Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सांस्कृतिक थिल्लरपणाची गंभीर दखल घ्या'

$
0
0
'टीव्ही चॅनेल्सवरून दाखविल्या जाणा-या मालिका आणि करमणूक कार्यक्रमांत सांस्कृतिक थिल्लरपणा सुरू असून त्याला बाजारीकरणाचे स्वरूप आले आहे,' अशा शब्दांत संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी शनिवारी या माध्यमांवर टीका केली. या प्रकाराची तरुणांनी गंभीर दखल घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कच-याचा प्रश्न आजतरी मार्गी लागणार ?

$
0
0
शहरातील कच-याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी ऊरुळी देवाची परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा केली. या बैठकीत या प्रश्नातून तोडगा निघू शकला नाही. उद्या (रविवारी) पुन्हा त्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि महापालिकेच्या अधिका-यांची बैठक होणार असून त्यामध्ये या प्रश्नातून तोडगा निघण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

बालगंधर्व 'रंगकर्मी' नाहीत का?

$
0
0
येत्या २० जानेवारीपासून सांगलीत होत असलेल्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या 'रंगकर्मी' दिनदशिर्केत सांगलीत जन्मलेले नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्यासह अनेक रंगकर्मींना स्थानच दिलेले नाही, तर अनेक ज्येष्ठ साहित्यिकांची चुकीची माहिती देण्यात आली आहे.

परदेशी नागरिकाची फसवणूक

$
0
0
स्कॉटीश नागरिकाचे घरगुती सामान कुवेत येथे न पाठवता ते परस्पर हडप केल्याप्रकरणी लक्ष्मी बाला यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पियानो शिक्षक असलेला या स्कॉटीश नागरिकाला कुवेत येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्याने तो कुवेत येथे निघाला होता.

अण्णांचे 'देणगी भरो' सुरूच!

$
0
0
एमएमआरडीए मैदानासाठी हायकोर्टाने शुक्रवारी सवलत नाकारल्यानंतर, टीम अण्णांनी शुक्रवारी दुपारीच तातडीने एमएमआरडीए कार्यालयात साडेपाच लाख रुपये भरले. तरीही मैदानाच्या भाड्यासाठी पैसे पाठवावेत, असे 'टीम अण्णां'चे दानविरांना आवाहन सुरूच आहे.

कचरा विल्हेवाट यंत्रणा बंद

$
0
0
उरुळी देवाची कचरा डेपोतील हंजर बायोटेक कंपनीत तांत्रिक बिघाड झाल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा बंद पडली आहे, त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने 'स्वच्छ' संस्थेने या यंत्रणेच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे.

'टारझन जंप'चा थरार पुण्यातही

$
0
0
टीव्ही, कम्प्युटर गेम्स आणि बैठे खेळ खेळून कंटाळलेल्या पुणेकर बच्चे कंपनीसाठी ख्रिसमसच्या सुटीत साहसी क्रीडांचा खजिना खुला होणार आहे. पेशवे उद्यानात महापालिकेने उभारलेल्या अॅडव्हेंचर पार्कचे उद्या (रविवारी) उद््घाटन होणार आहे.

ट्रकच्या धडकेत वृद्धा ठार

$
0
0
घोरपडी-मुंढवा रोडवर ट्रकच्या धडकेत एक महिला ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका

$
0
0
महापालिकेची निवडणूक होणार हे स्पष्ट झाल्यामुळे सर्वच पक्षांनी आपली विकासकामे मतदारराजाला दाखविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. त्यासाठी अर्धवट कामे गतीने पूर्ण करून किंवा पूर्ण झालेल्या कामांचे घाईने उद्घाटन करण्यामागे सगळेच पक्ष लागले आहेत.

'लाइन बॉय'च्या मारहाणीमुळे गर्भपात

$
0
0
इंजिनीअरिंग कॉलेज चौकात सिग्नलला उभ्या असलेल्या गर्भवती महिलेला किरकोळ वादातून एका 'लाइन बॉय'ने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर तिचा गर्भपात झाला. या पोलिसपुत्रावर पोलिसांची 'कृपादृष्टी' असल्याने त्याच्याविरुद्ध साधी तक्रारदेखील घेतली जात नसल्याचा आरोप या महिलेच्या पतीने केला आहे.

राज्यस्तरावरील एकच शाळा हवी

$
0
0
सर्व राज्यातील मुलांना एकत्रितपणे शिकता येईल, अशा शाळा प्रत्येक राज्यात होण्याची गरज असल्याचे मत नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माँटेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केले.

