल्या युवतींनी आमचं स्वागत केलं आणि क्षणभर मॉरिशसमध्ये असल्याचा विसरच पडला. `ही तर फक्त सुरुवात आहे.

श्रीशांतच्या घरात घुसणाऱ्याला अटक

$
0
0
आयपीएल क्रिकेटमधील 'स्पॉट फिक्सिंग' प्रकरणातील मुख्य संशयित खेळाडू एस. श्रीशांत याच्या कोची येथील निवासस्थानी मुंबई पोलिस असल्याचे सांगून थेट त्याच्या कुटुंबियांशी बोलणी करण्यास गेलेला राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी नीलेश रामचंद्र जगताप (रा. साकुर्डे, ता. पुरंदर) यास पोलिसांनी संशयावरून अटक केली आहे.

'संमेलनाला येतेय उत्सवाचे स्वरूप'

$
0
0
'अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यात माणूस मांडला. परंतु, अलिकडे कोणत्याही संमेलनाला उत्सवाचे स्वरूप येत असून विचार बाजूला पडत आहेत,' अशी खंत राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छतामंत्री प्रा. लक्ष्मण ठोबळे यांनी व्यक्त केली.

दिलीप प्रभावळकर यांना नटरंग पुरस्कार

$
0
0
नटरंग प्रतिष्ठानतर्फे शाहीर मधू कडू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा 'नटरंग कलागौरव पुरस्कार' या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाला आहे. बालगंधर्व रंग मंदिरात येत्या ३० मे रोजी आमदार गिरीश बापट यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

'रुपी'च्या दोषी संचालकांच्या मालमत्तांचा शोध घेऊन जप्ती

$
0
0
रुपी बँकेच्या दोषी संचालकांच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्या जप्त करण्याची कार्यवाही वेगाने करण्यात येईल, असे आश्वासन सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी नुकतेच दिले. तसेच गरजू ठेवीदारांना पैसे देण्याबाबत स्वतः पाठपुरावा करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

'त्यांनी' केली पुण्याची सफर

$
0
0
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातून आलेल्या ९० मुलांना शनिवारी पुणे पोलिसांनी पुण्याची सफर घडविली. पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहून ही मुले हरखून गेली.

पाणीसाठा नियोजनावर प्राधिकरण ठेवणार देखरेख

$
0
0
राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याच्या नियोजनावर पुढील वर्षीपासून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्वतः देखरेख ठेवणार आहे. पुढील वर्षी राज्यातील सर्व प्रकल्पांमधील साठ्याचा आढावा घेऊन त्याचे नियोजन ३१ ऑक्टोबरपर्यंत प्राधिकरणाला सादर करावे, असा आदेश देण्यात आला आहे.

मेळघाटातील दुर्गम गावे बदलत आहेत

$
0
0
'गावात कोणीही मूल आजारी पडले की पूर्वी अंधश्रद्धेचा पगडा असल्याने त्याला झाडपाल्याचे औषध दिले जात होते. पण, त्याने आजार बरा न होता मूल डोळ्यासमोर मृत्युमुखी पडे. आज याच कुटुंबातील महिला म्हणतात, भाभी तुमच्या गोळीने मुलगा लवकर बरा झाला.

प्रतिमा उदंड झाल्या...

$
0
0
देशात १९९६-९७च्या दरम्यान अंकीय प्रकाशचित्रणाला(डिजिटल फोटोग्राफी) सुरुवात झाली. हळूहळू कॅमेरा रोल्सची भेंडोळी नष्ट होऊन त्यांची धुणी बडवणाऱ्या प्रयोगशाळा बंद पडल्या. रोल विकणाऱ्या कंपन्या बंद पडल्या.

कर्नाड रंगभूमीवरील 'कॅलिडोस्कोप'

$
0
0
देश, प्रदेश आणि भाषांच्या पलीकडे जाऊन गिरीश कर्नाड यांनी कलासंसार उभारला. कर्नाड हे रंगभूमीवरील कॅलिडोस्कोप आहेत, असे गौरवौद्गार ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांनी शनिवारी काढले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images