Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

'ठाकरे स्मारक' बालभवनच्या शेजारीच

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ व्यंगचित्र गॅलरी उभारण्यासाठी अखेर सारसबागेसमोर गरवारे बालभवनाशेजारील जागेवरच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या ‘स्मारका’साठी १.८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यास पुणे पालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.

'ससून'च्या पेशंटला ढेकणांचा 'बाइट'

$
0
0
ससून हॉस्पिटलमध्ये सध्या विविध वॉर्डात ढेकणांचा सुळसुळाट झाल्याने त्यांच्याच चाव्याचे ‘इंजेक्शन’ घेण्याची वेळ पेशंटवर आली आहे. मानसोपचार विभागाच्या वॉर्डात मोठ्या प्रमाणात ढेकणांचा ‘संसर्ग’ झाल्याने तेथील पेशंटला शेजारच्या आयुर्वेद विभागात स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

व्यापा-यांचा पुन्हा बेमुदत बंद

$
0
0
स्थानिक संस्था करामध्ये (एलबीटी) सवलती मागण्याची आधीची भूमिका बदलून ‘एलबीटी’च रद्द करण्याची मागणी करीत राज्यभरातील व्यापारी आजपासून बेमुदत बंद पाळणार आहेत. पुण्यातील मार्केट यार्डातील भुसार बाजाराचा अपवाद वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद राहण्याची चिन्हे आहेत.

'जेईई-मेन्स'मध्ये पुण्याची 'दांडी गुल'!

$
0
0
'जेईई-मेन्स' या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षेला बसलेल्या राज्यातील सुमारे पावणेदोन लाखांपैकी ३५००, तर पुण्यातील २४ हजार विद्यार्थ्यांपैकी जेमतेम पाचशे विद्यार्थ्यांना ३६० पैकी शंभराहून अधिक गुण मिळविता आले आहेत! राज्यात 'जेईई-मेन्स'मध्ये '३५ टक्के' मिळवणाऱ्यांची संख्याही नगण्य आहे.

पुन्हा... 'तापमान चाळिशी'

$
0
0
शहर आणि परिसरात उन्हाचा चटका पुन्हा वाढला असून, मंगळवारी पाऱ्याने पुन्हा चाळिशी गाठली. दिवसा उन्हाची काहिली सहन करावी लागत असली, तरी गेल्या दोन दिवसांत रात्रीचे तापमान सरासरीएवढे २०-२२ अंशांपर्यंत असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

तमाशा कलावंतांना १.५ कोटी मानधनाचे वाटप

$
0
0
पारंपरिक लोककलांचे जतन व्हावे या उद्देशाने लोककलाकार, तसेच तमाशा कलावंतांना यंदा दीड कोटी रुपयांचे मानधन वाटप करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी नारायणगाव येथे दिली.

भारती विद्यापीठाची सुवर्णमहोत्सवी वाटचाल

$
0
0
उद्या, १० मे रोजी भारती विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या औचित्याने विद्यापीठाच्या एरंडवणे शैक्षणिक संकुलात सायंकाळी चार वाजता समारंभ होणार आहे. त्या निमित्ताने…

बॅरिकेड्स लावण्यात अडचणींचे ‘बॅरिकेड्स’

$
0
0
लक्ष्मी रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सोयीसाठी राबवण्यात येणाऱ्या वॉकिंगमध्यच्या ठिकाणी कायमस्वरूपी बॅरिकेड्स लावण्याच्या कामात खंड पडल्याचे समोर आले आहे. बेलबाग चौकामध्ये महिन्याभरापूर्वी पाच बॅरिकेड्स लावण्यात आले, त्यानंतर महिन्याभराच्या अवधीत संपूर्ण रस्त्यावर बॅरिकेड्स बसवण्याचे काम पूर्ण होईल, असे अपेक्षित होते.

वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सर्वेक्षण

$
0
0
पुणेकर वाहतुकीवर किती पैसे खर्च करतात, वाहतूक सुविधांचा वापर करताना त्यांचा किती वेळ खर्ची पडतो, याची माहिती घेण्यासाठी जनवाणी संस्थेने वाहतूक सर्वेक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे.

घरफोडीतील ३५ लाखांचा ऐवज जप्त

$
0
0
भंगार खरेदीचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने शहरातील मध्यवस्तीत घरफोड्या करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. आरोपींकडून एक किलो ३१८ ग्रॅम सोन्याचे दागिने, तर दीड किलो चांदी असा ३५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

२ दिवसांत सोनसाखळी चोरीच्या ६ घटना

$
0
0
शहरात लग्नसराईची धामधूम सुरू असल्याने सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या दोन दिवसांत सोनसाखळी चोरीचे सहा गुन्हे घडले असून, त्यात सुमारे आठ लाख रुपयांचे दागिने हिसकावण्यात आले आहेत.

रेल्वे फुटओव्हर ब्रिजचे काम जूनपासून सुरू

$
0
0
पुणे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी आणखी एक फुटओव्हर ब्रिज करण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यापासून या कामाला सुरुवात होण्यात होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तहसीलदारपदासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये रस्सीखेच

$
0
0
तहसीलदारांच्या बदल्यांपाठोपाठ आता उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली सुरू झाल्या असून, पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

बाजार समिती प्रशासक देशमुख अखेर पदावरून पायउतार

$
0
0
आडतदरावरून सरकारविरोधातील आंदोलनकर्त्या आडत्यांवर कारवाई करताना आखडता हात घेतलेले बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांना अखेर पदावरून पायउतार व्हावे लागले.

दुष्काळ निवारणासाठी ‘राइट टू वॉटर’ मोहीम

$
0
0
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्यभरात ‘राइट टू वॉटर’ची मोहीम राबविण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुरू केली आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये जलसंधारणासोबतच उपलब्ध पाणीसाठ्यांचे जतन करण्यासाठी जागृती करण्यात येणार आहे.

उजनीतून सोलापूरला पाणी

$
0
0
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेसाठी उजनी धरणातून पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या १० मेपासून धरणातून पाणी सोडले जाणार आहे.

फुटपाथवर पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई

$
0
0
फुटपाथवर वाहने लावणाऱ्या चालकांवर कारवाईची मोहीम वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. शहरात मंगळवारी (७ मे) दिवसभरात १५० वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

इंदापूरजवळ टँकरने तिघांना चिरडले

$
0
0
वालचंदनगरजवळील निरवांगी गावाजवळ रस्त्याच्याकडेला बसलेल्या तिघा गावकऱ्यांना दुधाची वाहतूक करणाऱ्या टँकरने चिरडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या अपघातात एक कामगार जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शरद मोहोळचा छळ होत असल्याचा आरोप

$
0
0
दहशतवादी इक्बाल सिद्दिकी याच्या खुनाचा आरोप असलेल्या आणि सध्या येरवडा कारागृहात असलेल्या शरद मोहोळ याचा तुरुंग अधिकाऱ्यांकडून छळ केला जात आहे.

स. गो. बर्वे चौक सर्वाधिक वर्दळीचा

$
0
0
शहरातील सर्वात वर्दळीच्या शिवाजीनगर येथील स. गो. बर्वे चौकातील वाहतुकीचा अभ्यास पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागातर्फे नुकताच करण्यात आला. त्या वेळी या चौकातून धावणाऱ्या वाहनांची सरासरी संख्या समोर आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>