Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘महत्त्वाच्या बैठकीला आमदारांना डावलले’

$
0
0
शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आयोजित केलेल्या बैठकीस पुण्यातील आमदार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना डावलण्यामुळे राज्य सरकारचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे.

इंग्रजी शाळांच्या मान्यतेचा प्रश्न सोडवा

$
0
0
इंग्रजी शाळांच्या प्रलंबित मान्यतेचा प्रश्न राज्य सरकारने तातडीने सोडविण्याची मागणी शिवसेना संपर्कप्रमुख आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी केली.

प्रवेशावरून शाळांवर उगारणार ‘छडी’

$
0
0
शिक्षण हक्क कायद्याच्या प्रवेश प्रकियेसंदर्भात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आता शाळाची झाडाझडती घेतली जाणार असून, प्रत्येक शाळेकडून प्रवेशाची माहिती मागविण्यात येत आहे. प्रवेश देण्यास टाळाटाळ केलेल्या शाळांवर ‘छडी’ उगारली जाणार असल्याचे संकेत जिल्हा परिषदेने दिले आहेत.

आश्रमशाळांमधील बालमृत्यूची चौकशी करा

$
0
0
राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या १९८ मुलांच्या मृत्यूप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर येत्या महिनाभरात बाजू मांडावी, असा आदेश राज्य सरकारला दिला आहे.

पिंपरीत सदस्य-आयुक्त संघर्ष कायम

$
0
0
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चेनंतरही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे लोकप्रतिनिधी आणि आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यातील संघर्ष कायम आहे.

चार दिवसांत वाढले ४७ टँकर

$
0
0
उन्हाच्या कडाक्यामुळे दुष्काळाची तीव्रता आणखी वाढली असून पुणे विभागात गेल्या चार दिवसांत तब्बल ४७ टँकर वाढले आहेत. टँकरग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्याही ६,९१० वर पोहोचली आहे. या गावांतील २५ लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर विसंबून आहेत.

पुणे विभागातील ३० तहसीलदारांच्या बदल्या

$
0
0
पुणे विभागातील ३० तहसीलदारांच्या बदल्या झाल्या असून २२ नायब तहसीलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. करमणूक कर अधिकारी गीतांजली शिर्के, विशेष दंडाधिकारी रोहिणी आखाडे, सहायक पुरवठा अधिकारी सुषमा पाटील यांच्यासह पुण्यातील अकरा तहसीलदारांचा बदल्यांमध्ये समावेश आहे.

प्रेमिकेच्या नावे चिठ्ठीतून झाला आत्महत्येचा उलगडा

$
0
0
किल्ले शिवनेरीच्या कडेलोटावरून आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव तुकाराम सुभाष पवार (वय २४, रा. शिरोली बुद्रुक, ता. जुन्नर) असे आहे.

खडकवासल्यात ऑनलाइन दाखले

$
0
0
खडकवासला ग्रामपंचायतीच्या वतीने ऑनलाइन दाखले देण्यास सुरुवात झाली असून लवकरच जन्म, मृत्यू तसेच इतर दाखलेही ऑनलाइन मिळणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी एन. जे. ढवळे यांनी दिली.

भ्रमंतीबरोबर ‘जंगल संरक्षण’

$
0
0
वाघ बघण्यासाठी आवर्जून वेळ काढून अनेक पर्यटक जंगल भ्रमंतीला जातात. पण, कधीतरी जंगल व्यवस्थापनाचा अनुभवही पर्यटकांनी घेतला पाहिजे, या हेतूने वाइल्ड रिसर्च अँड कॉन्झर्व्हेशन सोसायटीतर्फे मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘स्वयंसेवकांच्या सहभागातून जंगलाचे संरक्षण’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

१६ भटकी कुत्री, ९ मांजरांना मिळाले हक्काचे घर

$
0
0
रस्त्यावर, इमारतींच्या पार्किंगमध्ये राहणाऱ्या १६ भटक्या कुत्र्यांना आणि ९ मांजरांना ‘अॅनिमल लव्हर्स’ या संस्थेने रविवारी भरपूर माया करणारे हक्काचे घर मिळवून दिले.

मुद्रांक शुल्काची ‘भुर्दंड’ सक्ती

$
0
0
भाडेकरार दस्तनोंदणी करण्यासाठी ०.२५ टक्के मुद्रांक शुल्क भरण्याची सक्ती अन्यायकारक असून नवीन नियमामुळे सर्वसामान्यांना विनाकारण भुर्दंड सोसावा लागणार आहे. म्हणूनच, या नियमाच्या विरोधात कनव्हेन्सिंग प्रॅक्टीशनर्स ग्रुपच्या वतीने आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

मालगाडी बंद पडल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळित

$
0
0
पुण्याहून मुंबईकडे निघालेली मालगाडी आकुर्डी- देहूरोड दरम्यान बंद पडल्यामुळे रेल्वेसेवा सकाळी दीड तास विस्कळित झाली होती.

‘समाजकल्याण’च्या फ्रीशिप ३ महिन्यांत मिळणार

$
0
0
समाजकल्याण खात्यातर्फे अनुसूचित जातींमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘फ्रीशिप’च्या थकित पन्नास ते साठ कोटी रुपयांच्या रकमेचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

पश्चिम घाट अहवालाबाबत सूचना पाठविण्याचे आवाहन

$
0
0
डॉ. के. कस्तुरीरंगन उच्चस्तरीय समितीने प्रसिद्ध केलेल्या पश्चिम घाट जैवविविधता अहवालाविषयी भागधारक आणि नागरिकांना कोणत्याही शंका अथवा सूचना असतील, तर त्यांनी येत्या २० मेपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने केले आहे.

‘महावितरण’तर्फे अतिरिक्त सुरक्षा ठेवीत वाढ

$
0
0
सरासरी वीजबिलांची रक्कम वाढल्यामुळे ग्राहकांना बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव (डिपॉझिट) भरावी लागणार आहे. एप्रिल महिन्याच्या बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे वेगळे बिल देण्यात येणार आहे.

जेनरिक औषधांबाबत सकारात्मक भूमिका घेऊ

$
0
0
राज्यातील जनतेला वैद्यकीय सेवा मिळत असली, तरी त्यांना स्वस्त आणि गुणकारी औषधे मिळावीत म्हणून जेनरिक औषधांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

नेत्रसंकलन उदंड, पण दृष्टी ३७ टक्क्यांनाच

$
0
0
राज्याच्या अंधत्व निवारण विभागाने नेत्रसंकलनातून साडेसात हजार डोळे संकलित केले असले, तरी एकूण नेत्रसंकलनाच्या तुलनेत प्रत्यक्षात अवघ्या ३७ टक्के अंधांनाच ‘दृष्टी’ देण्यात यश आले आहे.

कृत्रिमरीत्या पिकविलेले आंबे जप्त

$
0
0
आंबा पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड वापरण्यास बंदी असतानाही, एका व्यापाऱ्याने त्याचा वापर केल्याप्रकरणी सव्वालाख रुपये किमतीचे आंबे जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंगळवारी ही कारवाई केली.

‘जेईई- अॅडव्हान्स्ड’साठी पुण्यातील ४२५ विद्यार्थी पात्र

$
0
0
आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’ या परीक्षेला पुण्यातून सुमारे ४२५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. जेईई-अॅडव्हान्स्ड ही परीक्षा येत्या २ जूनला होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images