Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गॅरेजला आग; १५ लाखाचे नुकसान

$
0
0
आकुर्डीत एका गॅरेजला लागलेल्या आगीमध्ये गॅरेजमधील लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले. गुरुवारी (२३ मे) संध्याकाळी ही आग लागली. आगीत कोणीही जखमी झाले नाही.

दुष्काळात तेरावा, महसुलात घट

तीन लाखांचे दागिने लंपास

$
0
0
पुणे-मुंबई एक्सप्रेस- वे लगत असलेल्या ताजे-पिंपळोली येथील सागर ड्राइव्ह इन हॉटेलवर उपहारासाठी थांबलेल्या एका बसमधील प्रवाशाच्या बॅगेतून तीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. ही घटना बुधवारी ( २२ मे ) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हॉटेलच्या परिसरात घडली.

पावसाळ्यापूर्वी कामे मार्गी लावा

$
0
0
पावसाळ्यापूर्वी शहरातील खड्डे दुरुस्ती करा. नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करा. धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीसा द्या, अशा सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयोजित केलेल्या पूरनियंत्रण विभागाच्या बैठकीत गुरुवारी (२३ मे) देण्यात आल्या.

गंगा येणार दुष्काळी अंगणी

$
0
0
दुष्काळात पाणीटंचाईचा सामना कराव्या लागलेल्या गावांमध्ये पुन्हा ही परिस्थिती उद्‍भवू नये, म्हणून उभ्या राहिलेल्या दीड हजार सिमेंट बंधाऱ्यांच्या साखळीत येत्या पावसाळ्यामध्ये तब्बल सव्वाचार कोटी घनमीटर अधिक पाणी साठणार आहे. यातून दुष्काळ निवारणाचा 'महाराष्ट्र पॅटर्न' तयार झाला असून, आणखी पंधरा जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.

अभिनयातील बारकावे अभ्यासा!

$
0
0
'सध्याच्या वेगवान काळात व्यावसायिक अभिनेता म्हणून सिनेमा किंवा नाट्य क्षेत्रात प्रवेश केल्यावर कलाकारांना आपल्या कामाबाबत विचार करण्यास वेळ नाही. अभिनयातील सूक्ष्म बारकावे अभ्यासले जात नाही. व्यावसायिक अभिनेत्याने त्यासाठी वेळ काढण्याची आवश्यकता आहे,' असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.

चाळिशीनंतरचा चक्रव्यूह

$
0
0
चाळिशीनंतरचं वय म्हणजे संसार, मुलंबाळं आणि नोकरीतून थोडंसं स्थिरस्थावर होऊन स्वतःसाठी वेळ काढत जगण्याचं वय! सध्या मात्र, याच वयात विवाहबाह्य संबंध निर्माण होण्याचं प्रमाण वेगानं वाढतंय.

'एलबीटी'तून पुस्तकांना वगळल्याचा निर्णय योग्यच !

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) मधून सर्व प्रकारच्या पुस्तकांना वगळ्याचा निर्णय स्वागतार्ह असून वाचक आणि प्रकाशकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याची भावना प्रकाशकांनी व्यक्त केली.

श्रेयासाठी राजकीय 'वाटमारी'

$
0
0
स्थानिक संस्था कराला (एलबीटी) विरोध दर्शविण्यासाठी व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर श्रेयासाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाटमारी चालू असल्याची टीका नागरी हक्क सुरक्षा समितीने केली आहे.

आरटीओ कॅम्प आता हडपसरलाही

$
0
0
वाहनांची तपासणी करणे, लायसन्स काढणे नागरिकांना सुलभ व्हावे, म्हणून आरटीओने हडपसर येथे आरटीओ कॅम्पचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून या कॅम्पची सुरुवात होणार आहे.