बाजारपेठांतील खंडणीखोरांना रोखा

$
0
0
हातावरचे पोट असलेल्या हमालांना आणि व्यापाऱ्यांना धमकावून स्वत:चे खिसे भरणाऱ्या खंडणीखोराविरोधात बाजारपेठांमधील हमाल बुधवारी रस्त्यावर उतरले. खंडणी मागणाऱ्या लोकांना न रोखल्यास हमालांच्या संतापाचा उदेक होईल आणि आंदोलनाचा भडका उडेल, अशा शब्दांत यावेळी इशारा देण्यात आला.

...आता 'जस्टिस फॉर अनुज'ची हाक!

$
0
0
ब्रिटनमधील मँचेस्टर येथे बळी गेलेल्या पुणेकर अनुज बिडवेसाठी फेसबुकवर 'अनुज बिडवे हेल्प पेज' आणि 'जस्टिस फॉर अनुज बिडवे' अशी दोन पेज तयार करण्यात आली असून अनेक लोकांनी या पेजेसना भेट देऊन, कमेंट करून प्रतिसाद दिला आहे. तसेच या पेजेसवरून अनुजला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

पालिका-पाटबंधारे वादात पुणेकर वेठीला

$
0
0
मुठा उजवा कालव्यातून शहराला पुरविल्या जाणाऱ्या पाण्यावरून महापालिका आणि पाटबंधारे खात्यात वाद सुरू झाला असून याचा फटका पुणेकरांना बसला आहे. कालव्यातून मोजून पाणी सोडण्याच्या पाटबंधारे खात्याच्या भूमिकेमुळे शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.

जिल्हा परिषदेतील निधीवर पदाधिकाऱ्यांचाच भर

$
0
0
आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीच सर्वाधिक निधी पळविल्याचे उघड झाले असून, सत्ताधारी आणि विरोध पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रसंगी कोर्टात दाद मागण्याची तयारीही विरोधी सदस्यांनी केली आहे. निधीचे समान वाटप करण्याची मागणी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केली आहे.

सोन्याच्या कॅडबरीच्या आमिषाने गंडा

$
0
0
गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने पु. ना. गाडगीळ यांच्यासह अनेकांना गंडा घातल्याप्रकरणी फरारी असलेल्या कोथरूड येथील दातार दाम्पत्याला गुन्हे शाखेने अटक केली. संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक पथकाने (दक्षिण विभाग) धनकवडी येथे बुधवारी दुुपारी वकिलाला भेटण्यास आले असताना त्यांना अटक केली आहे.

सिंहगड व्हॅलीत पक्षिमित्रांचे थवे

$
0
0
पुणे परिसरातील थंडी अनुभवण्यासाठी माळरान आणि दाट झाडीत दाखल झालेले स्थलांतरी पक्षी पाहण्यासाठी सिंहगड व्हॅली आणि ताम्हिणी भागात पक्षिमित्रांचे कट्टे तयार झाले आहेत. दुर्बीण, वजनदार 'भारीतल्या' लेन्सचे कॅमेरे आणि फिल्ड गाइड घेऊन पक्षिमित्र सध्या बर्ड वॉचिंगच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

नवी शाळा आम्हाला आवडते...

$
0
0
'शिक्षक आवडत नाहीत, खाण्याचे-राहण्याचे हाल होतात, तर काही म्हणतात, शाळेत शिकवलंच जात नाही... अशा विविध कारणांनी शाळा सोडली. पण आता मात्र आम्ही एकही दिवस शाळेला दांडी मारत नाही. नवी शाळा आम्हाला खूप आवडते, इथं खूप मजा वाटते...' ही प्रतिक्रिया आहे मेळघाटात सुरू झालेल्या '१०० दिवसांच्या शाळेतील' विद्यार्थ्यांची.

समुपदेशनामुळे पुन्हा जुळले ऋणानुबंध

$
0
0
अनेक वर्ष एकमेकांबरोबर सुखाने राहिल्यानंतरही त्यांच्या संसारवेलीवर फूल उमलले नाही. दोघांनाही एकमेकांमध्ये दोष वाटत होता. त्यात त्याच्या अंगावर वाढत चाललेल्या कोडामुळेही तो तिला नकोसा वाटू लागला होता. शेवटी त्यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला.

मुलांवर बलात्कार करणा-या नराधम बापाला अटक

$
0
0
विकृत बापाने आपल्या स्वत:च्या दोन मुलांवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १२ वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणा-या या ३४ वर्षीय नराधम बापाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images