Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लोणावळा- खंडाळा हाउसफुल्ल

$
0
0
नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लोणावळा- खंडाळ्यासह कार्ला, मळवली परिसरातील हॉटेल, रिसॉर्ट पर्याटकांच्या वाढत्या गर्दीमुळे हाउसफुल्ल झाली आहेत.

रॅकेट्समुळेच हॉस्पिटलमधील लॅबचे खासगीकरण

$
0
0
सरकारी हॉस्पिटलमध्ये खासगी पॅथॉलॉजी लॅबचे असलेल्या रॅकेट्स, त्यामुळे पेशंट्सला बाहेरून कराव्या लागणा-या तपासण्या; तसेच तपासण्यांच्या सोयी सुविधांमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हॉस्पिटलमधील प्रयोगशाळांचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे वैद्यकीय शिक्षण खात्याचे प्रभारी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी स्पष्ट केले.

राजगुरूनगरच्या उपसरपंचाची हत्या

$
0
0
राजगुरूनगरचे उपसरपंच सचिन उर्फ पापा सुर्यकांत भंडलकर(वय ३५) यांच्यावर शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील केदारेश्वर मंदिरात अज्ञात हल्लेखोरांनी खुनी हल्ला केला. या हल्ल्यात भंडलकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अनुजप्रकरणी केंद्राने घातले लक्ष

$
0
0
ब्रिटनमधील गोळीबारात ठार झालेल्या अनुज बिडवेचा मृतदेह भारतात आणण्यासाठी आता केंद सरकारने पुढाकार घेतला असून, याबाबतचे पत्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविण्यात आले आहे. याच पत्राची प्रत अनुजच्या पुण्यातील कुटुंबीयांनाही देण्यात आली आहे.

खून करणा-या पतीस पोलिस कोठडी

$
0
0
कॅम्प येथे नवरा-बायकोमध्ये झालेल्या वादातून बायकोचा गळा दाबून खून करणा-या नव-याला चार जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. टी. डोके यांनी हा आदेश दिला.

बनावट दाखला जोडणा-या दोघांस अटक

$
0
0
वाहक पदासाठी दहावी उत्तीर्ण असल्याची बनावट गुणपत्रिका अर्जासोबत दाखल करून राज्य परिवहन मंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

नीरा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

$
0
0
नववर्षाच्या पूर्वसंध्येला शनिवारी दोघांना आपला जीव गमवावा लागला. भोरला फिरण्यासाठी गेलेल्या दोघांचा येवलागाव येथे नीरा नदीच्या बंधा-यावर पोहताना भोव-यात अडकून बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

आयुक्तांचा अहवाल स्वीकारला

$
0
0
पालिकेतील मुख्य लेखा परीक्षक कार्यालयातील लेखनिक पदाच्या नेमणुकांबाबत दोषी अधिका-यांबाबतचा आयुक्तांचा अहवाल स्थायी समितीने शुक्रवारी स्वीकारला; तसेच या अहवालावरील कार्यवाहीबाबतचा 'अॅक्शन टेकन रिपोर्ट' पुढील बैठकीत सादर करण्यात यावा, असे आदेशही देण्यात आले.

तीन लाखांचा ऐवज लंपास

$
0
0
घर बंद असताना चोरट्यांनी कुलूप उचकटून घरफोडी केल्याच्या दोन घटना कोंढवा आणि चतु:श्रृंगी परिसरात घडल्या.

...तरीही युके सुरक्षित!

$
0
0
पुण्यातून युकेमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेल्या अनुज बिडवेची मँचेस्टरमध्ये हत्या झाली असली, तरी युके हे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी येण्यासाठी अतिशय सुरक्षित स्थान आहे, असा दावा ब्रिटिश कौन्सिलच्या एज्युकेशन प्रमोशन (इंडिया) विभागाने केला आहे. मात्र, अनुजच्या बाबतीत घडलेली घटना दुर्देवी असल्याचेही विभागाने म्हटले आहे.

बेशिस्त 'पीएमपी' बसेसना 'लायनी'वर आणणार

$
0
0
रस्ते सुरक्षा सप्ताहाचा मुहूर्त साधत पीएमपी प्रशासनाने पुन्हा एकदा कर्वे रोडवर डाव्या बाजूने बस चालविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. डाव्या बाजूने बस चालवण्याचा उपक्रम सुरू करण्यासंदर्भात पीएमपीचे अधिकारी आणि वाहतूक पोलिस यांच्यामध्ये रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मनसेची रिपीट परीक्षा

$
0
0
पालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या रोज वाढत असल्याने, त्यांना संधी देण्यासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ने (मनसे) येत्या रविवारी (८ जानेवारी) पुन्हा इच्छुकांची परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे.

अण्णांच्या भेटीसाठी आदेश कशाला?

$
0
0
'भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाची गरज नाही,' अशा शब्दांत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी आपली भेटीमागची भूमिका स्पष्ट केली.

झट मंजुरी; पट भूमिपूजन

$
0
0
आचारसंहितेपूर्वीच्या 'मँडेटरी ओव्हर्स' मध्ये सर्वपक्षीय माननीयांनी मतदारराजाला खूश करण्यासाठी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. उद्या (मंगळवारी) निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने शहराच्या विविध भागांमध्ये उद्घाटने-भूमिपूजनांचा धडाका लागणार आहे.

काँग्रेस म्हणजे, 'नाचता येईना...'

$
0
0
भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची काँग्रेसची इच्छाच नसून, घटक पक्ष आणि बाहेरून पाठिंबा देणाऱ्या पक्षांना सावरता न आल्याचे खापर विरोधी पक्षांवर फोडण्याचा कांगावा केला जातो आहे. काँग्रेसच्या या उलट्या बोंबा असून, 'नाचता येईना...' अशी त्यांची स्थिती झाली आहे' - प्रकाश जावडेकर

लागणार आचारसंहिता...पळा पळा..

$
0
0
'येत्या दोन दिवसांत महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार,' अशी चर्चा सोमवारी थडकली, अन महापालिकेत कामे मंजूर करवून घेण्यासाठी माननीयांची लगीनघाई उडाली!

आमदार निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयावर विनापरवाना मोर्चा काढून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार विनायक निम्हण आणि त्यांच्या समर्थकांवर सोमवारी बंडगार्डन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

गरीब मुलांनाही 'विंग्लिश मीडियम'

$
0
0
प्रतिकूल परिस्थितीमुळे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे शक्य नसणाऱ्या मुलांसाठी बोपोडीमध्ये स्वर्गीय अनंतराव पवार मेमोरियल हायस्कूल सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये मुलांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे.

निगडीत साकारतेय पहिले बस टर्मिनल

$
0
0
निगडी येथील जकातनाक्याशेजारी सुसज्ज बस टर्मिनलची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. बस टर्मिनलमध्ये बसस्थानक, पार्किंग तसेच प्रवाशांसाठी अत्यावश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

अण्णांना शुक्रवारी डिस्चार्ज?

$
0
0
अण्णा हजारे यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांमुळे त्यांची प्रकृती सुधारत असून, ते औषधाला प्रतिसाद देत आहेत. शुक्रवारपर्यंत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यानंतरच त्यांच्या 'डिस्चार्ज'बाबतचा निर्णय घेण्यात येईल.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images