चिखलीतून बालिका बेपत्ता

$
0
0
खेळायला जाते म्हणून सांगून गेलेली चार वर्षाची बालिका मोरेवस्ती - चिखली येथून बेपत्ता झाली आहे. नझिया बिलाल मुल्ला (रा. झेंडा चौक, मातृछाया, चिखली) असे या बालिकेचे नाव आहे. रंगाने गोरी, गोल चेहरा, उंची दोन फूट सहा इंच, नाक सरळ, अंगात निळ्या रंगाचा फ्रॉक आणि निळी हाफ पॅंट असे तिचे वर्णन आहे.

'पुणे दर्शन' सहलीमध्ये लुंबिनी उद्यानाचा समावेश

$
0
0
पुण्यात येणाऱ्या पर्यटकांना गौतम बुद्धांच्या चरित्राची ओळख व्हावी, यासाठी महापालिकेने उभारलेल्या लुंबिनी उद्यानाचा समावेश आता 'पुणे दर्शन'च्या पर्यटन सहलीत होणार आहे.

गणनेतून आज कळणार प्राण्यांची सद्यस्थिती

$
0
0
वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे भीमाशंकर आणि मयुरेश्वर अभयारण्यामध्ये आज, शनिवारी (२५ मे) प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. जंगलात वर्षभरात प्राण्यांची संख्या वाढली अथवा कमी झाली तसेच नवीन कोणते प्राणी दाखल झाले याची माहिती गणनेतून मिळणार आहे.

'पुणे दर्शन' सहलीमध्ये लुंबिनी उद्यानाचा समावेश

$
0
0
पुण्यात येणाऱ्या पर्यटकांना गौतम बुद्धांच्या चरित्राची ओळख व्हावी, यासाठी महापालिकेने उभारलेल्या लुंबिनी उद्यानाचा समावेश आता 'पुणे दर्शन'च्या पर्यटन सहलीत होणार आहे. त्याचे उद्घाटन बुद्ध जयंतीनिमित्त आज, शनिवारी (२५ मे) सकाळी नऊ वाजता महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते होणार आहे.

`राष्ट्रवादी`च्या दबावामुळे गुन्हा दाखल

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेचे भोसरी विभागप्रमुख अशोक कोतवाल यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेऊन सारिका कोतवाल यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

सोलापूर रोहयो गैरव्यवहाराला नवे वळण

$
0
0
सोलापूर जिल्ह्यातील रोजगार हमीच्या कामांत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए. पी. विभुते समितीचा अहवाल विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी अमान्य केला आहे.

बेकायदा बांधकामांप्रकरणी ग्रामसेवक निलंबित

$
0
0
बेकायदा इमारतींच्या ग्रामपंचायतीमध्ये नोंदी घेतल्याबद्दल चाकणमधील नाणेकरवाडी, मेदनकरवाडी व हवेलीतील साडेसतरानळीच्या ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. या तीनही ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सर्व सदस्यांना कारवाईची नोटीसही बजावली जाणार आहे.

साडेसात किलो अफू जप्त

$
0
0
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नागपूरहून खुराणा ट्रॅव्हल्समधून साडे सात किलो अफू घेऊन येणाऱ्या मणिपुरी नागरिकाला अटक केली. या मणिपुरी नागरिकाचे नक्षलवाद्यांशी काही संबंध आहेत का, याबाबत तपास करण्यात येत आहे.

'एटीएम' फोडणारी टोळी गजाआड

$
0
0
गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाने 'एटीएम' मशीन फोडून रोकड लुटणाऱ्या बीड येथील टोळीला रांजणगाव येथून अटक केली. या टोळीने पुणे शहर आणि ग्रामीण परिसरात चार गुन्हे केले आहेत. आरोपींकडून साडेनऊ लाख रुपये तसेच स्कॉर्पिओ गाडीसह एकूण सतरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

कोथरूड गोळीबारप्रकरणी दोन जणांना अटक

$
0
0
मारणे, घायवळ टोळ्यांनी ग्रासलेल्या कोथरूडमध्ये नवनवीन 'भाई' उदयाला येत आहेत. करिश्मा सोसायटीजवळील पालखी हॉटेलमध्ये झालेला गोळीबार भाईगिरी करण्यासाठीच झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images