Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चार सोनसाखळी चोरट्यांना अटक

0
0
पुणे शहर आणि परिसरात सोनसाखळी चोरी करणाऱ्या कल्याण येथील चार सराईत गुन्हेगारांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले असता २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जगतापशी राष्ट्रवादीचा संबंध नाही

0
0
आयपीएलमध्ये दोन- चार खेळाडूंनी केलेल्या चुकांमुळे संपूर्ण क्रिकेटलाच दोष देणे चुकीचे आहे. चुका करणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा ही झालीच पाहिजे, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.

मांजरेकर झाले पुणेकर !

0
0
मुंबई 'कल्चरली डेड' झाली आहे. तिथं आता पूर्वीची गंमत राहिलेली नाही. मोकळा श्वास घेण्यासाठी तिथं जागाही कमी पडते. पुणं संस्कृती टिकवून आहे म्हणून मी पुण्यावर कायमच प्रेम केलं आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी शनिवारी पुणेकर होण्यामागच्या भावना उलगडल्या.

इथेही 'फिक्सिंग'

0
0
'आठवड्यातील गुरुवार, शुक्रवारच्या नाटकांच्या 'बुकिंग'च्या तारखा कोणा एकालाच कशा मिळतात, असा सवाल करून 'आयपीएल'नंतर नाटकांच्या बुकिंगच्या तारखांमध्येही 'फिक्सिंग' होत आहे,' असा आरोप नाट्य निर्मार्त्या लता नार्वेकर यांनी शनिवारी केला.

'७२ मैलां'च्या सिने-निर्मितीत अक्षय कुमार

0
0
गेले अनेक दिवस अक्षय कुमार मराठीत सिनेमा करणार असल्याची चर्चा चांगलीच वेग घेतेय. म्हणजे सिनेमात भूमिका करणार नसून तो एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे. अश्विनी यार्दीसह अक्षय कुमारची ग्रेझिंग गोट ही कंपनी '७२ मैलः एक प्रवास' या सिनेमाची सह-निर्मिती करणार आहे.

रिपाइंला हवे भाजपबरोबरीचे स्थान

0
0
शिवसेना-भाजपच्या कळपात आल्यानंतरही राज्यातील स्थानिक निवडणुकांत आपला प्रभाव पाडू न शकलेल्या रिपब्लिकन पक्षाला महायुतीत भाजपच्या बरोबरीचे स्थान हवे आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी स्वत: तसा फॉर्म्युला मांडला आहे. त्यानुसार राज्यात सत्तांतर झाल्यास महाराष्ट्रात भाजपचा एक आणि रिपाइंचा एक असे दोन उपमुख्यमंत्री होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

वेशभूषेतली 'ताजगी'!

0
0
कथानक आणि भूमिकेवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या मराठी सिनेमात आता वेशभूषेवरही मेहनत घेतली जाऊ लागली आहे. 'संशयकल्लोळ', 'प्रेमाची गोष्ट' यांसारख्या नुकत्याच येऊन गेलेल्या आणि 'लग्न पाहावं करून'सारख्या आगामी सिनेमांकडे नजर टाकली, तर हे सहज लक्षात येतं.

एकांकिकांनाही मिळणार आता हक्काचं संमेलन

0
0
रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या एकांकिकांच्या निर्मितीसाठी राज्यव्यापी चळवळ उभारली जात आहे.

विश्व संमेलनाच्या 'हौसे'लानिधीअभावी 'खीळ'

0
0
सलग दुसऱ्या वर्षी संयोजकांनी माघार घेतल्याने विश्व साहित्य संमेलन रद्द करण्याची वेळ साहित्य महामंडळावर ओढवली आहे. त्यामुळे, टोरांटोपाठोपाठ लंडनवारीच्या हौसेलाही खीळ बसली आहे.

प्राध्यापकांच्या नेमणुकांसाठी रिक्रुटमेंट बोर्डची मागणी मान्य

0
0
प्राध्यापकांच्या नेमणुकांसाठी रिक्रुटमेंट बोर्ड स्थापन करण्याची मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी मान्य केल्याचा दावा अखिल महाराष्ट्रीय नेट-सेट, बीएड, डीएड पात्रताधारक संघटनेने केला आहे.

बीएड, एमएड सीईटी २० जूनला

0
0
बीएड आणि एमएड अभ्यासक्रमांच्या येत्या शैक्षणिक वर्षाच्या (सन २०१३-१४) प्रवेशासाठीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) येत्या २० जूनला होणार आहे.

आहेर नको… हवाय 'मैत्री'ला आधार

0
0
प्रतिष्ठेसाठी विवाह समारंभांवर होणारा वारेमाप खर्च आणि त्याची चर्चा होत असताना चिंचवडमधील गावडे आणि पिसाळ कुटुंबियांनी लग्नात भेटवस्तू स्वीकारण्याऐवजी सामाजिक उपक्रमास मदत करण्याचे आवाहन केले आहे.

अल्पवयीन मुलीला पळविणा-या दोघांना पिंपरीत अटक

0
0
कैलासनगर येथून एका अल्पवयीन मुलीला पळवून तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.प्रमोद प्रकाश डवरी (वय २१, रा. पिंपरीगाव) आणि गणेश सुभाष पवार (वय २१, रा. दत्त मंदिराजवळ, वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मंगळसूत्र चोरीचे प्रकार चालूच

0
0
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचे प्रकार चालूच असून, गेल्या तीन दिवसांत शहरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. याशिवाय पोलिस असल्याची बतावणी करीत दागिने लंपास केल्याचाही प्रकार निगडी येथे घडला आहे.

... अवघे पाऊणशे वयोमान!

0
0
'मी मराठी नाटक आणि नाट्यसंगीताचा फार मोठा चाहता आहे. मला या क्षणी एक नाट्यपद आठवत आहे. म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान...' ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते सत्कार स्वीकारल्यावर कार्नाड यांनी उत्स्फूर्तपणे या भावना व्यक्त केल्या आणि प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

जॉयराइडसाठी असं नोंदवा नाव!

0
0
पुण्यातील स्त्री शक्तीला सलाम करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'युवादिल' उपक्रमाअंतर्गत 'द अनस्टॉपेबल वुमन्स जॉयराइड' कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. त्यात भाग घेण्यासाठी महिलांना 'मटा'च्या फेसबुक पेजवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.

तीन महिन्यांत उड्डाणपूल पूर्ण करा

0
0
धायरी फाटा येथील उड्डाणपुलाचे काम संबंधित विभागांनी येत्या तीन महिन्यांत पूर्ण करावे, असे आदेश महापौर वैशाली बनकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

अन्नधान्याचे नुकसान यंदा भरून निघणार

0
0
राज्याच्या विविध भागांत पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा मान्सून हात देण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सुगीचे ठरण्याची चिन्हे आहेत. पावसाच्या प्रमाणाबरोबरच यंदा चारही महिन्यात मान्सूनचे वितरणही सम प्रमाणात राहण्याची शक्यता वेगवेगळ्या संस्थांनी वर्तविली आहे.

नक्षलवादी हल्ल्याचे राजकारण नको

0
0
'छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करून ही राष्ट्रीय समस्या असल्याने काँग्रेसने याविषयी राजकारण करू नये,' असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केले.

बचतगट उरले अनुदानापुरते

0
0
केवळ अनुदानासाठी बचतगट स्थापन करण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अर्ज करणाऱ्या ६२२ पैकी ४०८ महिला बचतगटांना अनुदानापासून दूर ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images