Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जात वैधता प्रमाणपत्रांचे गुरुवारपासून वाटप

$
0
0
विभागीय जातपडताळणी समितीने तयार केलेल्या जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप येत्या गुरुवारपासून (९ मे)केले जाणार आहे. येरवडा येथील कॉमरझोन शेजारी असलेल्या जेल रोडवरील समाजकल्याण विभागाच्या हॉस्टेलमधील समितीच्या कार्यालयात ही प्रमाणपत्रे संबधित विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत.

प्रशांत दामले यांना परशुराम पुरस्कार

$
0
0
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना महाराष्ट्र चित्पावन संघातर्फे परशुराम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संघातर्फे येत्या रविवारी (दि. १२) परशुराम जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

लोकसहभागातून भाषाधोरण

$
0
0
राज्याचे पुढील २५ वर्षांचे मराठी भाषाविषयक धोरण निश्चित करताना, ते अधिक सर्वसमावेशक व्हावे यासाठी सहा महसुली विभागांत येत्या महिन्याभरात सहविचार बैठका घेण्याचे भाषा सल्लागार समितीने निश्चित केले आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

$
0
0
येत्या १८ तारखेला होणाऱ्या एमपीएसीच्या परीक्षेसाठी पुणे विद्यापीठाने त्या दिवशी असलेली आपली परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दिवशी होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षा आता संबंधित परीक्षांचा शेवटचा पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घेतल्या जाणार असल्याचे विद्यापीठाकडून सोमवारी सांगण्यात आले.

प्राध्यापकांवर ‘मेस्मा’चा बडगा

$
0
0
तीन महिन्यांपासून बहिष्कार आंदोलनामध्ये सहभागी झालेले प्राध्यापक येत्या दोन दिवसात कामावर रुजू न झाल्यास, त्यांच्यावर ‘मेस्मा’ लावण्याचा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत दिला.

पाण्याच्या नियोजनानंतरच साखर कारखान्यांना परवानगी

$
0
0
नवीन साखर कारखान्यांना परवानगी देताना साखर कारखान्याला धरणातून पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचे नियोजन जलसंपदा खात्याने करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

‘साफसफाई’ची जबाबदारी विद्यापीठाचीच

$
0
0
अवस्थी समितीच्या अहवालातील सूचनांचे पुणे विद्यापीठाने पालन केल्यानंतरही पोलिसांची कारवाई थंडावल्याने परीक्षा विभागातील कारवाईत प्रगती होत नसल्याची बाब विद्यापीठाकडून पुढे रेटण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी ‘आमच्याकडे दाखल तक्रारींविषयीची कारवाई पूर्ण झाली आहे.

‘दृष्टि’दानात पुणे अव्वल

$
0
0
राज्यात नेत्र संकलनात मुंबई आघाडीवर असून, पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु, नेत्रदान झालेल्या डोळ्यांपैकी अंधांना ‘दृष्टि’दान करण्यात पुणेकर यंदाही आघाडीवर असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

मुंढवा निवासीकरणाला तूर्तास स्थगिती

$
0
0
मुंढव्यातील नऊशे एकर जमिनीच्या निवासीकरणाच्या प्रक्रियेस तूर्त स्थगिती देण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. अभय ओक आणि नितीन जामदार यांच्या खंडपीठाने सोमवारी हा आदेश दिला.

हॉस्पिटलचे आचारी महापौर निवासात?

$
0
0
महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटसाठी नियुक्त केलेल्या एका आचाऱ्याची आणि अन्य विभागातील दोन माळी आणि दोघा मदतनिसांची महापौर निवासामध्ये नियुक्ती करावी, असे पत्र आरोग्य विभागाला देण्यात आले आहे. त्यावर स्वयंसेवी संघटनेने आक्षेप घेतला आहे.

पिण्याच्या पाण्याच्या योजना स्वस्त होणार

$
0
0
धरणांमधून पिण्यासाठी पाणी देण्याच्या योजनांचा सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच आणणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केले.

तातडीने तोडगा काढा

$
0
0
‘येत्या बुधवारपासून राज्यातील किरकोळ व्यापारी पुन्हा संपावर जाण्याबाबत ठाम असल्याने सर्वसामान्यांसह राज्याचेही नुकसान होत आहे. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्था कराबाबत (एलबीटी) तातडीने तोडगा काढावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

तिच्या 'फ्लाइट'ने मिळाली 'आयुष्यभरारी'

$
0
0
सिडनी-सिंगापूर फ्लाइटमध्ये 'कोणी डॉक्टर असेल तर मदत हवी आहे', अशी सूचना ऐकली. विमानातील एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला होता. पटकन पेशंटच्या दिशेला धावले. वैद्यकीय सुविधा मिळाल्या अन् प्रवाशांच्या सहकार्याने रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले...

शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार का?

$
0
0
शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून सूट देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे शिक्षणतज्ज्ञांनी स्वागत केले आहे. त्याच वेळी या निर्णयाच्या आधारे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या मूलभूत अपेक्षेविषयी मात्र या तज्ज्ञांमध्ये साशंकताच आहे.

पर्वतीने घेतला मोकळा श्वास

$
0
0
पर्वती टेकडी परिसरात पसरलेले प्लास्टिकचे साम्राज्य हटवून निसर्गप्रेमींनी रविवारी टेकडीला मोकळा श्वास घेण्याची संधी दिली. टेलस ऑर्गनायझेशन आणि दरोडे जोग इको ग्रीन या संस्थांतर्फे पर्वती येथील अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेज मागील परिसरात ‘प्लास्टिक कचरा निर्मूलन’ अभियान राबविण्यात आले.

खेडला पडतोय कुपोषणाचा विळखा

$
0
0
जन्मतः कमी वजनाची बालके, अतिसार, न्युमोनिया, आहार व बाल संगोपनाच्या चुकीच्या पद्धती आदी कारणांमुळे खेड तालुक्याला कुपोषणाचा विळखा पडतो आहे.

बारा हजार प्राध्यापकांचे पगार रोखले

$
0
0
परीक्षांच्या कामांवरील बहिष्कारामध्ये सहभागी असलेल्या राज्यभरातील प्राध्यापकांपैकी ११ हजार ९४५ प्राध्यापकांचे पगार राज्य सरकारने रोखून धरले आहेत.

व्यापाऱ्यांचे टुमणे अद्याप कायम

$
0
0
स्थानिक संस्था करासंदर्भात (एलबीटी) बहुतांशी मागण्या मान्य करून आणि त्यांचा शासन निर्णय (जीआर) काढूनही सरकार आणि व्यापाऱ्यांमधील वाद मिटलेला नाही. मूळ मागण्या बाजूला ठेवून सरकारने दिशाभूल केल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी पुढील आठवड्यात पुन्हा आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत.

परिचारिकांच्या समस्या सोडवा

$
0
0
राज्यातील ग्रामीण परिचारिकांचा मेळावा नुकताच पुण्यात पार पडला. परिचारिकांच्या अडचणी त्या वेळी मांडण्यात आल्या आणि सरकारकडे काही मागण्या करण्यात आल्या. १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. या दोन्हींच्या निमित्ताने…

‘पीएमपी’चे बसस्टॉपही जीवघेणे

$
0
0
‘पीएमपी’च्या सेवेवर प्रवाशांकडून टीका केली जात असताना आता बसस्टॉपदेखील जमीनदोस्त होत आहेत. औंध-बाणेर परिसरात काही दिवसांपूर्वी स्टॉप कोसळण्याची दुर्घटना घडली. सुदैवाने, त्या वेळी कोणताही प्रवासी नसल्याने जीवितहानी झाली नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>